जाहिरात

Left Over Tea Powder Hacks: पावसाळ्यात घरात माश्यांचा त्रास वाढलाय? महागडी औषधं सोडा, किचनमधील 'हा' सोपा उपाय

Left Over Tea Powder Hacks: पावसाळ्यात घरात होणाऱ्या माश्यांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय...

Left Over Tea Powder Hacks: पावसाळ्यात घरात माश्यांचा त्रास वाढलाय? महागडी औषधं सोडा, किचनमधील 'हा' सोपा उपाय
"Remove Flies From Home Naturally: घरातील माश्यांच्या त्रासापासून कशी सुटका मिळवावी?"
Canva
  • टाकाऊ चहा पावडरचा वापर घरातील माश्यांना दूर करण्यासाठी करू शकता
  • चहा पावडर उकळलेल्या पाण्यात लिक्विड डिटर्जंट मिसळून काचेच्या भांड्यांची स्वच्छता आणि चमक वाढवता येते
  • लाकडी फर्निचरची चमक वाढवण्यासाठी चहा पावडर उकळलेल्या पाण्यात कापड भिजवून फर्निचर स्वच्छ करणे फायदेशीर ठरते

Left Over Tea Powder Hacks: आपल्यापैकी बहुतांश लोकांना सकाळी उठल्याबरोबर एक कप गरमागरम चहा पिण्याची सवय असते. कारण चहाशिवाय दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटत नाही. तुमच्यासोबतही असे घडते का? मूड फ्रेश करायचा असो किंवा घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, प्रत्येक कार्यक्रमात चहा हवाच. चहा तयार केल्यानंतर बहुतांश लोक चहा पावडर कचऱ्याच्या डब्यात फेकतात. पण चहा पावडर कचरा समजून फेकण्याऐवजी त्याचा वापर तुम्ही करू शकता.   

'माँ, ये कैसे करू?' (Maa, yeh kaise karun?) या यु-ट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये उरलेल्या चहा पावडरचा वापर कसा करता येईल? याबाबत माहिती देण्यात आली आहे. चहा पावडरचा वापर घराची स्वच्छता, रोपांची काळजी, दरवाजे, खिडक्या चमकवण्यासाठी कसा केला जाऊ शकतो, याबाबतची माहिती व्हिडीओमध्ये सांगण्यात आली आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती...  
पाहा व्हिडीओ

चहा पावडरचा कसा करावा वापर?

1. घरातील माश्या पळवून लावण्यासाठी

अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांत किंवा स्वयंपाकघरात जेवण तयार करताना गोड किंवा इतर काही पदार्थ सांडल्यामुळे माश्यांची समस्या निर्माण होते. माश्यांपासून सुटका मिळवण्यासाठी चहा पावडर नीट स्वच्छ धुवून सुकवून घ्या. जेव्हा घरात माश्या दिसू लागतील, तेव्हा सुकलेली चहा पावडर अशा ठिकाणी ठेवा जिथे माश्या जास्त येतात. या पावडरच्या वासाने माश्या लगेच पळून जातील आणि तुम्हाला महागड्या रासायनिक (केमिकल) औषधांचा वापरही करावा लागणार नाही.

(नक्की वाचा : How To Get Rid Of Cockroaches: किचनमधील झुरळांचा बंदोबस्त करायचाय? ट्राय करा 4 सोपे उपाय, मिनिटात पळतील झुरळं)

2. काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी

स्वयंपाकघरात ठेवलेली काचेची भांडी, बाटल्या किंवा जार वापरून वापरून त्यावरील चमक कमी होते किंवा भांड्यांना वेगळाच वास येतो. काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी चहा पावडर पाण्यात टाकून चांगली उकळून घ्या आणि नंतर गाळून घ्या. आता चहा पावडरच्या पाण्यात थोडेसे लिक्विड डिटर्जंट किंवा डिशवॉशर मिक्स करा आणि या पाण्याने आपली काचेची भांडी स्वच्छ करा. 

3. लाकडी फर्निचरची चमक वाढवण्यासाठी

घरातील जुन्या लाकडी फर्निचर पुन्हा चमकवण्यासाठीही तुम्ही चहा पावडरचा वापर करू शकता. चहा पावडर उकळलेले पाणी थोडे कोमट ठेवा आणि त्यात एक स्वच्छ सुती (कॉटन) कापड बुडवून पिळून घ्या. या कापडाने तुम्ही लाकडी सोफे, टेबल किंवा कपाट नीट पुसून घ्या. यानंतर एका सुक्या कापडाने ते पुन्हा स्वच्छ करा. तुमच्या घरातील फर्निचर नव्यासारखी चमक येईल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com