जाहिरात

8 वर्षात मी 30000 पेक्षा जास्त वेळा शिंकलोय...लाखांचा खर्च अन्...सर्जरी न करता आजार कसा झाला गायब?गंभीर प्रकरण

Gut Detox Benefits: 8 वर्षांत 30,000 पेक्षा जास्त शिंका येणाऱ्या 41 वर्षीय रुग्णाची नाकाची सर्जरी डॉ. ऋषिकेश कांडेकर यांनी आयुर्वेदिक 'गट डिटॉक्स'च्या मदतीने कशी टाळली? जाणून घ्या सविस्तर माहिती...

8 वर्षात मी 30000 पेक्षा जास्त वेळा शिंकलोय...लाखांचा खर्च अन्...सर्जरी न करता आजार कसा झाला गायब?गंभीर प्रकरण
Gut Detox Benefits: तुम्हीही रोज सकाळी उठल्यावर सतत शिंकताय?
Canva

- डॉ. ऋषिकेश कांडेकर
Gut Detox Benefits:
गेल्या 8 वर्षांत 30 हजारांहून अधिक शिंकांचा त्रास सहन करणाऱ्या एका 41 वर्षीय रुग्णाची धक्कादायक केस डॉ. ऋषिकेश कांडेकर यांनी मांडली आहे. 6 तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार आणि 1 लाख रुपये खर्च केल्यानंतरही शेवटी या रुग्णाला नाकाच्या सर्जरीचा सल्ला देण्यात आला होता. पण आयुर्वेदानुसार या आजाराचे मूळ नाकात नसून पचनसंस्थेत (गट) होते. रुग्णाला नेमका काय आजार होता? कोणते उपचार करण्यात आले? याबाबत डॉ. ऋषिकेश कांडेकर यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

डॉ. ऋषिकेश कांडेकर यांच्याकडे आलेल्या एका रुग्णाने सांगितले की, "गेल्या 8 वर्षांत मी 30,000 पेक्षा जास्त वेळा शिंकलोय... 1 लाख रुपये खर्चूनही शेवटी मला सर्जरी हाच पर्याय सांगण्यात आला होता!" एका 41 वर्षीय पुरुष रुग्णाची ही अत्यंत धक्कादायक केस समोर आली असून प्रत्येक ॲलर्जीच्या रुग्णाने ती आवर्जून वाचायला हवी अशी आहे, असेही डॉक्टरांनी नमूद केले आहे.

रुग्णाचा त्रास आणि वैद्यकीय इतिहास

संबंधित 41 वर्षीय रुग्णाला गेल्या 8 वर्षांपासून रोज सकाळी उठल्याबरोबर तब्बल 30 ते 40 शिंका येण्याचा त्रास होत होता. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी अँटीहिस्टामाइन्स, नेझल स्प्रे आणि स्टेरॉइड्सचा वापर केला. या दरम्यान त्यांनी सहा वेगवेगळ्या ENT तज्ज्ञांच्या भेटी घेतल्या. औषधोपचारांवर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला, तरीही त्रासात काहीच फरक पडला नाही. शेवटी डॉक्टरांनी त्यांना 'नाकाची सर्जरी' (Septoplasty) करण्याचा सल्ला दिला होता.

खरी अडचण नाकात नव्हतीच, मग?

या संपूर्ण वैद्यकीय प्रवासात एकाही डॉक्टरने रुग्णाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला नाही, तो म्हणजे "तुमची पचनक्रिया कशी आहे?" जेव्हा या रुग्णाची सखोल तपासणी करण्यात आली, तेव्हा या आजाराचे खरे मूळ नाकात नसून थेट 'पोटात' असल्याचे समोर आले. रुग्णाला जेवणानंतर पोट डब्ब फुगणे, जुनाट बद्धकोष्ठता (पोट स्वच्छ न होणे) आणि रोज सकाळी जिभेवर पांढरा थर जमा होणे (शरीरात टॉक्सिन्स साचल्याची खूण) असा त्रास होता.

(नक्की वाचा : Fruit Salad: फ्रुट सॅलड खाणाऱ्यांनो सावधान! वेगवेगळी फळं एकत्र खाल्ल्यास शरीरात काय होतं? फोर्टिसच्या डॉक्टरांचा मोठा खुलासा)

या आजाराबाबत आयुर्वेदाचा दृष्टिकोन

आयुर्वेदानुसार या आजाराचे मूळ नाकात नाही, तर पचनसंस्थेत (Gut) असते. अपचनामुळे शरीरात तयार झालेले 'आम' (Toxins) पोटातून श्वसनसंस्थेत पसरतात आणि त्याचेच रूपांतर पुढे सततच्या शिंका, नाक चोंदणे आणि ॲलर्जीमध्ये होते, अशी माहिती समोर आली आहे.

(नक्की वाचा : Abdominal Obesity: वाढती कंबर, यमराजाचा नंबर! महिलांचा नवा छुपा शत्रू, कमरेच्या वाढत्या घेराबाबत संशोधनातील 'ही' धक्कादायक माहिती)

डॉ. कांडेकर यांनी रुग्णावर काय उपचार केले?

या केसमध्ये डॉक्टरांनी नाकावर कोणतेही उपचार न करता थेट पोटावर म्हणजेच पचनसंस्थेवर उपचार केले. 

  1. यासाठी रुग्णाला तीन आठवड्यांचा आयुर्वेदिक 'गट डिटॉक्स' (Gut Detox) देण्यात आला. 
  2. तसेच कफ वाढवणारा आहार पूर्णपणे बंद (उदा. रात्रीचे दही खाणे) करण्यात आला.
  3. प्राणायाम करण्याचा सल्ला दिला गेला. 
  4. या उपचारांचा असा  परिणाम झाला की, अवघ्या 3 महिन्यांत रुग्णाचा 8 वर्षांचा जुनाट त्रास पूर्णपणे गायब झाला.

डॉ. ऋषिकेश कांडेकर यांची पोस्ट वाचा 

"आज पहिल्यांदाच मला एकही शिंक आली नाही"

उपचारानंतर रुग्णाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "डॉक्टर आज 8 वर्षांत पहिल्यांदाच मी सकाळी उठलो आणि मला एकही शिंक आली नाही!" कोणतीही सर्जरी न करता आणि स्टेरॉइड्स न घेता, फक्त पचनसंस्था सुधारल्यामुळे हा आजार मुळापासून संपला आहे. त्यामुळे तुमची ॲलर्जी हे तुमचे नशीब नाही, तर योग्य उपचारांनी ती पूर्णपणे बरी होऊ शकते, हे या केसवरून सिद्ध झाले आहे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com