जाहिरात

Indian Army : सैन्यात डॉक्टर कसं व्हायचं? काय आहे पात्रता? वाचा संपूर्ण माहिती

Indian Army : सैन्यात डॉक्टर कसं व्हायचं? काय आहे पात्रता? वाचा संपूर्ण माहिती
मुंबई:

How to become a Doctor in the Indian Army: आपण डॉक्टर व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते जीवतोड कष्ट देखील घेतात. पण, सैन्यात डॉक्टर होण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे का? सैन्यात डॉक्टर झाल्यानंतर देशसेवेची संधी मिळते. त्याचबरोबर चांगला पगार आणि सुरक्षित भविष्याचाही फायदा होतो.

भारतीय सैन्यात डॉक्टरांची रँक अन्य आर्मी ऑफिसर्सच्या समान असते. त्यांना निवृत्तीनंतर फायदा, फॅमिली पेन्शन, ग्रेच्युटी, वैद्यकीय उपचार, मोफर रेशन यासारख्या सुविधा मिळतात. डॉक्टर होण्यासाठी काय करायचं हे साधरणत: सर्वांना माहिती असते. आम्ही तुम्हाला सैन्यात डॉक्टर होण्यासाठी काय करायचं हे सांगणार आहोत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

12 वी नंतर मेडिकलचा अभ्यास 

डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला 12 वी नंतर मेडिकलचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी प्रवेश परीक्षा पास व्हावी लागते. NEET Exam परीक्षेत पास झाल्यानंतर तुम्हाला MBBS, BDS सारख्या पदवीपूर्वी अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी NEET परीक्षेत मिळालेल्या मार्कांच्या आधारावरच मेडिकलमध्ये प्रवेश मिळतो. तुम्हाला आर्मीमध्ये डॉक्टर व्हायचं असेल तर AFMC मध्ये प्रवेश घ्यावा लागेल. 

AFMC मध्ये घ्यावा लागतो प्रवेश

भारतीय सैन्यात डॉक्टर होण्यासाठी आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज  (AFMC) पुणेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. NEET Exam मध्ये मिळालेल्या मार्कांच्या आधारावर या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. या परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले तरच या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. AFMC ही देशातील नावाजलेली संस्था आहे. भारतीय लष्कराकडून याची देखरेख केली जाते. 

( नक्की वाचा : कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं? )
 

किती असतो कटऑफ?

AFMC साठी कटऑफ दरवर्षी सारखा नसतो. तो दरवर्षी बदलतो. गेल्या काही वर्षांमधील कटऑफचा विचार केला जर जनरल कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 600 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर ते पुरेसं मानलं जातं. 

NEET परीक्षा पास झाल्यानंतर...

NEET परीक्षा पास झाल्यानंतर सर्व उमेदवारांना (Candidates) मुलाखत  (Interview)  आणि मेडिकल टेस्ट  (Medical Test)  देखील पास करावी लागते.

AFMC मध्ये दरवर्षी MBBS च्या अभ्यासक्रमासाठी 150 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामध्ये 115 जागा मुलांसाठी तर 30 मुलींसाठी राखीव असतात. तर 5 जागांवर विदेशी विद्यार्थ्यांना (Foreign student) प्रवेश दिला जातो.

सैन्यात डॉक्टर होण्याचे 2 प्रकार

सैन्यात डॉक्टर होण्याच्या दोन प्रकार आहेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) आणि परमनंट कमिशन (PC) जे उमेदवार पूर्वीपासूनच MBBS किंवा BDS पदवीधर आहेत ते भारतीय भूदल/नौदल/वायूदलमध्ये शॉर्ट कमिशनच्या माध्यमातून भरती होण्यासाठी अर्ज करु शकतात. 

दुसरा प्रकार आहे परमनंट कमिशन. 12 परीक्षा पास झाल्यानंतर NEET परीक्षा देणाऱ्यांसाठी हा प्रकार आहे. NEET मध्ये मिळालेल्या मार्कांच्या आधारावर AFMC मध्ये प्रवेश मिळतो. AFMC मधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्थायी स्वरुपात तीन सैन्यापैकी एखाद्या ठिकाणी डॉक्टर म्हणून नियुक्त केले जाते. 

सैन्यात डॉक्टर होण्याचे फायदे

AFMC मध्ये शिक्षण घेतलं तर मोफत वैद्यकीय शिक्षण, चांगला पगार, थेट सैन्यात अधिकारी होण्याची संधी आणि समाजात खास सन्मान मिळतो. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: