Banana Benefits: केळ हे एक असं फळ आहे, जे अतिशय स्वस्त आणि शरीरासाठी आरोग्यवर्धक फळ आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत केळी खाल्ल्यास शरीराला असंख्य फायदे मिळतील. केळी खाल्ल्यास शरीर आतील बाजूने मजबूत होते तसेच कित्येक समस्यांपासून सुटकाही मिळते. म्हणून आरोग्यतज्ज्ञ डाएटमध्ये केळ्यांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. रोज केळी खाल्ल्यास शरीरामध्ये कोणते बदल होतील आणि दिवसभरात किती केळी खावी? याबाबत तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...
केळी खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या यू-ट्युब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये केळ या फळाशी संबंधित महत्त्वाची माहिती दिलीय. केळ हे फळ दिसायला साधे असले तरीही याद्वारे शरीराला असंख्य फायदे मिळतात. केळ्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन, खनिजे आणि फायबर यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
रोज केळी खाण्याचे फायदे | Banana Benefits
पचनप्रक्रिया सुधारेल
डॉक्टर जैदी यांनी सांगितलं की, केळ्यामध्ये डाएटरी फायबरचा समावेश आहे, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळेल म्हणून डाएटमध्ये केळ्यांचा समावेश करावा.
शारीरिक ऊर्जा वाढेल
केळ म्हणजे नैसर्गिक ऊर्जेचा उत्तम स्त्रोत. यातील कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला लगेचच ऊर्जा मिळेल. तसेच शरीरातील ऊर्जा दीर्घकाळासाठी टिकूनही राहते. म्हणूनच जिममध्ये व्यायाम करणारी मंडळी, खेळाडू आणि कष्टाचे काम करणाऱ्या मंडळींना केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.
हाडे, हृदय आणि किडनीकेळ्यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचे गुणधर्म आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळेल. 45 पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांसाठी नियमित केळ्यांचे सेवन करणं फायद्याचे ठरेल. यामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास, हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास आणि मूतखड्याचा धोका दूर होण्यासही मदत मिळेल.
(नक्की वाचा: Malasana Benefits: रोज मलासनाचा सराव केल्यास काय होतं? मलासनात किती वेळ बसावे? योगगुरूंनी दिली मोठी माहिती)
वेटलॉस आणि वजन वाढीसही लाभदायककेळ्यामुळे वजन कमी होण्यास आणि वजन घटण्यासही मदत मिळते. केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे, जे वजन कमी करण्यासाठी लाभदायक मानले जाते. तर दूध, दही किंवा सुकामेव्यासह केळ खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत मिळेल.
दिवसभरात किती केळ्यांचे सेवन करावे?डॉक्टर जैदी यांच्या माहितीनुसार, रोज एक किंवा दोन केळी खाण्याचा सल्ला दिलाय. जिममध्ये कठीण स्वरुपातील व्यायाम करत असाल तर रोज दोन ते तीन केळी खाऊ शकता. लहान मुलं आणि वयोवृद्धांकरिता दिवसभरात एक केळ खाणं पुरेसे ठरेल.
(नक्की वाचा: Weight Loss Tips: सुटलेले पोट होईल सपाट, काय खाल्ल्याने वजन होईल कमी? वैद्यांनी दिली महत्त्वाची माहिती)
रोज योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत केळी खाल्ल्यास पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल. शरीराचे वजन नियंत्रणात राहील, शरीराला ऊर्जा मिळेल शिवाय हृदय, मेंदू आणि हाडांनाही फायदे मिळतील.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

