Papaya Benefits: रोज पपई खाल्ल्यास काय होईल? कधी खावं हे फळ, जाणून घ्या फायदे आणि नुकसान

Papaya Benefits: नियमित पपई खाल्ल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Papaya Benefits: पपई खाण्याचे फायदे"
Canva

Papaya Benefits: आताच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमध्ये बहुतांश लोक फिट राहण्यासाठी डाएटमध्ये फळांचा समावेश करतात. यामध्येही पपई खाण्यावर लोकांचा अधिक भर असतो. पपईचे योग्य प्रमाणात सेवन केले तर पचनप्रक्रिया सुधारते, शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते, शरीराची चयापचयाची गती जलद होते आणि दिवसभर शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते.  

पपई खाण्याचे फायदे, कधी आणि कसे खावं हे फळ?

पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर | Health Benefits Of Papaya 

पपईमध्ये पपाइन नावाचे एंझाइम असते, ज्यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. अन्नाचे पचन योग्य पद्धतीने होण्यास मदत मिळते. पोटातील गॅस कमी होऊ शकतो. रीसर्चमधील माहितीनुसार, जे लोक काही सलग आठवडे पपईचे सेवन करतात, त्यांची बद्धकोष्ठता, पोटामध्ये जळजळ होणे आणि पोटाच्या आतमध्ये येणारी सूज यासारख्या समस्यांपासून सुटका होते. 

निरोगी आरोग्य

शरीराची पचनप्रक्रिया ठीक असेल तर शरीरातील ऊर्जा देखील टिकून राहण्यास मदत मिळते. पपईमध्ये व्हिटॅमिन बी, फायबर यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आळस कमी होईल. पपईतील व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत  होण्यासह त्वचेचा पोतही सुधारेल.   

(नक्की वाचा: Papaya Seeds Benefits: रिकाम्या पोटी पपईच्या बिया खाल्ल्यास काय होते?)

नैसर्गिक साखर

तुम्ही डाएटमधून साखर वर्ज्य केली असेल तर या फळाचे सेवन करू शकता. यामध्ये नैसर्गिक साखरचे प्रमाण अधिक आहे, महत्त्वाचे म्हणजे या फळाचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे.   

Advertisement

यकृत आणि त्वचेसाठी वरदान 

पपईतील अँटी-ऑक्सिडंट्स, कोलीन आणि व्हिटॅमिन ई यासारखे पोषणतत्त्व यकृत डिटॉक्स करण्यास मदत करतात. यकृत डिटॉक्स झाल्यास त्याचे सकारात्मक परिणाम त्वचेवरही दिसतात, यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज दिसते. काही लोक पपईचे फेसपॅकही वापरतात, यामुळे मृत त्वचेची समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

(नक्की वाचा: Papaya Benefits: सकाळी पपई खाण्याचे फायदे)

पपईचे सेवन कसे करावे?

पपईचे योग्य वेळेस सेवन केल्यास आरोग्यास असंख्य लाभ मिळतील आणि चुकीच्या वेळेस खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पपई सकाळच्या वेळेस खाणे फायदेशीर ठरेल. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील आणि पचनप्रक्रिया सुधारेल. 

Advertisement

जेवणानंतर किती अंतराने पपई खाऊ शकतो?

जेवणाच्या अर्ध्या तासानंतर पपई खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या फळामुळे पाचक रस सक्रिय होतात आणि अन्नाचे सहजरित्या पचन होण्यास मदत मिळते. पण जेवणानंतर लगेचच पपई खाऊ नये, यामुळे पोटात गॅस होऊ शकतो किंवा अ‍ॅसिडिटीच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. 

रात्री झोपण्यापूर्वी पपई खाऊ शकतो का?

रात्री झोपण्यापूर्वी पपई खाणे टाळले पाहिजे. यामुळे पचनप्रक्रियेवर दुष्परिणाम होतील आणि पपईतील एंझाइम त्यावेळेस योग्यरित्या काम करू शकणार नाहीत.   

नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करू शकतो का?

सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करू शकता. यामुळे पोट स्वच्छ होण्यासह त्वचेचे आरोग्य सुधारेल.   

नियमित वाटीभर पपईचे सेवन करू शकता. सकाळी रिकाम्या पोटी हे फळ खाणे फायदेशीर ठरेल. काही दिवसांनंतर तुम्हाला शरीरामध्ये सकारात्मक बदल दिसतील.  

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)