Weight Loss Tips: हिंदू धर्मामध्ये नवरात्रौत्सवास अतिशय महत्त्व आहे. या उत्सवादरम्यान सात्विक आहार करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे धार्मिक परंपरा जपण्याव्यतिरिक्त आरोग्याचीही काळजी घेण्याची उत्तम संधी मिळते. काही लोक नवरात्रीचे उपवास करतात. यादरम्यान तुम्ही डाएटमध्ये ठराविक बदल केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. नवरात्रौत्सवामध्ये उपवास करताना योग्य आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे अतिरिक्त वजनही कमी होईल आणि आरोग्य देखील निरोगी राहील.
नवरात्रौत्सवादरम्यान वजन कमी करण्यासाठी काय खावे?
साबुदाणे
साबुदाण्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ उदाहरणार्थ खिचडी, खीर, साबुदाणा वडा यासारख्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराची ऊर्जा वाढते. साबुदाणा हे कार्बोहायड्रेट्सचे उत्तम स्त्रोत आहे, पण योग्य प्रमाणातच साबुदाण्याचे सेवन करावे.
(नक्की वाचा: Weight Loss Tips: रिकाम्या पोटी प्या या मसाल्याचे पाणी, चयापचयाची क्षमता सुधारण्यासह वजनही होईल झटकन कमी)
फलाहार
सफरचंद, केळी, पपई, संत्र यासारख्या हंगामी फळांचे सेवन करावे. या फळांमध्ये फायबर आणि व्हिटॅमिनचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे वजन घटण्यास मदत मिळते.
सुकामेवा
बदाम आणि अक्रोड यासारखा सुकामेवा खावा. यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराला अगणित लाभ मिळतात आणि वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही.
(नक्की वाचा: Health Tips: हे अमृतासमान पाणी प्यायल्यास मिळतील हजारो फायदे, अनेक रोगांवर रामबाण उपाय)
अख्खे धान्य
कुट्टू आणि शिंगाड्याच्या पिठापासून तयार केलेल्या पोळ्या किंवा पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे वजन देखील कमी होण्यास मदत मिळते.
दही
दही हे प्रोटीन आणि प्रोबायोटिक्सचे उत्तम स्त्रोत आहे. फळ किंवा मधासह दह्याचे सेवन करावे.
(नक्की वाचा: एकटेपणामुळे शरीरावर होतात हे गंभीर नकारात्मक परिणाम, जाणून घ्या काय करावे आणि काय करू नये?)
भाजलेले चणे
भाजलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते.
ताजा रस
साखरेचा वापर न करता फळांचा ताजा रस पिणे देखील सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज् कमी होऊ शकतात.
पाणी आणि हर्बल चहा
भरपूर प्रमाणात पाणी प्या. हर्बल टी उदाहरणार्थ पुदिना किंवा आल्याचे चहा प्यायल्यास भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.