जाहिरात

तुपामध्ये या गोष्टींची होते भेसळ, खरेदी करताना हे ठेवा लक्षात

Pure Ghee Identification: बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त तुपाची विक्री मोठ्या प्रमाणात होते, जे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते. आरोग्यास होणारा धोका टाळण्यासाठी भेसळयुक्त आणि शुद्ध तूप कसे ओळखावे? जाणून घेऊया माहिती... 

तुपामध्ये या गोष्टींची होते भेसळ, खरेदी करताना हे ठेवा लक्षात

Pure Ghee Identification: तिरुपती मंदिराच्या प्रसादामध्ये भेसळयुक्त तुपाबाबत वाद निर्माण झाल्यानंतर लोकांमध्ये तूप वापरावे की वापरू नये? यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. बाजारामध्ये मिळणाऱ्या तुपामध्ये भेसळीबाबत नेहमीच शंका उपस्थित केली जाते. तुपामध्ये वनस्पती तेलासह विविध प्रकारची रसायने मिसळली जातात. भेसळयुक्त तूप आरोग्यासाठी घातक ठरू शकते. भेसळयुक्त तुपामुळे आरोग्यास होणारे धोके टाळण्यासाठी तूप शुद्ध आहे हे कसे ओळखावे? याची माहिती जाणून घेऊया... 

तुपामध्ये या गोष्टींची होते भेसळ

साधारणतः बाजारामध्ये मिळणाऱ्या तुपामध्ये काही गोष्टींची भेसळ केली जाते किंवा वनस्पती तेलामध्ये कृत्रिम सुगंध मिक्स करून ते तूप म्हणून विकले जाते. तुपामध्ये वनस्पती तेलाचीही भेसळ केली जाते. वेगवेगळ्या प्रकारची रसायने मिक्स करून त्यास तुपाचा सुगंध दिला जातो आणि भेसळयुक्त तूप तयार केले जाते. अलिकडेच समोर आलेल्या वृत्तानुसार तुपामध्ये प्राण्याची चरबी आढळली होती. 

(नक्की वाचा: Weight Loss: वजन होईल पटापट कमी, पोटही होईल सपाट; नियमित केवळ करा हे एकच काम)

तूप विकत घेताना या गोष्टी ठेवा लक्षात

- बाजारातून तूप विकत घेण्यापेक्षा घरातच तूप तयार करणं उत्तम ठरू शकते. 
- घरामध्ये तूप तयार करणं शक्य नसेल तर एखाद्या चांगल्या दुकानातून तूप खरेदी करावे. 
- लेबलवरील सर्व माहिती वाचावी. 
- लेबलवरील माहिती संशयास्पद वाटत असल्यास तूप विकत घेणे टाळावे. 
- FSSAI कडून मंजूर करण्यात आलेल्या तुपाचीच खरेदी करावी. 

(नक्की वाचा: Alu Wadi Recipe Video: ग्लासमधील अळु वडीची चव चाखलीय का? पाहा सोपी रेसिपी)

भेसळयुक्त तूप कसे ओळखावे?

- भेसळयुक्त तुपाची ओळख सुगंधावरूनही करू शकता. 
- शुद्ध तूप थंड झाल्यानंतर त्याचा पोत दाणेदार होतो. 
- तुपामध्ये स्टार्चची भेसळ झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी एक चमचा तुपावर आयोडीनचे दोन थेंब टाका. भेसळ असेल तर तुपाचा रंग बदलतो.

गरम पाण्यात तूप मिक्स करून पिण्याचे फायदे 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com