लहान मुलांना झोपण्याआधी दूध प्यायला देण्याची सवय अनेक पाल्यांना असते. असं करणे मुलांसाठी फायदेशीर असतं असं अनेकांना वाटत. मात्र रात्रीच्या वेळी मुलांना दूध देणे हानिकारक ठरु शकते. रात्री मुलांना दूध का देऊ नये यामागची कारणे जाणून घेऊया.
मुलांचं वय दोन वर्षांच्या खाली असेल आणि त्याला सर्दी-खोकला झाला असेल तर दूध देणे टाळा. मुलास बद्धकोष्ठता आणि थकवा जाणवत असेल, तर ही मिल्क बिस्किट सिंड्रोमची लक्षणे असू शकतात. आपल्याला या सिंड्रोमबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी बाळाला गोड दूध दिल्यास सर्दी-खोकला होऊ शकतो. यामुळे ॲसिडिटी होऊ शकते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुलांना शांत झोप लागत नाही
दुधात साखर असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मुलांमध्ये हायपरअॅक्टिव्हिटी निर्माण होते. त्यामुळे मुलाला रात्री झोपणे कठीण होऊ शकते. जर तुम्हाला असे वाटत असेल की रात्री झोपण्यापूर्वी मुलाला दूध दिल्याने त्याला शांत झोप लागते, तर तुम्ही चुकीचे आहात, यामुळे झोपेमध्ये वारंवार व्यत्यय येतो.
(नक्की वाचा- पोटाच्या सर्व समस्या होतील दूर, प्या या दोन गोष्टींपासून तयार केलेले गुणकारी पेय)
वजन वाढत नाही
रात्री झोपण्यापूर्वी बाळाला दूध पाजले तर त्याचे वजन वाढते असा अनेकांचा गैरसमज असतो. उलट रात्री बाळाला दूध पाजल्याने त्याचे वजन वाढत नाही. याशिवाय तज्ज्ञांचे असे मत आहे की, मुलाला रात्री दूध पाजून झोपवले तर त्याचे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होत नाही. डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत समस्या उद्भवतात.
तर दूध देणे टाळा
मुलांना खोकला आणि सर्दीचा त्रास होत असेल तर त्यांना रात्री दूध देणे टाळावे. जर तुमच्या मुलालाही अशी समस्या असेल तर काही दिवस रात्री दूध देऊ नका. तुमच्या मुलाच्या तब्येतीत फरक तुम्हाला स्वतः लक्षात येईल. त्याचा सर्दी-खोकल्याचा त्रास हळूहळू कमी होऊ लागेल.
(नक्की वाचा : दिवसभरात इतके लिटर पाणी प्यायलात तर पटकन कमी होईल वजन)
दूध पिण्याची योग्य वेळ
सकाळच्या नाश्त्याची वेळ मुलांना दूध देण्याची उत्तम वेळ मानली जाते. सकाळच्या नाश्त्यासोबत मुलांना दूध द्यावे. सकाळी दूध प्यायल्याने मूल दिवसभर सक्रिय राहते आणि दूध सहज पचते. मूल शाळेत जात असेल तर सकाळी शाळेत जाताना मुलाला दूध पाजावे. यामुळे त्याचे पोट भरलेले राहते.