जाहिरात

Housewife Story: अशक्तपणा आणि चक्कर, माझ्या गंभीर आजाराकडे पतीसह सासरच्यांनी केलं दुर्लक्ष; वाचा 'ती'ची कहाणी

Women Health News: एका गृहिणीच्या संघर्षाची ही सत्यकथा तुम्हाला तिच्या आरोग्याबद्दल सतर्क करेल. थकवा, चक्कर येणे आणि अशक्तपणा याकडे दुर्लक्ष करणे कसे जीवघेणे ठरू शकते, हे या कथेतून शिका.

Housewife Story: अशक्तपणा आणि चक्कर, माझ्या गंभीर आजाराकडे पतीसह सासरच्यांनी केलं दुर्लक्ष; वाचा 'ती'ची कहाणी
"Housewife Real Story: लो बीपीचे लक्षण वाटलं सामान्य, पण रिपोर्टमध्ये आढळलं गंभीर कारण"
NDTV Marathi

Real Life Story of a House Wife | Real Life Experience: सकाळचे 6 वाजले आहेत आणि ती विचार करत आहे की नाश्त्यासाठी काय तयार करू? पीठ मळलंय आणि बटाटे उकडलेले आहेत. सर्वांची मागणी 'बटाट्याचा पराठा' करण्याची आहे. सर्व तयारी झाली आहे, पण न जाणो का, आज तिचे पराठे तयार करण्याचं मन नाही. ती किचनच्या खिडकीतून बाहेरील पेरूचं झाड पाहतेय, जे तिने स्वतः लावलं होतं. पण आज ते तिला नीट दिसत नाहीय, त्याची पाने सुकलेली आहेत. 

मागील आठवड्याभरापासून ती काहीसे विचित्र अनुभवत होती. तिला डोके जड वाटत होते, जणू डोक्यावर एखादा मोठा दगड ठेवलाय. तिला काहीच खावेसे वाटत नव्हते, काहीही न खाल्ल्याने तिला तिला चक्कर येत होती. असे असूनही ती सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतची जबाबदारी चोख पार पाडत होती.

सर्वांची काळजी घेणार 'ती', 'ती'ची काळजी कोण घेणार?

कडाक्याच्या थंडीत मुलांना सकाळी उठवून शाळेत पाठवणे, त्यांच्या आवडीचे जेवण तयार करणं असो किंवा पतीसाठी हेल्दी ब्रेकफास्ट किंवा लंच तयार करणे असो, घरातलं कोण जेवलंय आणि कोण नाही? सासूसासऱ्याने औषधं घेतली की नाहीत? पतीला कोणती भाजी आवडत नाही वगैरे तिला सर्व काही माहिती असते. 

पण गेल्या तीन दिवसांपासून तिला काही खाण्याची इच्छा का होत नाहीय, याची विचारपूस करणारं कोणीही नाही. तिने सासूलाही म्हटलं होतं की, "आई कळत नाहीय डोकं का गरगरतंय, बसून उठल्यानंतर चक्कर येते आणि काहीही खाण्याची इच्छा होत नाही..."

सासूनं तोंड फिरवून हळून आवाजात म्हटलं होतं की, "कामचुकारपणा आहे, पलंगावर बसल्याबसल्या सर्व काही हवंय". 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

पती घरी आल्यानंतर सासूने चार आणखी गोष्टींसह म्हटलं की, ''महाराणी म्हणतेय की चक्कर येतेय, काही खाण्याची इच्छा नाही. इच्छा होईल तरी कशी इतके वाईट जेवण तयार करते, कोणाचीच इच्छा होत नाही हिच्या हातचा स्वयंपाक खाण्याची..."

पती जेव्हा बेडरूममध्ये पोहोचले तेव्हा ती काहीतरी आकडेमोड करत होती. चक्कर, झोप, शरीर थंड होणे, ओठ कोरडे पडणे, श्वास अडकणे, लो बीपी, पोटात कळ येणे आणि डोळे पिवळे होणे ही सर्व लक्षणे तिला स्वतःमध्ये दिसत होती. यानंतर तिने स्वतःला म्हटलं की, आज हे (पती) घरी येतील तेव्हा त्यांना सर्व सांगेन आणि गरज असेल तर डॉक्टरकडे जाऊ. इतक्यात पतीने विचारलं की, काय झालं? घडला प्रकार सांगितल्यानंतर पतीने म्हटलं की, "तू उगाच अतिविचार करतेय"

मागून सासू ओरडत म्हणाली की तिच्या आजारपणामागील खरं कारण कामापासून बहाणा शोधणे आहे. पतीने सासूला शांत केले पण तो देखील त्याच्या आईशी सहमत असल्यासारखं वाटलं. पतीने हात पुढे करत एक कॅल्शिअमची गोळी तिला दिली आणि म्हटलं की, "संध्याकाळपर्यंत थोडा आराम कर आणि आज रात्रीचं जेवण थोडं उशीराने कर..."

अचानक ती बेशुद्ध पडली आणि शरीर बर्फासारखी थंड पडली 

तिनं गोळी घेतली आणि झोपी गेली. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर तिला स्वयंपाक करण्यासाठी आवाज येऊ लागला, ती उठली नाही. तिला जबरदस्तीने उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा ती बेशुद्ध झाल्याचे समजले. घाईघाईत तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. तिचे शरीर बर्फासारखे थंड पडले होते. 

डॉक्टरकडे पोहोचलो त्यावेळेस तिला शुद्ध आली होती, तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसत होत्या. ती व्यवस्थित बसू देखील शकत नव्हती आणि रडत होती. पण तिच्यासोबत असलेल्या पतीने आरामात म्हटलं की, "हिला फक्त कॅल्शिअमच्या काही गोळ्या दे, सर्व ठीक आहे. तिच्या डोक्याचे खेळ आहेत, रोजचं नाटक"

तिच्या सासूचं म्हणणं होतं की ती नाटक करतेय कारण तिला घरातली कामं करायची नाही. ती महिला गपचूप आपलं पोट पकडून बसली होती, तिची हिंमत उत्तर देत होती. 

डॉक्टरांना शंका आणि त्यानंतर रहस्य उघड झालं. कुटुंबीय वारंवार डॉक्टरांवर दबाव आणत होतं की तिला स्वस्तातील औषधं देऊन घरी पाठवा. पण डॉक्टरांनी महिलेचे चेकअप सुरू केले. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

वैद्यकीय तपासणीमध्ये धक्कादायक माहिती उघड 

  • ब्लड प्रेशर (BP): केवळ 80/50 (अतिशय कमी)
  • नाडी (Pulse): अतिशय जलद  
  • शरीर: बर्फासारखं थंड पडले होते 
  • श्वास : फारच उथळ आणि कमकुवत होते

कुटुंबीयांचे टोमणे सुरू असतानाही डॉक्टरांनी तातडीने हिमोग्लोबिन टेस्ट करण्यास सांगितलं. काही मिनिटांत लॅब टेक्नीशिअन पळत आला आणि रिपोर्ट सुन्न करणारा होता. महिलेच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी केवळ 4.2 g/dL इतकीच होती. ती नाटक करत नव्हती तर तिचे शरीर साथ देत नव्हते.  

(नक्की वाचा: Brown Period Blood: पीरियड्सपूर्वी तपकिरी रंगाचं रक्त येतं का? धोकादायक की सामान्य लक्षण? जाणून घ्या तुमच्या आरोग्याविषयी सर्व काही)

अशक्तपणा आणि चक्कर येण्याच्या समस्येस ओव्हरथिकिंग समजण्याची चूक 

परिस्थिती इतकी बिघडली होती की महिलेला तातडीने ICU मध्ये दाखल करण्यात आले. तिला रक्त चढवण्यात आलं आणि औषधोपचार सुरू करण्यात आले. अल्ट्रासाउंडमध्ये अ‍ॅनिमियाच्या समस्येसह सेप्टिक शॉक असल्याचे लक्षात आले. ही एक अशी परिस्थिती होती जेथे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. जेव्हा उपचार सुरू झाले, तेव्हा तिचा नवरा, जो तिला 'अतिविचार करणारी' म्हणून हिणवत होता, तो दगडासारखा स्तब्ध झाला. त्या महिलेच्या डोळ्यांत डॉक्टरांना एक विचित्र प्रकारचा दिलासा जाणवला की निदान कोणीतरी तिच्या वेदनेवर विश्वास ठेवत आहे.

पतीने डॉक्टरांना विचारलं की सेप्टिक शॉक म्हणजे काय असते?

डॉक्‍टरने सांगितलं की, "सेप्टिक शॉक एक जीवघेणी मेडिकल इर्मजन्सी आहे, जी सेप्सिसचे एक गंभीर रुप घेऊ शकते; ही परिस्थिती शरीरातील संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या सूज वाढल्याने निर्माण होते. ही सेप्सिसची सर्वात गंभीर अवस्था मानली जाते. संसर्ग रक्तप्रवाहामध्ये पसरून शरीराच्या महत्त्वपूर्ण अंगापर्यंत ऑक्सिजन आणि पोषणतत्त्वांच्या पुरवठ्याची प्रक्रिया प्रभावित करते. यामुळे शरीराचे महत्त्वाचे अवयव फुफ्फुस, किडनी आणि यकृतापर्यंत रक्तपुरवठा होण्यास अडथळे होतात, ज्यामुळे अवयव काम करणं बंद करू शकतात आणि मृत्यू देखील होऊ शकतो"

डॉक्‍टरांनी पुढे सेप्टिक शॉकची काही लक्षणंही सांगितली:

  • कमी रक्तदाब (Low Blood Pressure): रक्तदाब इतका कमी होतो की शरीराच्या अवयवांपर्यंत रक्त पोहोचत नाही. 
  • हृदयाचे ठोके वाढणे (Rapid Heart Rate): हृदयाची धडधड जलदगतीने होते. 
  • श्वास घेणे कठीण होते (Difficulty Breathing): श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत अडथळे येतात. 
  • चक्कर किंवा मानसिक स्थिती बदलणे (Confusion/Altered Mental State): रुग्ण गोंधळून जाऊ शकतो किंवा बेशुद्ध होऊ शकतो.
  • त्वचा थंड किंवा चिकट होणे (Cold, Clammy Skin) 
  • लघवी कमी होणे (Decreased Urine Output): किडनी खराब झाल्यास लघवी कमी प्रमाणात होते. 

डॉक्‍टरांनी सांगितलं की, ही परिस्थिती साधारणतः एखादा संसर्ग उदाहरणार्थ निमोनिया, मूत्रमार्गसंसर्ग (UTI), त्वचा संसर्ग किंवा पोटाच्या संसर्गामुळे सुरू होऊ शकतो.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

सेप्टिक शॉक एक मेडिकल इर्मजन्सी आहे, ज्यामध्ये तातडीने हॉस्पिटल किंवा विशेषतः  ICUमध्ये उपचार करण्याची आवश्यकता आहे. वेळेवर उपचार न झाल्यानंतर रुग्णाचा जीव जाऊ शकतो, असेही डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्‍टर  ICUकडे जाऊ लागले आणि मधेच थांबून म्हणाले की,  "तुम्हाला कळतंय का, वेळेवर उपचार न झाल्यास ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते. या मेडिकल इर्मजन्सीला नाटक किंवा कामचुकारपणा नाही"

पतीने नजर खाली केली आणि शांत उभार राहिला. 

(नक्की वाचा: Women Health News: महिलांनो सावधान! एकाच महिन्यात दोनदा येणारे पीरियड्स बनू शकतात या धोकादायक आजाराचे कारण)

डॉक्टर थक्क झाले. निघताना ते स्वतःशीच म्हणाले, "वैद्यकीय शिक्षणादरम्यान आम्हाला सर्व काही शिकवले गेलंय पण हे सांगितले गेले नाही की कधीकधी रुग्णाचे स्वतःचे कुटुंबच उपचारांमध्ये सर्वात मोठा अडथळा ठरते."

तो पुढे म्हणाले, "कधीकधी डॉक्टरांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे, संपूर्ण जग एखाद्या रुग्णाला खोटारडा समजत असले तरी त्याच्यावर विश्वास ठेवणे हेच असते."

ही गोष्ट आपल्या देशातील हजारो महिलांसाठी खरी असू शकते आणि कदाचित ती असेलही... मला प्रश्न पडतो की, किती डॉक्टर दररोज अशी प्रकरणे पाहत असतील. घरातील महिलांच्या आरोग्याबाबत दक्ष राहण्याची गरज आहे. केवळ कुटुंबातील सदस्यांनीच नव्हे तर महिलांनी स्वतःसुद्धा स्वतःसाठी पुढे येऊन जबाबदारी घ्यायला हवी.

ती महिला बरी झाली आणि घरी परतली. तिने अंगणातील पेरूच्या झाडाकडे नजर टाकली. ते कोमेजले होते. ती क्षणभर थांबली आणि तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या लक्षात आले की, गेल्या तीन आठवड्यांपासून पाणी न घातल्यामुळे ते झाड सुकत होते. तिचा उदास चेहरा पाऊन नवरा पाण्याचे भांडे घेऊन झाडाकडे धावत गेला आणि झाडाला पाणी घातले. हसत त्याने म्हटलं की, "आता सर्व हिरवंगार होईल. माझ्या चुकांबद्दल मला माफ कर..." तिने नवऱ्याकडे पाहिले आणि तिच्या मनात काहीतरी अंकुर फुटल्यासारखे तिला वाटले. त्या अंकुराचा सुगंध तिच्या चेहऱ्यावर हास्यासारखा पसरला आणि ती घराच्या दिशेने निघाली...

आरोग्य संदेश: जर तुम्हाला सतत अशक्तपणा, चक्कर येणे किंवा अंग थंड पडणे जाणवत असेल तर स्वतःला दोष देण्याऐवजी किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com