Relationship Tips: रॉयल स्लीप पोझिशन म्हणजे काय? पती-पत्नीचे नातं सात जन्मांपर्यंत राहील मजबूत आणि सुरक्षित

What Is Royal Sleep Position: पती-पत्नीचे नाते मजबूत आणि सुरक्षित राहण्यासाठी एकमेकांप्रति प्रेम, विश्वास, आदर असणं आवश्यक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"What Is Royal Sleep Position: रॉयल स्लीप पोझिशन म्हणजे काय?"
Canva

What Is Royal Sleep Position: रात्रीच्या वेळेस झोपण्याची स्थिती देखील अतिशय महत्त्वाची असते. योग्य स्थितीमध्ये झोपल्यास मानसिक आरोग्यासही फायदे मिळतात. जोडीदाराजवळ झोपल्याने दोघांमधील विश्वास आणि प्रेम वाढते. नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी रॉयल स्लीप पोझिशन (Royal Sleep Position) महत्त्वाची ठरू शकते. रॉयल स्लीप पोझिशन ही एखादी परिभाषित पोझिशन नाहीय. तर पक्के आणि मजबूत नाते दर्शवणारा एक प्रतिकात्मक शब्द आहे. पती-पत्नीचे मजबूत आणि सुरक्षित नाते निर्माण करण्यासाठी एकमेकांप्रति प्रेम, विश्वास आणि आदर असणं आवश्यक आहे. रॉयल स्लीप पोझिशन (What Is Royal Sleep Position) देखील अशा प्रकारे कार्य करते. 

रॉयल स्लीप पोझिशन म्हणजे काय? | What Is Royal Sleep Position

जेव्हा पती-पत्नी शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ असतात, त्यास रॉयल स्लीप पोझिशन म्हणतात. झोपण्याच्या या स्थितीस सोल्जर पोझिशनही म्हणतात. या स्थितीमध्ये व्यक्ती पाठीवर झोपतो आणि त्याचे हात शरीराजवळ असतात. ही झोपण्याची सर्वोत्तम आणि आरोग्यदायी स्थिती मानली जाते. 

नाते मजबूत करण्याची पद्धत 

पती-पत्नीच्या नात्याचा पाया विश्वास आणि एकमेकांप्रति असलेल्या निस्वार्थ प्रेमावर टिकलेले असते. प्रेम आणि समर्पण भावनेवरच नातं मजबूत असते. एकमेकांच्या भावनांचा आणि इच्छांचा सन्मान करणे, नात्यात परस्पर सामंजस्यपणा राखल्यास नाते मजबूत होते. 

मनमोकळेपणाने संवाद करणे

पती-पत्नीच्या नात्यामध्ये कायम मनमोकळेपणाने संवाद होणे आवश्यक आहे. स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे बातचित केल्यास नात्यामध्ये निर्माण होणारे वाद संपुष्टात येण्यास मदत मिळते. 

Advertisement

(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्री झोपण्यापूर्वी केवळ 1 चमचा खा ही गोष्ट, इतकी गाढ झोप येईल की अलार्मही ऐकू येणार नाही)

Advertisement
झोपण्याची योग्य पद्धत  

डाव्या कुशीवर झोपल्यास आरोग्यास फायदे मिळतात, असे म्हणतात. कारण यामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि हृदयावर ताणही कमी येतो. याव्यतिरिक्त पाठीवर झोपणंही चांगला पर्याय आहे, तुमच्या आरोग्यासाठी ही आरामदायी स्थिती ठरू शकते. 

Advertisement

(नक्की वाचा: Viral News: लग्नानंतरही जोडपी वेगळं का झोपतात? नेमका काय आहे हा ट्रेंड आणि मुख्य कारण, 99% लोकांना माहीत नाही)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)