Heart Health: कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये आहे इतका मोठा फरक, दुर्लक्ष करू नका; अन्यथा...

Difference Between Cardiac Arrest And Heart Attack: हृदय निरोगी नसेल तर शरीरामध्ये दिसतात ही मोठी लक्षणे, या संकेतांकडे करू नका दुर्लक्षा अन्यथा...

जाहिरात
Read Time: 3 mins

- डॉ. ऋषी भार्गव, कार्डिओलॉजिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल

Difference Between Cardiac Arrest And Heart Attack: हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामुळे बहुतांश लोक हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्रासलेले आहेत. यामध्येही कित्येकांना कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोन्ही समस्या एकसारख्याच वाटतात. त्यामुळे औषधोपचारांमध्येही गोंधळ निर्माण होऊ शकतो. पण या दोन्ही समस्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोन्ही समस्यांमध्ये मोठा फरक आहे. या दोन्ही समस्यांची लक्षणे देखील पूर्णपणे वेगळी असतात. 

हृदयविकाराचा झटका येणे म्हणजे काय?

हृदयाचे कार्य सुरळीतपणे पार पडण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रक्ताची आवश्यकता असते. रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्यांद्वारेच हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा केला जातो. या धमण्यांमध्ये ब्लॉकेज म्हणजे अडथळे निर्माण झाल्यास ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत पोहोचणे बंद होते. पुरेशा प्रमाणात रक्त न मिळाल्यास हृदयाच्या पेशी हळूहळू मृत पाऊ लागतात. परिणामी हृदयाच्या कार्यक्षमतेवरही हळूहळू परिणाम होऊ लागतो. एक वेळ अशी निर्माण होते की त्यावेळेस हृदयाची कार्यक्षमता आवश्यकतेपेक्षा बरीच कमी होते. त्यामुळे हृदयावरील ताण वाढतो आणि हृदय कार्य करणे पूर्णपणे बंद करते, यालाच वैद्यकीय भाषेमध्ये 'हार्ट अटॅक' असे म्हणतात.

(नक्की वाचा: Navratri Diet: नवरात्रौत्सवादरम्यान वजन कमी करण्यासाठी खा हे पदार्थ, जाणून घ्या वेट लॉस डाएट प्लान)

    कार्डिअ‍ॅक अरेस्टची लक्षणे

    सडन कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये हृदयाचे ठोके थांबतात, रक्तदाब कमी होतो आणि मेंदूसह सर्व अवयवांच्या रक्तपुरवठ्याच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो. मेंदुला रक्तपुरवठा न झाल्यास रुग्णाची शुद्ध हरपते. अशा परिस्थितीत रुग्णाला वेळीच उपचारांसाठी रुग्णालयात दाखल न केल्यास मृत्यूचा धोका वाढतो. कार्डिअ‍ॅक अरेस्टची समस्या उद्भवण्यामागे हृदयाशी संबंधित कारणे असतीलच, असे गरजेचे नाही.

    Advertisement

    हृदयाचे असामान्य ठोके हे सडन कार्डिअ‍ॅक अरेस्टचे मुख्य कारण आहे, यास वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन (Ventricular Fibrillation) असेही म्हणतात. शरीरातील विद्युत आवेग हृदयाद्वारे पद्धतशीरपणे प्रसारित केले जातात. यामुळे हृदयातील चेंबर्सचे आकुंचन सुरू राहते. या चेंबर्सद्वारे शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा केला जातो.

    Advertisement

    (नक्की वाचा : Weight Loss Tips: रिकाम्या पोटी प्या या मसाल्याचे पाणी, चयापचयाची क्षमता सुधारण्यासह वजनही होईल झटकन कमी)

    हृदय निरोगी असण्याचे सर्वात मोठे लक्षण

    श्वासोच्छवास प्रक्रियेमध्ये त्रास निर्माण होणे हे लक्षण हृदयविकाराशी संबंधित आहे. अडचण येत नसेल तर तुमचे हृदय निरोगी आहे, असे समजा. हृदय निरोगी असेल तर शारीरिक क्रिया केल्यास तुम्हाला थकवा जाणवणार नाही. छातीमध्ये तीव्र स्वरुपात वेदना न होणे हे देखील निरोगी हृदयाचे लक्षण आहे. कारण छातीमध्ये दुखणे ही समस्या हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित असू शकते. 

    या पदार्थांचे सेवन करणं टाळा

    • उच्च सोडियमयुक्त आहारामुळे रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो. 
    • हृदय निरोगी राहावे, यासाठी आहारातून सोडियमचे प्रमाण कमी करावे. 
    • तेलकट-तुपकट, मिठाई, ट्रान्स फॅट्स, सॅच्युरेटेड फॅट्स, सोडियमयुक्त पदार्थ, रिफाइंड शुगर आहारातून वर्ज्य करावे. 
    • हवाबंद डब्यातील पदार्थ, मद्यसेवन, फास्ट फूड आणि जंक फूडचे सेवन करणे टाळा.

    (नक्की वाचा: Health Tips: हे अमृतासमान पाणी प्यायल्यास मिळतील हजारो फायदे, अनेक रोगांवर रामबाण उपाय)

    हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणते व्यायाम करावे?

    • हृदय निरोगी राहावे, यासाठी नियमित व्यायाम करावा.
    • तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कार्डिओ एक्सरसाइज करावा.  
    • कार्डिओ एक्सरसाइजमध्ये चालणे, जॉगिंग आणि सायकलिंग या गोष्टींचा समावेश असतो. 
    • कार्डिओ एक्सरसाइजमुळे हृदयाची गती वाढते आणि हृदयाच्या स्नायूंचाही व्यायाम होतो. 
    • कठीण स्वरुपातील व्यायाम करणे टाळावे. 

    Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.