जाहिरात

Viral News: लग्नानंतरही जोडपी वेगळं का झोपतात? नेमका काय आहे हा ट्रेंड आणि मुख्य कारण, 99% लोकांना माहीत नाही

Viral News: विवाहित जोडप्यांनी वेगवेगळ्या बेडवर झोपणे फायदेशीर असते का? नेमका काय आहे हा ट्रेंड?

Viral News: लग्नानंतरही जोडपी वेगळं का झोपतात? नेमका काय आहे हा ट्रेंड आणि मुख्य कारण, 99% लोकांना माहीत नाही
"Viral News: विवाहित जोडप्याने वेगवेगळ्या बेडवर झोपणे फायदेशीर असते का?"
Canva

Japanese Sleeping Culture: लग्नानंतर विवाहित जोडपे एकाच घरामध्ये राहुनही वेगवेगळे झोपत असतील आणि तरीही त्यांच्यातील नाते चांगले असेल तर तुम्ही काय म्हणाल? आपल्या देशात असं काही घडत असेल तर लोकांना वाटेल की वैवाहिक जीवनात काहीतरी अडचणी सुरू आहेत. पण जपान देशामध्ये ही गोष्ट विचित्र मानली जात नाही. उलट ही बाब संस्कृती, परंपरा आणि विश्रांती मिळवण्याचा एक अनोखा ट्रेंड मानला जातोय. या देशामध्ये पती-पत्नीने वेगवेगळे झोपणे म्हणजे प्रेम कमी झाल्याचे नाही तर शांतता, चांगली झोप मिळवण्याचे लक्षण मानले जाते. जपानमधील जोडपे असे का करतात? चला जाणून घेऊया सविस्तर माहिती...

लग्न झालेली जोडपी वेगवेगळी का झोपतात?| Why Do Married Couples Sleep Separately  

1. आई आणि बाळांचे एकत्र झोपणे 

जपानमध्ये जेव्हा एखाद्या जोडप्याच्या मुलाचा जन्म होतो, तेव्हा आई मुलांसोबत झोपते. बाळाला सुरक्षितता आणि आराम मिळावा, यासाठी फार पूर्वीपासून ही परंपरा पाळली जाते. त्यामुळे बाळाच्या वडिलांना अनेकदा वेगळे झोपावे लागते. हा प्रकार सलग काही महिने किंवा वर्षे सुरू राहतो, ज्यामुळे पती-पत्नीला वेगळे झोपण्याची सवय लागते.

2. कौटुंबिक घटस्फोटाची संस्कृती

जपानमध्ये घटस्फोट आजही समाजामध्ये कलंक मानला जातो. कित्येक जोडपी कायदेशीररित्या घटस्फोट घेत नाहीत, तर कौटुंबिक घटस्फोटाच्या संस्कृतीचे पालन करतात, म्हणजे ते एकाच घरामध्ये राहतात, पण पती-पत्नीमध्ये जवळीक नसते.  

3. महागडे घर आणि छोटी जागा 

जपानमध्ये घरांच्या किंमती अतिशय महाग आहेत आणि जागा मर्यादित स्वरुपात उपलब्ध असतात. अशा परिस्थितीत वेगवेगळे पातळ स्वरुपातील बिछाने ठेवणे अधिक सोयीस्कर ठरते आणि जागाही मोकळी राहते. या कारणामुळे जपानमध्ये जोडपी वेगवेगळी झोपतात.  

4. जपानी फ्युटन कल्चर

बहुतांश जपानी लोक तांदळाच्या पेंढ्यापासून तयार केलेल्या टाटामी मॅट्सवर झोपतात. त्यावर एक पातळ फ्युटॉन गादी ठेवली जाते. अस्सल जपानी फ्युटॉन खूप पातळ असतात आणि विशेषतः एका व्यक्तीसाठी डिझाइन केलेले असतात. कधीकधी जोडपे स्वतःच्या फ्युटॉनवर झोपतात आणि जर त्यांना जवळ झोपायचे असेल तर दोन्ही फ्युटॉन एकमेकांच्या जवळ ठेवतात. 

5. सुरक्षितता आणि जागा 

जपानमधील छोट्या खोल्या आणि भूकंपाचा धोका या गोष्टी सामान्य आहेत. म्हणूनही वजनाने जड बेड वापरण्याऐवडी फ्युटॉन जमिनीवर ठेवणे अधिक सुरक्षित मानले जाते. जपानमध्ये पारंपरिक बेडरूमला वाशित्सु (Washitsu) म्हणतात, ज्यामध्ये फर्निचर किंवा कायम स्वरुपी बेडचा समावेश नसतो. लोक रात्री फ्युटॉनवर झोपतात आणि सकाळी ते दुमडतात. जे घरातील जागा वाचवणे आणि साधी जीवनशैली प्रतिबिंबित करतात.

Dadar Video Viral: महिला बसलीय तिथेच लिंग बाहेर काढून त्याने.. दादर शिवाजी पार्कात दिवसाढवळ्या संतापजनक प्रकार

(नक्की वाचा: Dadar Video Viral: महिला बसलीय तिथेच लिंग बाहेर काढून त्याने.. दादर शिवाजी पार्कात दिवसाढवळ्या संतापजनक प्रकार)

पाश्चिमात्य देशांमध्ये वेगवेगळे झोपण्याची परंपरा

आज भलेही पाश्चिमात्य देशांमध्ये जोडप्यांचे एकत्र झोपणे सामान्य बाब असेल, पण व्हिक्टोरियन काळात इंग्लंड आणि अमेरिकेत वेगवेगळ्या बेडवर झोपणे हा एक आधुनिक ट्रेंड होता. तेव्हा डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की, एकत्र झोपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि शारीरिक ऊर्जाही कमी होते. 1920च्या दशकात ट्वीन बेड्सना स्वच्छता, समानता आणि आधुनिकतेचे प्रतीक मानले जात होते, पण 1950नंतर यास नात्यातील दुरावा आणि खराब नातेसंबंधांचे लक्षण मानले जाऊ लागले. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com