मनुष्य आणि प्राण्यांमधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे स्मरणशक्ती. मनुष्याला प्राण्यांपेक्षा अधिक ठळक स्मरणशक्ती असते. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा त्रासातून अनेकांची वर्तमानातही सूटका होत नाही. त्याचा परिणाम रोजच्या आयुष्यावर होतो. तुमच्याही आयुष्यात या प्रकारच्या त्रासदायक घटना घडल्या असतील ज्यापासून तुम्ही अजूनही सावरला नसाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. यामधील काही टिप्सचा तुम्हाला पर्सनल तसंच प्रोफेशनल लाईफमध्ये मोठा उपयोग होईल.
स्वत:शी संवाद साधा
ही एक उत्तम सवय आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. त्याचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि तुमच्या वागण्यात तसंच कामात सुधारणा होऊ शकते.
नवीन गोष्ट शिका
तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल आणि त्यामधून बाहेर पडायचं असेल तर काहीतरी नवीन गोष्ट शिका. नृत्य, गायन, आर्ट, पेन्टिंग यासारख्या छंदामधून तुमचं आयुष्य पुन्हा आनंदी होईल. आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगण्याचं ध्येय तुम्हाला सापडेल.
ताण कमी करा
तुम्ही एखादी चांगली वेब सीरिज किंवा सिनेमा बघूनही मनावरील ताण कमी करु शकता. मित्रांसोबत बाहेर फिरायला जा. बागकाम करा. एकटेपणा दूर करण्याचे हे देखील काही उत्तम उपाय आहेत.
एकटं राहू नका
या प्रकाराच्या नाजूक कालखंडात एकटं राहू नका. कुटुंबासोबत जास्तीत-जास्त वेळ घालवा. त्यांना तुमची अडचण समजावून सांगा. त्यामुळे तुमच्यावरील दडपण कमी होईल. तसंच कुटुंबातील व्यक्तीही त्यांच्या अनुभवातून तुम्हाला नको वाटणाऱ्या भूतकाळातून बाहेर पडण्यास मदत करतील.