Weight Loss Drink: तुम्ही देखील वजन करण्यासाठी प्रयत्न करताय का? पण नेमकी सुरुवात कशी करावी, हे समजत नाहीय. वजन कमी करण्यासाठी हल्ली बहुतांश लोक डाएटमध्ये वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसह पेयांचाही समावेश करतात. पण इतके महागडे उपाय करण्याऐवजी तुम्ही घरातील काही ठराविक गोष्टींचाही डाएटमध्ये समावेश करू शकता. या लेखाद्वारे आपण वेटलॉस करण्यासाठी एक रामबाण उपाय जाणून घेऊया, ज्याद्वारे शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न होण्यास मदत मिळेल. आयुर्वेद तज्ज्ञ, वर्धन आयुर्वेदिक आणि हर्बल मेडिसिन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गोयल यांनी वेटलॉसकरिता महत्त्वाची माहिती सांगितलीय.
(नक्की वाचा: Fasting Benefits: उपवास केल्यास कोणते आजार बरे होतील? रोज किती तास उपवास करणं फायद्याचे ठरेल?)
कसे होईल वजन कमी?
- सुभाष गोयल यांनी सांगितलं की, वजन कमी करायचं असेल तर सर्वप्रथम बडीशेप, जीरे आणि ओवा एकत्रित घेऊन तव्यावर भाजून घ्यावा.
- तीनही गोष्टी एकत्रित भाजल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पावडर तयार करा.
- तयार केलेली पावडर एका बाटलीमध्ये भरून ठेवा.
- अर्धा चमचा पावडर घ्या, ती हळूहळू चघळून खा आणि त्यानंतर पाणी प्यावे.
- नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळेल.
- योग्य पद्धतीने हा उपाय केल्यास सुटलेले पोट सपाट होण्यास मदत मिळेल.
- ही पावडर नियमित खाल्ल्यास शरीर निरोगी राहण्यासही मदत मिळेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world