जाहिरात

Weight Loss Tips: तरुणीने 90 Kgवरून थेट 55kg वजन घटवलं, ना जिम ना डाएटिंग; वाचा वेटलॉस जर्नी

Weight Loss Tips: वजन कमी करणे म्हणजे केवळ आवडते पदार्थ सोडणे किंवा जिममध्ये तासनतास मेहनत करणे नाही. कंटेंट क्रिएटर मल्लिका फतेहपुरियाने 90 किलोवरून 35 किलो वजन घटवण्यासाठी 4 टिप्स फॉलो केल्या.

Weight Loss Tips: तरुणीने 90 Kgवरून थेट 55kg वजन घटवलं, ना जिम ना डाएटिंग; वाचा वेटलॉस जर्नी
"Weight Loss Tips: तरुणीने 90 Kgवरून थेट 55kg वजन घटवलं"

Weight Loss Tips: वजन कमी करणे हा एक असा कठीण प्रवास आहे जो प्रत्येकासाठी शक्य नसतो, हे तुम्हाला माहितीच असेल. कारण या प्रवासात तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये तुमच्या आवडत्या पदार्थांचा त्याग करण्यासोबतच जिममध्येही खूप घाम गाळावा लागतो. पण अशा पद्धतीने वजन कमी करणं फार काळ टिकत नाही, हे देखील कालांतराने काही जणांना जाणवते. जोपर्यंत तुम्ही डाएटिंग आणि व्यायाम करता, तोपर्यंत वजन नियंत्रणात राहते. पण या सर्व गोष्टी बंद करताच वजन पुन्हा वाढू लागते आणि या सर्व गोष्टींचा समतोल राखणे खूप कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत तुम्हाला अशा सवयी लावून घेण्याची गरज आहे, ज्यांचा तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सहज समावेश करू शकाल. 

कंटेंट क्रिएटर मल्लिका फतेहपुरिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कोणत्या सवयींचा अवलंब करून आपले 35 किलो वजन कमी केले, याबाबत सांगितले आहे. एकेकाळी त्यांचे वजन 90 किलो होते आणि आता ते 55 किलो आहे.

1. डाएट कसे करावे?

मल्लिकाने सांगितले की, कठोर स्वरुपात डाएट फॉलो तेव्हा वजन थोडे कमी व्हायचे, पण नंतर पुन्हा वाढायचे. बदल तेव्हा झाला जेव्हा त्यांनी वजन कमी करण्याचे ध्येय बाजूला ठेवून डाएटिंग करणे सोडले आणि अशा सवयींवर लक्ष दिले ज्या त्या आयुष्यभर फॉलो करू शकतील.

2. कार्बोहायड्रेट्स कमी करणे

मल्लिकाने डाएटमधून ब्रेड, भात किंवा पास्ता यासारखे पदार्थ पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्यांच्या प्रमाणावर (Portion Control) नियंत्रण ठेवले. असे केल्याने त्यांना समजले की जेवण ही कधीच खरी समस्या नव्हती, तर ते 'किती प्रमाणात' खाल्ले जाते ही मोठी समस्या होती.

3. जबरदस्तीने न आवडणारे पदार्थ खाणे

मल्लिका फतेहपुरियाला जाणवले की, जेव्हा जेवण एखाद्या शिक्षेसारखे वाटू लागते, तेव्हा ते खावेसे वाटत नाही. म्हणूनच त्यांनी असे पदार्थ तयार करायला सुरुवात केली जे हलके असण्यासोबतच चविष्टही असतील. यामुळे त्या आपल्या जेवणाचा मनसोक्त आनंद घेऊ लागल्या.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(नक्की वाचा: Burning Feet Syndrom: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तळपायात जळजळ होते? दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या माहिती)

4. अति व्यायाम करणे टाळले

मल्लिकाने पूर्वी वाटायचे की दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. पण कालांतराने तिला समजले की, दररोज चालणे (Daily Walk) आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे जास्त प्रभावी ठरते. मल्लिकाच्या वेट लॉस जर्नीतून हेच समजते की, वजन कमी करणे म्हणजे चांगले जेवण सोडणे किंवा स्वतःला दुःखी करणे नाही. डाएटिंगसाठी जेवण सोडणे, बेचव पदार्थ खाणे किंवा तास-न्-तास जिममध्ये कष्ट करणेच गरजेचे नाही; तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात छोटे बदल करून तुमची वेट लॉस जर्नी आनंददायी बनवू शकता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com