जाहिरात

Chandra Grahan 2026: होळीवर चंद्रग्रहणाचं सावट, 12 राशींवर काय होणार परिणाम? कोणी सतर्क राहावं? सविस्तर माहिती

Holi Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणाचा 12 राशींवर काय परिणाम होऊ शकतो आणि कोणत्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी? याबाबत ज्योतिषी आणि वास्तूतज्ज्ञ राकेश चतुर्वेदी यांच्याकडून माहिती जाणून घेऊया..

Chandra Grahan 2026: होळीवर चंद्रग्रहणाचं सावट, 12 राशींवर काय होणार परिणाम? कोणी सतर्क राहावं? सविस्तर माहिती
"Holi Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणाचा 12 राशींवर काय होणार परिणाम?"
Canva

Holi Chandra Grahan 2026: यंदा रंगांचा उत्सव होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा विशेष योग जुळून आला आहे. ज्योतिषाचार्य आणि वास्तूतज्ज्ञ राकेश चतुर्वेदी यांच्या मते, ग्रहणाचा काळ आध्यात्मिकदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक स्थिती, आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक निर्णयांवर होऊ शकतो. 3 मार्च रोजी चंद्रग्रहण दुपारी 3.21 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 6.47 वाजता समाप्त होईल. हे ग्रहण आशिया-ऑस्ट्रेलिया पॅसिफिक बेटे आणि उत्तर-दक्षिण अमेरिकेतून दिसणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ग्रहणाचा प्रभाव थोडाफार वेगळा असू शकतो, पण सर्वसाधारणपणे हा काळ मानसिक अस्थिरता वाढवणारा मानला जातो. अनेकांना निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. झोपेवर परिणाम होऊ शकतो आणि भावना अधिक संवेदनशील होऊ शकतात. काही लोक नकारात्मक विचारांनीही ग्रस्त होऊ शकतात. त्यामुळे या काळात शांत राहणे आणि घाईगडबड टाळणे आवश्यक आहे.

चंद्रग्रहणाचा 12 राशींवर काय होणार परिणाम?

5 मार्च 2026 रोजी नवपंचम राजयोग तयार होणार असून 5 राशींचे नशीब बदलू शकते. करिअर आणि पैसा कमावण्यासाठी सुवर्णसंधी निर्माण होऊ शकते.

चंद्रग्रहणाचा 12 राशींवर काय परिणाम होऊ शकतो आणि कोणी विशेष काळजी घ्यावी, याबाबत ज्योतिषी तसेच वास्तूतज्ज्ञ राकेश चतुर्वेदी यांच्याकडून माहिती जाणून घेऊया... 

राशीनुसार संभाव्य परिणाम

1. मेष रास 
मेष राशीच्या लोकांमध्ये चिडचिडेपणा आणि राग वाढू शकतो. वाद टाळावे आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी.

2. वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांना खर्च किंवा पैशांबाबत चिंता वाटू शकते. गुंतवणूक टाळावी आणि बजेटकडे लक्ष द्यावे.

3. मिथुन रास
मिथुन रास असणाऱ्या लोकांच्या नातेसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात. बोलताना विचारपूर्वक संवाद साधावा.

4. कर्क रास
कर्क राशीचे लोक अधिक भावनिक होऊ शकतात. ध्यान आणि प्रार्थना केल्याने मनःशांती मिळेल.

5. सिंह रास
सिंह राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी ताण जाणवू शकतो. वरिष्ठांशी वाद टाळावे.

6. कन्या रास
कन्या राशीच्या लोकांना थकवा किंवा आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या जाणवू शकतात. दिनचर्या संतुलित ठेवावी.

7. तूळ रास
तूळ राशीच्या प्रेमसंबंधांमध्ये दुरावा किंवा मतभेद होऊ शकतात. मोठे निर्णय घेणे टाळावे.

(नक्की वाचा: Holi 2026 News: घरच्या घरी होलिका पूजन कसे करावे? पूजा साहित्य-विधी, संकल्प, राखेच्या उपयोगापर्यंत वाचा संपूर्ण माहिती)

8. वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांना कौटुंबिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. घरातील वातावरण शांत ठेवावे.

9. धनु रास
धनु राशीच्या लोकांच्या प्रवासाच्या योजनांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. आवश्यकता नसल्यास प्रवास पुढे ढकलावा.

10. मकर रास
मकर राशीच्या लोकांवर आर्थिक ताण वाढू शकतो. मोठे खर्च सध्या टाळावे.

11. कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांमधील आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होऊ शकते. विचार सकारात्मक ठेवावे.

12. मीन रास
मीन राशीचे लोक मानसिक अस्थिरता अनुभवू शकतात. मंत्रजप आणि ध्यान करणे उपयुक्त ठरेल.

चंद्रग्रहण कोणत्या राशींना लाभणार? पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांनी काय सांगितलं ऐका VIDEO 

(नक्की वाचा: Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? काय करावे, काय टाळावे? ग्रहणाचा वेधकाळ, जाणून घ्या दाते पंचांगानुसार माहिती)

कोणत्या लोकांनी अधिक सावध राहावे? 
  • गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
  • जे लोक आधीपासून मानसिक तणावाचा सामना करत आहेत, त्यांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी.
  • ज्यांच्या कुंडलीत चंद्राची महादशा किंवा अंतर्दशा सुरू आहे, त्यांनीही सावधगिरी बाळगावी.
चंद्रग्रहणाच्या काळात काय करावे?
  • ज्योतिषांच्या मते ग्रहणाच्या काळात शांत वातावरणात मंत्रजप किंवा ध्यान करणे लाभदायक मानले जाते.
  • घरात तुळशीचे पाणी किंवा गंगाजल शिंपडावे.
  • ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे आणि आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करावे.
  • चंद्र मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप मन स्थिर ठेवण्यास मदत करू शकतो.
  • एकूणच हा काळ संयम आणि सकारात्मक विचार राखण्याचा आहे. घाबरू नका, धैर्य ठेवा आणि विचारपूर्वक पावले उचला. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com