Male Y Chromosome : आता खरंच मुलांचा जन्म होणार नाही? रीसर्चमधील धक्कादायक माहिती

Male Y Chromosome : महिला आणि पुरुषांमधील एक्स क्रोमोझोम्स एकत्रित येतात तेव्हा मुलीचा जन्म होतो आणि पुरुषांमधील व्हाय (Y) महिलांच्या X क्रोमोझोम्सशी मिळते, तेव्हा मुलाचा जन्म होतो. याच व्हाय क्रोमोझोमशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

Male Y Chromosome : महिला आणि पुरुषाच्या शरीरातील एक्स क्रोमोझोम्स एकत्रित येतात, त्यावेळेस मुलीचा जन्म होतो आणि पुरुषांमधील व्हाय (Y) महिलांमधील एक्स क्रोमोझोमशी मिळतो, त्यावेळेस मुलाचा जन्म होतो. महिलांच्या शरीरामध्ये दोन एक्स क्रोमोझोम असतात तर पुरुषांच्या शरीरात एक्स तसेच व्हाय असे दोन क्रोमोझोम्स असतात. दरम्यान याच व्हाय क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्राबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

(नक्की वाचा: कोलकाता बलात्कार प्रकरण: आरोपी संजय रॉय या गंभीर मानसिक आजाराने आहे ग्रस्त? नेमके काय आहे हा प्रकार)

रिपोर्टमधील धक्कादायक दावा

सायन्स अलर्टने सादर केलेल्या रिपोर्टद्वारे अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुरुषांची संख्या घटण्यासंदर्भात रिपोर्टमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे. रिपोर्टमधील माहितीनुसार, पुरुषांमधील व्हाय गुणसूत्र कमी होत आहेत अथवा कमकुवत होत आहेत. नवीन संशोधनानुसार एक्स (X) आणि व्हाय (Y) गुणसूत्रांमधील संतुलन वर्षानुवर्षे बिघडत असल्याचे दिसत आहे. मागील 166 दशलक्ष वर्षाबाबत सांगायचे झाल्यास Y गुणसूत्रातून सुमारे 900-55 सक्रिय जनुके (Genes) नष्ट झाली आहेत. तर अंदाजानुसार दर दशलक्ष वर्षांनी या गुणसूत्रातून पाच जीन्स नष्ट होत आहेत. या मूल्यांकनानुसार असेही मानले जाते की Y गुणसूत्र 11 दशलक्ष वर्षांमध्ये पूर्णपणे नष्ट होईल. या माहितीने शास्त्रज्ञांनाही गोंधळामध्ये टाकले आहे.

Advertisement

(नक्की वाचा: अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो?)

अशा प्रकारे पुरुषांचा जन्म निश्चित होतो

जर Y गुणसूत्र कमी झाले किंवा पूर्णतः नष्ट झाले तर मुलांचा जन्म होणे कठीण आहे. एक्स (X) क्रोमोझोममध्ये सुमारे 900 जनुके तर व्हाय (Y) क्रोमोझोममध्ये सुमारे 55 जनुके असतात. तर मोठ्या प्रमाणात नॉन-कोडिंग DNA देखील असतात. कोणत्याही महिलेच्या गर्भधारणेदरम्यान 12 आठवड्यांनंतर त्याचे मुख्य जनुक सक्रिय होते आणि गुणसूत्रानुसार गर्भामध्ये लिंग विकसित होते.  

Advertisement

(नक्की वाचा: Diabetes and Sugar Level : किती असावी शुगर लेव्हल ? वाचा, कोणती टेस्ट आहे सर्वोत्तम)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.