जाहिरात

30 Days Salad Eating Benefits: 30 दिवस सॅलेड खाल्ल्यास काय होते? आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे-तोटे

30 Days Salad Eating Benefits: डाएटमध्ये सॅलेडचा समावेश केल्यास पोट, हृदय, त्वचा यासह संपूर्ण शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती.

30 Days Salad Eating Benefits: 30 दिवस सॅलेड खाल्ल्यास काय होते? आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे-तोटे
"30 Days Salad Eating Benefits: सलग 30 दिवस सॅलेड खाण्याचे फायदे"
Canva

30 Days Salad Eating Benefits: शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी आहारात सॅलेडचा समावेश करणे हा एक उत्तम पर्याय आहे. आपल्या आहारात काकडी, टोमॅटो, कांदा, बीट, पपई यासारखी ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. सलग 30 दिवस या गोष्टींचा आहारात समावेश केल्याने शरीरामध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. सॅलेड खाल्ल्याने केवळ वजन नियंत्रणात राहत नाही, तर तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनसंस्था सुधारते, त्वचा तजेलदार होते आणि हृदयासाठीही ते फायदेशीर ठरते. नियमित सॅलेड खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील, याबाबत आयुर्वेदिक तज्ज्ञ प्रोफेसर राम अवतार यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

नियमित सॅलेड खाण्याचे फायदे (What Happens If You Eat Salad Everyday For a Month)

1. फायबरचा सर्वोत्तम स्रोत

सॅलेडमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था सुधारण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या पोषक घटकांपैकी एक आहे. यामुळे वजन नियंत्रणात (Weight Management) राहण्यास मदत मिळते. तसेच शरीराची चयापचयाची गती सुधारण्यास, पचनप्रक्रिया सुधारण्यास आणि पोटाच्या तक्रारी दूर करण्यास मदत मिळते. 

2. पोषक तत्त्वांनी समृद्ध

सॅलेडमध्ये काकडी, टोमॅटो, कांदा, बीट, पपई अशा ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा. या नैसर्गिक पदार्थांमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन (Vitamins) आणि खनिजांचा (Minerals) मुबलक साठा आहे.  

3. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी

सॅलेडमध्ये फायबरचा उत्तम स्रोत असून त्यात कॅलरीचे प्रमाण कमी असतात. यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक कमी लागते. ताज्या फळांमधील आणि भाज्यांमधील या गुणधर्मामुळे वजन जलदगतीने कमी होण्यास मदत मिळू शकते. 

4. हाडे होतील मजबूत

कमी कॅलरी असलेले सॅलेड केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही, तर हाडे मजबूत करण्यासाठीही उपयुक्त ठरते. शरीरातील व्हिटॅमिन केची पातळी कमी झाल्यामुळे हाडांची घनता (Bone Mineral Density) कमी होऊ शकते. सॅलेडमध्ये वापरल्या जाणाऱ्या फळेभाज्यां मायक्रोन्युट्रिएंट्सचा (Micronutrients) देखील चांगला स्त्रोत आहेत. 

(नक्की वाचा: Weight Loss Tips: तरुणीने 90 Kgवरून थेट 55kg वजन घटवलं, ना जिम ना डाएटिंग; वाचा वेटलॉस जर्नी)

5. हृदय राहते निरोगी

शरीर वजन कमी करण्यासोबतच फळे आणि भाज्या तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी (Cardiovascular Health) अतिशय फायदेशीर आहेत. कमी कॅलरी असलेल्या सॅलेडमध्ये फॉलेट, फायबरसह अनेक पोषक घटकांचा समावेश असतो, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित आजारांना रोखण्यास मदत मिळू शकते.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(हा लेख आयुर्वेदिक तज्ज्ञ प्रोफेसर राम अवतार यांच्याशी झालेल्या संभाषणावर आधारित आहे.)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com