जाहिरात

पोट स्वच्छ होत नाही? दह्यात ही गोष्ट मिक्स करुन खा, आतड्यांच्या प्रत्येक कोपऱ्यातून घाण येईल बाहेर

How To Clean Stomach Naturally At Home: पोट स्वच्छ होत नाही,अशी बहुतांश लोकांची तक्रार असते. पोट स्वच्छ नसेल तर संपूर्ण शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. डाएटमध्ये दोन गोष्टींचा समावेश केल्यास पोटाशी संबंधित सर्व समस्यांपासून सुटका मिळू शकेल.

पोट स्वच्छ होत नाही? दह्यात ही गोष्ट मिक्स करुन खा, आतड्यांच्या प्रत्येक कोपऱ्यातून घाण येईल बाहेर
How To Clean Stomach Naturally At Home: पोट स्वच्छ करण्यासाठी रामबाण उपाय

How To Clean Stomach Naturally At Home: पोट स्वच्छ होणे हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असते. पोट स्वच्छ झाले नाही तर पोटाशी संबंधित गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ बद्धकोष्ठता, अपचन, गॅस इत्यादी. इतकंच नव्हे तर यामुळे शरीराच्या ऊर्जेवर दुष्परिणाम होतात. 

पण योग्य उपाय आणि काळजी घेतली तर पोट स्वच्छ होण्यास नक्कीच मदत मिळेल. यासाठी आपण एक साधा आणि सोपा उपाय जाणून घेऊया, ज्यामुळे तुमच्या पोटाच्या प्रत्येक कोपऱ्यातील घाण सहजरित्या शरीराबाहेर फेकली जाईल. नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे पोट स्वच्छ होईल? असा बहुतांश लोकांचा प्रश्न असतो. कारण पोट स्वच्छ होत नसल्याने कित्येक जण त्रासलेले असतात. दिवसभराच्या सर्व शारीरिक क्रियांवर याचा परिणाम होतो. तुम्ही देखील याच समस्येमुळे त्रस्त आहात का? आतड्यांमधील घाण बाहेर फेकली जाण्यासाठी सोपा घरगुती उपाय जाणून घेऊया..

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोट स्वच्छ करण्यासाठी रामबाण उपाय ( Effective Remedy For Clearing Stomach) 

दही आणि गुळाचे मिश्रण ठरेल फायदेशीर?

दही: दह्यातील प्रोबायोटिक्समुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत मिळते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते. दह्यामुळे शरीरामध्ये चांगल्या बॅक्टेरियांची निर्मिती होण्यास मदत मिळते, ही प्रक्रिया पोट स्वच्छ होण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. 

गूळ : गूळ हे एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्यास आणि पचनप्रक्रियेचे कार्य जलदगतीने होण्यास मदत मिळते.  

दातांना कीड लागलीय? करा हे 3 प्रभावी घरगुती उपाय, जाणून घ्या उपचारांची योग्य पद्धत

(नक्की वाचा: दातांना कीड लागलीय? करा हे 3 प्रभावी घरगुती उपाय, जाणून घ्या उपचारांची योग्य पद्धत)

गूळ आणि दह्याचे सेवन कसे करावे? (How To Use Curd And Jaggery?)

  • एक वाटी ताजे दही 
  • एक-दोन चमचे गूळ (किसलेला गूळ) 

विधी: 

  • दह्यामध्ये गूळ योग्य पद्धतीने मिक्स करा. 
  • या मिश्रणाचे सेवन रिकाम्या पोटी किंवा काहीतरी खाल्ल्यानंतर करावे. 

दही-गुळाचे सेवन करण्याची योग्य वेळ 

नियमित सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्रीच्या जेवणानंतर हे मिश्रण खावे. 

(नक्की वाचा: Sanitary Pads Disposal: सॅनिटरी पॅड्ससह कालबाह्य औषधांबाबत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, करणार हे काम)

दही आणि गूळ खाण्याचे फायदे(Benefits of Curd And Jaggery)

1. दही-गुळामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते. 
2. पचनप्रक्रिया निरोगी आणि मजबूत होते. अन्नाचे पचन होण्यास मदत मिळते. 
3. शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात. पोट आणि यकृत दोन्ही अवयव स्वच्छ होतात. 
4. गुळामुळे शरीराला ऊर्जा तर दह्यामुळे थंडावा मिळतो.  

पोट स्वच्छ होण्यासाठी या टिप्स देखील करा फॉलो

  • भरपूर पाणी प्यायल्यासही पोट स्वच्छ होईल. 
  • फायबरयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा.  
  • नियमित व्यायाम करावा.  
  • लिंबूवर्गीय फळांचा डाएटमध्ये समावेश केल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळेल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )