जाहिरात

Health Tips: हे अमृतासमान पाणी प्यायल्यास मिळतील हजारो फायदे, अनेक रोगांवर रामबाण उपाय

Health Tips: डाएटमध्ये या पाण्याचा समावेश केल्यास कित्येक रोगांपासून सुटका मिळू शकते. हे पाणी अमृतासमान आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Health Tips: हे अमृतासमान पाणी प्यायल्यास मिळतील हजारो फायदे, अनेक रोगांवर रामबाण उपाय
Health Tips: अमृतासमान पाणी पिण्याचे अद्भुत फायदे

Coconut Water Benefits In Marathi: आरोग्य निरोगी राहावे, यासाठी फिटनेस फ्रीक मंडळी कित्येक उपाय करतात. काही जण डाएट फॉलो करतात तर काही जण नियमित व्यायाम करतात. याचाच एक भाग म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बरेच जण नारळाचे पाणी पितात. नारळ पाणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी आणि वर्कआऊट केल्यानंतर नारळाचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. रिकाम्या पोटी एक ग्लास नारळाचे पाणी प्यायल्यास आरोग्यास कित्येक लाभ मिळू शकतात. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती....

एकटेपणामुळे शरीरावर होतात हे गंभीर नकारात्मक परिणाम, जाणून घ्या काय करावे आणि काय करू नये?

(नक्की वाचा: एकटेपणामुळे शरीरावर होतात हे गंभीर नकारात्मक परिणाम, जाणून घ्या काय करावे आणि काय करू नये?)

नारळ पाणी प्यायल्यास आरोग्यास मिळतील इतके मोठे फायदे (Health Benefits Of Coconut Water)

1. सकाळी रिकाम्या पोटी नारळाचे पाणी प्यायल्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने वाटते.  
2. नारळाच्या पाण्यामध्ये कित्येक प्रकारचे व्हिटॅमिन्स, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सचा समावेश आहे.
3. कॅलरीज् आणि फॅट्सचे प्रमाण कमी असते, यामुळे रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्यास कित्येक रोगांपासून मुक्तता मिळू शकते. 
4. नारळाच्या पाण्यामध्ये लॉरिक अ‍ॅसिड असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 
5. वजन कमी होण्यासही मदत मिळते. 
6. पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्याकरिताही नारळाचे पाणी लाभदायक मानले जाते.  
7. नारळ पाण्यातील पोषणतत्त्वामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते.  
8. नारळाच्या पाण्यामध्ये कॅलरीज्, नैसर्गिक साखर आणि कार्बेहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते; यामुळे मधुमेहग्रस्तांनाही नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

तुपामध्ये या गोष्टींची होते भेसळ, खरेदी करताना हे ठेवा लक्षात

(नक्की वाचा: तुपामध्ये या गोष्टींची होते भेसळ, खरेदी करताना हे ठेवा लक्षात)

9. नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे किडनीशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते.  
10. नारळाच्या पाण्यातील पोषक घटक त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात, ज्यामुळे केस-त्वचेवर नैसर्गिक चमक येते. 
11. अतिप्रमाणात मद्याचे सेवन करणाऱ्यांच्या शरीरामध्ये पोटॅशिअमची कमतरता निर्माण होते, ही कमतरता भरून काढण्यासाठी नारळाचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.   
12. मूतखड्याच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नारळाचे पाणी प्यावे. यामळे पोटॅशिअम, युरिक अ‍ॅसिड यासारखी विषारी घटक सहजरित्या शरीराबाहेर फेकले जातात. 
13. हृदयविकारांशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळू शकते. एका संशोधनानुसार, नारळाच्या पाण्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते.
14. नारळाच्या पाण्यातील पोषकघटकांमुळे हृदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते. 

Hair Growth Tips: केस होतील लांबसडक, घनदाट आणि जाड! घरच्या घरी तयार करा हे 3 तेल

(नक्की वाचा: Hair Growth Tips: केस होतील लांबसडक, घनदाट आणि जाड! घरच्या घरी तयार करा हे 3 तेल)

15. नारळाच्या पाण्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरावर आणि शरीरांतर्गत सूज येण्याची समस्या कमी होऊ शकते. 
16. त्वचेवर येणारे मुरुम, पुरळांची समस्याही कमी होऊ शकते. 
17. नारळ पाण्यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम हे गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. शिवाय रक्तदाबाची समस्याही नियंत्रणात येण्यास मदत मिळते. 
18. स्नायू मजबूत होण्यासह पचनसंस्थेचे कार्यही सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
एकटेपणामुळे शरीरावर होतात हे गंभीर नकारात्मक परिणाम, जाणून घ्या काय करावे आणि काय करू नये?
Health Tips: हे अमृतासमान पाणी प्यायल्यास मिळतील हजारो फायदे, अनेक रोगांवर रामबाण उपाय
mumbai-wholesale-market-ghagra-choli-kurta-modi-jacket-navratri-cheapest-prices-check-details
Next Article
नवरात्रीसाठी 400 रुपयांमध्ये मिळतील घागरा चोळी आणि जॅकेट, मुंबईतल्या 'या' मार्केटला लगेच द्या भेट!