जाहिरात

Rules For Drinking Alcohol : पत्नीच्या इच्छेविरुद्ध दारू प्यायल्यास होईल तुरुंगवास? कायदा काय सांगतो? 

पत्नीच्या परवानगीशिवाय दारू प्यायल्यास तुरुंगात जावं लागू शकतं, असा दावा केला जात आहे. या दाव्यात किती तथ्य आहे जाणून घेऊया. 

Rules For Drinking Alcohol : पत्नीच्या इच्छेविरुद्ध दारू प्यायल्यास होईल तुरुंगवास? कायदा काय सांगतो? 

Rules For Drinking Alcohol : नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं. सध्या जगभरात आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. पार्टी आणि सेलिब्रेशनदरम्यान दारू पिणं ही बाब सर्वसाधारण झाली आहे. मात्र यादरम्यान विवाहित पुरुषांसाठी सोशल मीडियावरुन एक सूचना दिली जात आहे. जी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. विवाहित पुरुषांनी आपल्या पत्नीच्या इच्छेविरुद्ध दारूचं सेवन केलं तर त्याला तुरुंगात जावं लागू शकतं. 

अशा प्रकारचे मेसेज लोकांमध्ये गोंधळ निर्माण करीत आहे.  या व्हायरल मेसेजमध्ये, पत्नीच्या परवानगीशिवाय दारू प्यायल्यात तर तुरुंगात जावं लागू शकतं, असा दावा केला जात आहे. या दाव्यात किती तथ्य जाणून घेऊया. 

New Year Resolutions 2026: फक्त कॅलेंडर बदलू नका, हे 25 छोटे बदल 2026 अविस्मरणीय बनवेल

नक्की वाचा - New Year Resolutions 2026: फक्त कॅलेंडर बदलू नका, हे 25 छोटे बदल 2026 अविस्मरणीय बनवेल

परवानगीशिवाय दारू प्यायलास तुरुंगवास?

जर तुमच्यापर्यंतही अशा प्रकारचं वृत्त आलं असेल तर आधी जाणून घ्या की कायद्यात अशा प्रकाची तरतूद नाही. खरं पाहता हा दावा घरगुती हिंसाचाराशी जोडून केला जात आहे. जे फौजदारी प्रक्रिया संहिता (BNS) च्या कलम 85/85B अंतर्गत येतं. या कलमाअंतर्गत, जर पतीने दारू किंवा ड्रग्ज सेवन केल्यानंतर घरगुती हिंसाचार केला तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते. ज्यामुळे पत्नीच्या मानसिक आरोग्याला धक्का पोहोचू शकतो. यानंतर पत्नी एफआयआर दाखल करू शकते. परिणामी पतीला तीन वर्षांची शिक्षा किंवा त्याच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. एबीपी न्यूजने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

याबाबत उदाहरण द्यायचं झालं तर पत्नीने पतीला दारू पिऊन घरी येऊ नको असं स्पष्टपणं सांगितलं असेल, परंतु तरीही तो तसे करत असेल, ज्यामुळे संघर्ष किंवा भीती निर्माण होण्याची भीती असेल तर ही क्रूरता मानली जाईल. मात्र फक्त दारू पिणे हा गुन्हा नाही. सरकारी आकडेवारीनुसार, घरगुती हिंसाचाराचे ४० टक्क्यांहून अधिक प्रकरणं दारू या कारणामुळे होतात. त्यामुळे नवा कायदा महिलांना अधिक सुरक्षा प्रदान करतो. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com