घनदाट-लांबसडक केसांसाठी तज्ज्ञांनी सांगितले मॅजिकल टॉनिक, काही मिनिटांत होईल तयार

घरच्या घरी उपाय केल्यास केसांसाठी एक नव्हे तर अनेक फायदे मिळू शकतील. केसांसाठीचे असेच एक रामबाण टॉनिक घरच्या घरी कसे तयार करायचे? याची माहिती जाणून घेऊया.

Advertisement
Read Time: 2 mins
केसांसाठी फायदेशीर आहे हे मॅजिकल टॉनिक

Hair Growth: केसांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास केसांशी संबंधित कित्येक समस्या उद्भवू शकतात. काही जण केसगळतीमुळे तर काही लोक पातळ केसांच्या समस्येमुळे त्रस्त असतात. घनदाट व लांबसडक केसांसाठी तुम्ही देखील विविध उपाय करत आहात का? तर तज्ज्ञांनी सांगितलेला हा रामबाण उपाय नक्कीच करून पाहा. इन्स्टाग्रामवरील 'jennyxo_x' या पेजवर केसांसाठी घरगुती उपाय सांगणारा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हे मॅजिकल टॉनिक कसे तयार करायचे आणि केसांसाठी याचा वापर कसा करायचा? याबाबतची माहिती देण्यात आली आहे.   

(नक्की वाचा: वारंवार हेअर डाय केल्याने होतात हे 6 तोटे, पैसे वाया जातात शिवाय केसांचे होते मोठे नुकसान)

केसांसाठी होममेड हेअर टॉनिक (Homemade Hair Tonic For Hair Growth )

हेअर टॉनिक तयार करण्यासाठी रोजमेरी (Rosemary), पुदिना, लवंग आणि पाणी ही सामग्री आवश्यक आहे. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये थोडेसे रोजमेरी, आवश्यकतेनुसार लवंग आणि पुदिन्याची 8 ते 9 पाने घ्या व त्यामध्ये एक ग्लास पाणी मिक्स करावे. थोड्या वेळासाठी सर्व साग्रमी पाण्यात भिजत ठेवा. थोड्या वेळाने हे पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. तयार झाले आहे मॅजिकल टॉनिक. या हेअर टॉनिकचा योग्य पद्धतीने वापर केल्यास केसांची वाढ होण्यास मदत मिळेल तसेच केस घनदाट आणि चमकदारही होतील. केसांच्या वाढीसाठी हा रामबाण उपाय ठरू शकतो. 

(नक्की वाचा: Hair Growth Tips: लांबसडक व घनदाट केस हवेत? या 6 फळांचे करा सेवन)

केसांसाठी हे देखील उपाय ठरतील फायदेशीर  

  • केसांच्या वाढीसाठी नारळाच्या तेलाने मसाज करू शकता. 
  • नारळाचे तेल हलकेसे गरम करून टाळू व केसांवर लावा. 
  • तुमचे केस तेलकट असतील तर तेल केवळ एक तासाकरिता लावा आणि सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. 
  • केस कोरडे असल्यास तेल रात्रभर लावून ठेवू शकता. 
  • ग्रीन टी उकळून थंड करा आणि या पाण्याने हेअर वॉश करा. लांबसडक केसांसाठी हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. 
  • एक कप गरम पाण्यामध्ये दोन ग्रीन टी बॅग्सचा वापर करू शकता. आठवड्यातून दोन ते तीन वेळा उपाय करू शकता. 
  • दोन ते तीन आवळा किसून तेलामध्ये गरम करा. यासाठी आपण नारळ किंवा बदामाचे तेल वापरू शकता. 
  • आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास केसांची चांगली वाढ होऊ शकते. 
  • मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मेथीचे दाणे वाटून घ्या. 
  • मेथीच्या हेअर पॅकमुळे केसांना खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो आणि केसांची वाढही चांगली होते. 
  • आठवड्यातून दोन वेळा आपण हा उपाय करू शकता. 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Topics mentioned in this article