Sunlight Benefits: रोज 10 मिनिटं उन्हात बसल्यास काय होईल? Doctor Hansa Yogendra यांनी सांगितले मोठे फायदे

Benefits Of Morning Sunlight: रोज सकाळी दहा मिनिटे उन्हात बसल्यानंतर कोणते फायदे मिळतील?

जाहिरात
Read Time: 3 mins
"Benefits Of Morning Sunlight: सकाळी कोवळ्या उन्हात बसल्यानंतर काय होते?"
Canva

Benefits Of Morning Sunlight: आरोग्यासाठी सूर्यप्रकाश अत्यंत फायदेशीर मानला जातो. विशेषतः सकाळच्या वेळेस काही वेळ उन्हामध्ये बसण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. प्रसिद्ध योगगुरू आणि लेखिका हंसा योगेन्द्र यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर याबाबतची माहिती देणारा व्हिडिओ शेअर केलाय. रोज सकाळी केवळ 10 मिनिटे उन्हामध्ये बसल्यास असंख्य आरोग्यदायी लाभ मिळू शकतात, असे योगगुरूंनी सांगितलंय. जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

सकाळचा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी चांगला का मानला जातो?  

डॉ. हंसाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळची वेळ वातावरणास शांत, शुद्ध आणि सकारात्मक बनवते. योग आणि आयुर्वेदानुसार, सकाळचा सूर्यप्रकाश वात आणि कफ दोष संतुलित करतो तसेच शरीरातील अग्नि (पचनशक्ती) सक्रिय करतो.

व्हिटॅमिन डीमुळे शरीरात कोणते बदल घडतात? 

सकाळचा सूर्यप्रकाश त्वचा आणि डोळ्यांपर्यंत पोहोचतो त्यावेळेस शरीरामध्ये व्हिटॅमिन D तयार होऊ लागते. हे जीवनसत्त्व हाडे, दात आणि शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेक संशोधनातील माहितीनुसार शरीराला लागणारे 90 टक्क्यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन D ची निर्मिती सूर्यप्रकाशाच्या मदतीनंच होते. केवळ आहार किंवा औषधांमुळे व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघणार नाही. व्हिटॅमिन D शरीराला कॅल्शियम आणि फॉस्फरसचा योग्य वापर करण्यास मदत करते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीच्या समस्या कमी होतात. तसेच हे जीवनसत्त्व शरीराचे संसर्ग आणि सूज (इन्फ्लेमेशन) यासारख्या समस्यांपासून संरक्षण करते.

हार्मोन्सवर काय परिणाम होतात?

हंसाजी यांनी पुढे असंही सांगितलं की, आपल्या शरीरात एक अंतर्गत घड्याळ (सर्केडियन रिदम) असते, जे झोपणे आणि झोपेतून उठणे याचे चक्र नियंत्रित करते. सकाळचा सूर्यप्रकाश या घड्याळाची योग्य वेळ सेट करते. ज्यामुळे...
- मेलाटोनिन (झोपेचे हार्मोन) दिवसा कमी होते, त्यामुळे रात्रीची झोप चांगली लागते.
- सेरोटोनिन (हॅपी हार्मोन) वाढते, ज्यामुळे मूड चांगला राहतो आणि नैराश्यापासून बचाव होतो.
- कोर्टिसोल (ताणतणावाचे हार्मोन) संतुलित राहते.

Advertisement

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
सूर्यप्रकाशामुळे रक्तवाहिन्या रुंदावतात, त्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

वजन कमी होते 
सकाळी फक्त 10 मिनिटे उन्हात बसल्यास वजन कमी होण्यासही मदत मिळू शकते. सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे शरीराची चयापचायची गती वाढते, त्यामुळे फॅट बर्न होण्याची प्रक्रिया जलद होते. 

दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकून राहते
सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यास दिवसभरात शरीरातील ऊर्जा टिकून राहते, एकाग्रता क्षमताही सुधारते.

Advertisement

(नक्की वाचा: Weight Loss ChatGPT 7 Prompts: तरुणाने ChatGPTच्या मदतीने 12 आठवड्यांत 27 Kg वजन घटवलं, वेटलॉससाठी शेअर केले 7 प्रॉम्ट)

कसा करावा स्वतःमध्ये बदल?

  • सकाळी उठून चेहरा स्वच्छ धुवा आणि थोडे कोमट पाणी प्यावे.
  • सकाळी 6:30 वाजेपासून ते सकाळी 8:30 वाजेदरम्यान पाच ते 10 मिनिटे उन्हात बसा.
  • चेहरा, हात आणि पायांवर थेट सूर्यप्रकाश येऊ द्यावा.
  • डोळे बंद करून शांतपणे श्वास घ्या. इच्छित असल्यास हलक्या स्वरुपात स्ट्रेचिंग व्यायाम किंवा योगही करू शकता.

Advertisement

(नक्की वाचा: Drink Warm Water Sitting On Knees: गुडघ्यावर बसून कोमट पाणी प्यायल्यास काय होते? तज्ज्ञांनी सांगितले 4 फायदे)

या गोष्टी लक्षात ठेवा
  • अतिशय तीव्र उन्हात बसू नका.
  • सूर्याकडे थेट पाहू नका.
  • उन्हात बसल्यानंतर पुरेसे पाणी प्या.

डॉ. हंसा योगेन्द्र यांच्या मते, सकाळचा सूर्यप्रकाश केवळ शरीरालाच नाही तर मनालाही निसर्गाशी जोडतो. या छोट्या सवयीमुळे तुमच्या दिनचर्येत मोठा सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. 
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)