Banana Benefits: काही लोक केळ सॅलेड म्हणून खाणं पसंत करतात. तर काही लोक स्मूदी किंवा मिल्कशेक स्वरुपात केळ्याचा डाएटमध्ये समावेश करतात. केळ्यामध्ये व्हिटॅमिन, खनिजे, फायबर आणि नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त आहे. पण केळ योग्य वेळेत खाल्ल्यास कोणते फायदे मिळतात? हे माहितीय का? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
सकाळी रिकाम्या पोटी केळ खाऊ शकतो का?
सकाळच्या वेळेस केळ खाणे फायदेशीर मानलं जातं, कारण सकाळच्या वेळेस शरीराला ऊर्जेची अधिक आवश्यकता असते. केळ्यातील नैसर्गिक साखरेमुळे शरीराला लगेचच ऊर्जा मिळते आणि पोट दीर्घकाळासाठी भरलेलं राहते. पण केळ कधीही रिकाम्या पोटी खाण्याची चूक करू नये.
वर्कआऊटनंतर केळ खाऊ शकता
तुम्ही जिममध्ये वर्कआऊट किंवा योगासनांचा सराव करत असाल तर 30 मिनिटांपूर्वी केळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढेल, स्नायूंना ऊर्जा मिळेल आणि थकवा देखील दूर होईल.
केळ खाण्याचे फायदे
पोट : केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनप्रक्रिया निरोगी राहण्यासह बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका होईल. पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर केळ खाणे फायेदशीर मानले जाते.
(नक्की वाचा: Hair Care Tips: नारळाच्या तेलात कांद्याचा रस मिक्स करून केसांना लावल्यास काय होईल? केस पटापट वाढतील?)
हृदय : केळ्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते, नियमित स्वरुपात केळ खाल्लं तर रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहील आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Clove Tea Benefits: चहामध्ये लवंग मिक्स करुन प्यायल्यास काय होतं? या लोकांनी नक्की करावा हा उपाय)
हाडे : हाडे कमकुवत असल्यास डाएटमध्ये केळ्याचा समावेश करावा. हाडे मजबूत होतील आणि सांधेदुखीच्या समस्येतून सुटका मिळेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)