जाहिरात

अमेरिकेत गेलेल्या IIT ग्रॅज्युएटला आला वेगळाच अनुभव, भारतीयांनी USA ला जावं की नाही? पोस्ट वाचून तुम्हीच ठरवा

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या समस्यांबद्दल सोशल मीडियावर व्हिडीओ आणि पोस्ट नेहमीच शेअर केल्या जातात. पण दिल्लीतील एका आयआयटी (IIT) ग्रॅज्युएटला वेगळाच अनुभव आला आहे.

अमेरिकेत गेलेल्या IIT ग्रॅज्युएटला आला वेगळाच अनुभव, भारतीयांनी USA ला जावं की नाही? पोस्ट वाचून तुम्हीच ठरवा
IIT Graduate Viral Post

IIT Graduate Viral Post : अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या समस्यांबद्दल सोशल मीडियावर व्हिडीओ आणि पोस्ट नेहमीच शेअर केल्या जातात. पण दिल्लीतील एका आयआयटी (IIT) ग्रॅज्युएटला वेगळाच अनुभव आला आहे. त्याने शेअर केलेली पोस्ट अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमन राय असं अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीचं नाव असून ते सध्या येल स्कूल ऑफ मॅनेजमेंट (Yale School of Management) मध्ये एमबीए करत आहेत.त्यांनी अमेरिकेत शिफ्ट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल झाले? याबाबत पोस्ट शेअर करून माहिती दिली. अमय राय यांची एक पोस्ट  आता इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, 6 महिन्यांपूर्वी जेव्हा ते एमबीएसाठी अमेरिकेत आले. तेव्हापासून त्यांनी सोशल मीडियावर भारतीयांच्या अमेरिकेत जीवनशैलीबाबत नकारात्मक गोष्टी पाहिल्या. परंतु, ही नकारात्मकता संतुलित करण्यासाठी त्यांनी त्यांचे चांगले अनुभव शेअर करण्याचा निर्णय घेतला.

दररोजच्या आयुष्यात मिळालेले मोठे फायदे

अमन यांनी म्हटलंय की,अमेरिकेत त्यांना अनेक छोटी-छोटी पण अत्यंत महत्त्वाच्या सुविधा मिळाल्या. तिथे उत्तम फुटपाथ आणि सुरक्षित रस्ते आहेत.ज्यामुळे ते नियमितपणे धावू शकतात. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन हे देखील एक मोठं सकारात्मक बदल असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांची पत्नी,ज्यांनी भारतात ट्रॅफिकच्या समस्येमुळे पाच वर्षे गाडी चालवली नव्हती, त्या अमेरिकेत आल्यावर केवळ दोन महिन्यांतच पुन्हा गाडी चालवू लागल्या. थंड हवामानाबद्दलही त्यांचा अनुभव वेगळा राहिला. त्यांनी लिहिले की,बर्फवृष्टी झाल्यानंतरचे वातावरण त्यांना एखाद्या ‘वंडरलँड'सारखे वाटते. तसेच दिल्लीच्या तुलनेत अमेरिकेतील हवा खूपच स्वच्छ आणि मनाला शांत करणारी असल्याचे त्यांनी सांगितले.

नक्की वाचा >> Trending Story: 4 महिन्यांपासून पतीला JOB नाही, पत्नीनं सांगितला 'लाईफ पार्टनरचा'खरा अर्थ, पोस्ट पाहिली का?

उत्तम जीवनशैली आणि करिअरच्या संधी

अमन पोस्टमध्ये पुढे म्हणाले, भारतातील फास्ट डिलीव्हरी सेवांची त्यांना कधीच कमी जाणवली नाही. ते आठवड्यातून एकदा ऑनलाइन किराणा मागवतात आणि त्याने त्यांचे काम सुरळीत चालते. तसेच, तिथे स्वच्छ आणि पौष्टिक अन्न सहज उपलब्ध असल्याने हेल्दी लाइफस्टाइल ठेवणे खूप सोपे आहे. शहराभोवती निसर्गाशी जोडलेले अनेक सुंदर ठिकाणे आहेत. तलाव,टेकड्या आणि समुद्रकिनारे.
करिअरच्या संधींबाबत बोलताना अमन म्हणाले की,मेहनत करणाऱ्यांना अमेरिकेत लवकरच चांगल्या संधी मिळतात. ते सध्या 1 अब्ज डॉलर्सच्या व्हेंचर कॅपिटल फंडासोबत लहान स्तरावर काम करत आहेत.

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा >> Sun Sun Sunday...विद्यार्थ्यांना शिकवण्याची अनोखी पद्धत, 2 कोटी लोकांनी पाहिला सरकारी शिक्षकाचा Funny Video

अमन यांनी शेवटी सांगितले की, शांत वातावरण आणि उत्तम जीवनशैलीमुळे त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे फायदे आणि आव्हाने असतात,पण अनुभव हा व्यक्तीच्या दृष्टिकोनावरही अवलंबून असतो, असंही त्यांचं मत आहे.  सोशल मीडियावर अनेक लोकांनी त्यांच्या विचारांशी सहमती दर्शवली आहे. परदेशात राहण्याचा अनुभव प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो, असं लोकांनी म्हटलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com