Knuckle Cracking: बोट मोडण्याची सवय असणाऱ्यांना आसपासच्या लोकांनी त्यांना वारंवार रोखण्याचा प्रयत्न केल्याचे तुम्ही पाहिलं असेल. बोट मोडत राहिल्यास हात वाढतील, सांधे दुखतील आणि संधिवाताची समस्या निर्माण होईल,अशाही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. बोट मोडण्याच्या सवय आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. यामुळे हाडे कमकुवत होतात, असे म्हणतात. बोट मोडण्याची सवय खरंच हानिकारक असते का? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
बोट मोडल्यानंतर आवाज का येतो? | Bot Modlyane Kay Hote
हात-पायांची बोट मोडल्यानंतर किंवा शरीराचे सांधे मोडल्यास त्यातून येणारा आवाज हा हाडांच्या घर्षणामुळे किंवा कॉर्टिलेजच्या तुटण्यामुळे येत नाही तर गॅसमुळे आवाज येतो. वर्ष 2015मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासातील माहितीनुसार जेव्हा सांधे ताणले जातात तेव्हा त्यातील दाब अचानक कमी होतो. यामुळे सांध्यासाठी वंगणाप्रमाणे काम करणारे सायनोव्हियल द्रवपदार्थ जलदगतीने पसरत नाही आणि वायूने भरलेली पोकळी तयार होते. या प्रक्रियेस ट्रायबोन्यूक्लिएशन असे म्हणतात, ज्यामुळे हाड मोडल्यानंतर आवाज ऐकू येतो.
बोट मोडण्याची सवय हानिकारक असते का?
बोट मोडण्याबाबत अशी सामान्य समज आहे की या सवयीमुळे संधिवाताची समस्या निर्माण होते. पण संशोधनामध्ये असेही काहीही आढळून आलेले नाही. डोनाल्ड अनगर नावाच्या एका डॉक्टरने 50 वर्षे त्यांच्या डाव्या हाताची बोट मोडली, पण उजव्या हाताची बोट मोडणे टाळलं. वर्ष 2004मध्ये त्यांना आढळले की दोन्ही हातांमधील संधिवात किंवा सांध्याच्या समस्यांमध्ये कोणताही फरक नव्हता.
(नक्की वाचा: White Hair Home Remedies: केस अकाली पांढरे झाले आहेत? जाणून घ्या कारण आणि स्टेप बाय स्टेप आयुर्वेदिक रामबाण उपाय)
बोट मोडण्यामागील समजबोट मोडण्यामागील समज-गैरसमज यामुळे पसरतात कारण यामागील विज्ञान आणि त्याबाबतची माहिती लोकांना माहिती नाहीय. बोट मोडण्याच्या सवयीचे कोणतेही नुकसान नाहीत, पण चुकीच्या पद्धतीने बोट मोडू नये, असेही संशोधनामध्ये स्पष्ट करण्यात आलंय.
(नक्की वाचा: Reels Side Effects: आणखी एक Reel आणि सर्वच संपलं! तुमचा मेंदू होतोय गुलाम, क्षणभराचा आनंद ठरेल प्रचंड घातक)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)