जाहिरात

Drink Warm Water Sitting On Knees: गुडघ्यावर बसून कोमट पाणी प्यायल्यास काय होते? तज्ज्ञांनी सांगितले 4 फायदे

Gudghyavar Basun Pani Pinyache Fayde: आचार्य मनीष यांच्या माहितीनुसार गुडघ्यावर बसून पाणी प्यायल्यास शरीरामध्ये मोठे बदल पाहायला मिळतील.

Drink Warm Water Sitting On Knees: गुडघ्यावर बसून कोमट पाणी प्यायल्यास काय होते? तज्ज्ञांनी सांगितले 4 फायदे
"Gudghyavar Basun Pani Pinyache Fayde: गुडघ्यावर बसून पाणी प्यायल्यास काय होते?"
Canva

Gudghyavar Basun Pani Pinyache Fayde: सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर आणि तज्ज्ञमंडळी देतात, कारण सकाळी पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण पाणी कसे प्यावे? याची माहिती फारच कमी लोकांना असते. साधारणपणे लोक सकाळी पलंगावर बसूनच पाणी पितात. पण सकाळी गुडघ्यांवर बसून पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का? आचार्य मनीष यांच्या मते, सकाळी गुडघ्यांवर बसून पाणी प्यायल्याने पचनप्रक्रिया सुधारते, मेटाबॉलिज्म वाढते, बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो, शरीर डिटॉक्स होते, त्वचेवर चमक येते आणि पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते. आचार्य मनीष यांच्या माहितीनुसार, सकाळी गुडघ्यांवर बसून पाणी पिणे अतिशय फायदेशीर ठरेल. याद्वारे शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासह शरीर अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये राहते. गुडघ्यावर बसून पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता, फिशर आणि प्रोस्टेट यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो, कारण या सवयीमुळे शरीराची नैसर्गिक कार्यपद्धती अधिक चांगली होते.

गुडघ्यावर बसून पाणी पिण्याचे फायदे | Gudghyavar Basun Pani Pinyache Fayde

1. पचनप्रकिया सुधारते 

गुडघ्यावर बसून पाणी प्यायल्याने पचनसंस्थेला फायदा होतो, कारण या स्थितीत बसल्यामुळे पोटावर दाब पडतो. त्यामुळे अन्नाचे पचन अधिक आणि प्रभावीपणे होते तसेच बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

2. मेटाबॉलिज्मची गती वाढते

गुडघ्यावर बसून पाणी प्यायल्याने शरीराची चयापचयाची गती वाढते. यामुळे शरीराची नैसर्गिक स्थिती संतुलित राहण्यास मदत मिळते. विशेषतः शरीराच्या आतील अवयवांना म्हणजे यकृत (Liver) आणि मूत्रपिंड (Kidney) यांची कार्यप्रणाली सुधारते. त्यामुळे शरीर अधिक कार्यक्षमतेने काम करते आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी विशेषतः कोमट पाणी प्यायल्यास जास्त फायदे मिळतात.

Better Sleep Tips: रात्री सतत कूस बदलत राहता का? अपुऱ्या झोपेमुळे होऊ शकतात नुकसान, गाढ झोपेसाठी वाचा उपाय

(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्री सतत कूस बदलत राहता का? अपुऱ्या झोपेमुळे होऊ शकतात नुकसान, गाढ झोपेसाठी वाचा उपाय)

3. शरीर डिटॉक्स होईल

गुडघ्यावर बसून पाणी प्यायल्यास शरीर आतील बाजूने स्वच्छ होण्यास मदत मिळते, शरीर डिटॉक्स करण्याचा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. यामुळे लिव्हर आणि किडनीचे कार्य सुधारते. शरीरातील विषारी घटक (टॉक्सिन्स) सहजरित्या बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते.

Irregular Periods: पीरियड्स वेळेवर येत नाही? चिमूटभर उपाय ठरेल प्रभावी, जाणून घ्या योग्य पद्धत आणि फायदे

(नक्की वाचा: Irregular Periods: पीरियड्स वेळेवर येत नाही? चिमूटभर उपाय ठरेल प्रभावी, जाणून घ्या योग्य पद्धत आणि फायदे)

4. त्वचेवर येते चमक

शरीर आतील बाजूनं स्वच्छ झाल्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते. गुडघ्यावर बसून पाणी पिणे आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com