जाहिरात
Story ProgressBack

तुमच्या मुलाला या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर सैन्यात अधिकारी होणं निश्चित! 

या महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो, त्याचं आर्मीमध्ये अधिकारी होणं निश्चित मानलं जातं. तुम्हालाही सैन्यात जाण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी उपयुक्त आहे. 

Read Time: 2 min
तुमच्या मुलाला या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर सैन्यात अधिकारी होणं निश्चित! 
नवी दिल्ली:

Indian Army AFMC Admission 2024: महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर एखादी चांगली नोकरी मिळावी, असं सर्वसामान्यपणे सर्वांचंच स्वप्न असतं. यासाठी मुलं मन लावून अभ्यास करतात. काही मुलं तर बारावीनंतरच तयारी सुरू करतात.  आज तुम्हाला आर्म्ड फोर्स मेडिकल महाविद्यालयात (AFMC) बद्दल सांगणार आहोत. या महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो, त्याचं आर्मीमध्ये अधिकारी होणं निश्चित मानलं जातं. तुम्हालाही सैन्यात जाण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी उपयुक्त आहे. 

AFMC  महाविद्यालयाची स्थापना कशी झाली?
एएफएमसी म्हणजेच आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची स्थापना 1 मे 1948 रोजी झाली. ही या देशाची प्रमुख वैद्यकीय संस्था आहे. येथे अभ्यासाबरोबरच वैद्यकीय पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, नर्सिंग ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट, डेंटिस्ट पोस्ट ग्रॅज्युएट आणि पॅरामेडिकलचं प्रशिक्षण दिलं जातं. AFMC हे आशिया खंडातील कोणत्याही देशाच्या सशस्त्र दलाने स्थापन केलेले पहिले वैद्यकीय महाविद्यालय आहे. ही संस्था सशस्त्र दलांसाठी विशेषज्ञ आणि बहु-विशेषज्ञांच्या गटांना प्रशिक्षण देते.

सैन्यात कमिशंड अधिकारी म्हणून रुजू...
AFMC मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कमिशंड अधिकारीच्या रुपात सेवा देण्याची संधी मिळते. कमिशनचा प्रकार उपलब्ध असलेल्या रिक्त पदांवर अवलंबून असतो. उमेदवारांच्या पालकांनी प्रवेशाच्या वेळी बाँड करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक असते. 

कसा मिळतो प्रवेश
एमबीबीएसमध्य प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत. यासाठी काही नियमावली पूर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवार भारताचा नागरिक असायला हवा किंवा नेपाळ वा भूटानचा नागरिक असायला हवा. तो भारतीय मूळ वंशाचा असावा. जो भारतात कायम वास्तव्यासाठी आले असेल. उमेदवार अविवाहित असावा.  कोर्सदरम्यान लग्न करण्याची परवानगी नाही. सरकारच्या अटींनुसार, वैद्यकीयदृष्ट्या फिट असायला हवा. 

प्रवेशासाठी योग्यता...
उमेदवाराला नियमित अभ्यास पूर्ण करायला हवा. तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यासह पहिल्या प्रयत्नात निवडलेल्या सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विज्ञान विषयात ६० पेक्षा कमी गुण नसावेत. त्याशिवाय इंग्रजीत ५० टक्के, विज्ञानाच्या प्रत्येक विषयात ५० टक्क्यांहून कमी गुण असू नयेत. या महाविद्यालयात एकूण १३० मुलांना प्रवेश मिळतो. यात १०५ मुले आणि २५ मुली आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना नीट परीक्षाही उत्तीर्ण करावी लागते. 
 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination