Badam Benefits: बदाम खाण्याची योग्य पद्धत काय? किती खावे, कधी खावे आणि कसे खावे? जाणून घ्या माहिती

Badam Benefits: दिवसभरात किती बदाम खावे आणि किती वाजता खावे? बदाम खाण्याची योग्य पद्धत माहितीय का? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
Badam Benefits: बदाम खाण्याची योग्य वेळ काय?

Badam Benefits: डाएटमध्ये फळ-भाज्यांप्रमाणे सुकामेव्याचाही समावेश करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. सुकामेव्यापैकी बदामाचे नियमित सेवन केले तर आरोग्यास अगणित लाभ मिळतील. कारण बदामामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. दिवसभरात किती बदाम खावे आणि कोणत्या वेळेस बदाम खावे? बदाम खाण्याची योग्य पद्धत काय आहे? या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती या लेखाद्वारे जाणून घेऊया...

एका दिवसात किती बदाम खाऊ शकता | What Is The Best Time To Eat Almonds?

दिवसभरात आठ ते दहा बदाम खाणे फायदेशीर ठरू शकते. 
रात्रभर बदाम भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी साल काढून बदाम खाऊ शकता. 
हवे असल्यास बदाम भाजून देखील खाऊ शकता. 
बदाम भाजून खाणे हे सर्वोत्तम आणि पौष्टिक पद्धत आहे.

(नक्की वाचा: Almonds Soaked In Milk Benefits: दुधामध्ये बदाम भिजवून खाण्याचे फायदे)

बदाम खाण्याची योग्य वेळ? | Best Time To Eat Badam?

  • बदाम खाण्याची अशी ठराविक वेळ नाहीय.
  • पण तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्यास आरोग्यास मोठे फायदे मिळतील. 
  • तणावापासून मुक्तता हवी असल्यास आणि चांगली झोप हवी असल्यास रात्री झोपण्यापूर्वी बदाम खावे.  

(नक्की वाचा: Badam Milk Benefits: बदामाचे दूध पिण्याचे 10 फायदे)

बदाम खाण्याचे फायदे

  • हाडे मजबूत होतील : बदामामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस असते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. 
  • पचनप्रक्रिया : बदामातील पोषणतत्त्वांमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास आणि पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळू शकते.  
  • वेटलॉस : बदामामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Topics mentioned in this article