Smartwatch Feature: स्मार्टवॉच सोडवणार सिगारेट ओढण्याचं व्यसन, काय आहे नवी टेक्नोलॉजी?

Tech News : ब्रिस्टल विद्यापीठातील (University of Bristol) शास्त्रज्ञांनी एक स्मार्टवॉच ॲप तयार केले आहे. जे तुम्हाला सिगारेट ओढण्याच्या सवयीपासून मुक्त होण्यास खूप मदत करू शकते. शास्त्रज्ञांनी तयार केलेले हे ॲप कसे काम करते ते समजून घेऊया.

जाहिरात
Read Time: 2 mins

स्मार्टवॉच फॅशनसह फिटनेस फ्रेंडली देखील ठरत आहे. स्मार्टवॉचमधील अनेक फीचर फिट राहण्यासाठी फायदेशीर ठरतात. आरोग्याची काळजी घेण्यासोबतच  स्मार्टवॉचचा आणखी एक फायदा समोर आला आहे. स्मार्टवॉचमुळे सिगारेट ओढण्याची सवय घालवली जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी एक ॲप तयार केले आहे जे तुम्हाला धूम्रपानाच्या व्यसनापासून मुक्त करू शकते.

ब्रिस्टल विद्यापीठातील (University of Bristol) शास्त्रज्ञांनी एक स्मार्टवॉच ॲप तयार केले आहे. जे तुम्हाला सिगारेट ओढण्याच्या सवयीपासून मुक्त होण्यास खूप मदत करू शकते. शास्त्रज्ञांनी तयार केलेले हे ॲप कसे काम करते ते समजून घेऊया.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

टेक्नोलॉजी कशी काम करणार?

सध्या बाजारात स्मार्टवॉच आहेत, ज्यामध्ये एक्सलेरोमीटर (Accelerometer sensor) आणि जायरोस्कोप सेन्सरची (Gyroscopic sensor)सुविधा असते. शास्त्रज्ञांनी बनवलेले ॲप या सेन्सर्सचा वापर करून तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. विशेष बाब म्हणजे सेन्सर काही मिनिटांत सिगारेट ओढण्याची क्रिया ओळखू शकतो. अशा स्थितीत जेव्हा एखादी व्यक्ती सिगारेट ओढण्याचा प्रयत्न करते, तेव्हा स्मार्टवॉच त्याला लगेच अलर्ट पाठवते. तुम्हाला हा अलर्ट स्क्रीनवर व्हायब्रेशन आणि मोटिव्हेशनल मेसेजसह मिळेल.

(नक्की वाचा - शेअर मार्केटचं वेड, 4 कोटींचा नफा; सत्य समजताच उच्च न्यायालयाच्या वकिलांना बसला धक्का! )

जर्नल ऑफ मेडिकल इंटरनेट रीसर्च (JMIR) फॉर्मेटिव्ह रीसर्चमध्ये नुकतेच प्रकाशित झालेल्या या तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी 18 जणांची निवड करण्यात आली होती. रीसर्चमध्ये सहभागी झालेल्यांनी दोन आठवडे स्मार्टवॉच वापरले. ज्यामध्ये प्रत्येक वेळी त्याने सिगारेट ओढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला रिअल टाइम अलर्ट मिळाला. विशेष प्रकारच्या प्रेरणादायी मेसेजमुळे त्यांची सवय नियंत्रित करण्यात खूप मदत झाली.

Advertisement

(MCOCA Act: मोक्का कधी लागतो? कठोर शिक्षेची तरतूद असलेला हा कायदा नेमका आहे तरी काय? वाचा..)

स्मार्टवॉचची निवड का केली?

शास्त्रज्ञांनी तयार केलेले हे अॅप स्मार्टफोनमध्येही वापरले जाऊ शकत होते. मात्र स्मार्टवॉच या तंत्रज्ञानासाठी का निवडले गेले असाही प्रश्न अनेकांना पडला. यामागचं कारण असं की, स्मार्टवॉच नेहमी मनगटावर असते आणि ते ताबडतोब अलर्ट पाठवू शकते. हे करण्यासाठी स्मार्टफोन्स तितकेसे प्रभावी नाहीत. कारण ते नेहमी वापरात नसतात.

Topics mentioned in this article