Teacher Funny Video Viral : आजच्या युगात खासगी शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड आणि डिजिटल साधनांचा वापर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, आंध्र प्रदेशमधील एका सरकारी शाळेतील व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. पार्वतीपुरममधील शाळेतील एका वर्गात सुविधांची कमतरता असूनही एका शिक्षकाने शिकवण्याची अशी अनोखी पद्धत शोधली, ज्या पद्धतीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.शाळेतील शिक्षकाचा हा भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.आतापर्यंत या व्हिडीओला 2 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय?
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या शिक्षकाचे नाव धर्म कालीसेट्टी(dharma_kalisetti) आहे. ते क्लासरूममध्ये ब्लॅकबोर्डसमोर उभे राहून मुलांना आठवड्याचे दिवसांची नावे लक्षात ठेवायला शिकवत आहेत. याचदरम्यान शिक्षकाने एक जबरदस्त कल्पना करून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षकाने हा धडा एक मजेशीर गाणं आणि डान्स करून शिकवण्याचा प्रयत्न केला आहे.
नक्की वाचा >> Navi Mumbai: WhatsApp ग्रुपवरून 31.50 लाखांची फसवणूक, नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार, 'कसा' झाला पर्दाफाश?
शिक्षकाने अनोख्या पद्धतीत पद्धतीत धडा शिकवण्यास सुरुवात केल्यानंतर विद्यार्थीही प्रत्येक स्टेप आणि प्रत्येक शब्द त्यांच्या पद्धतीने म्हणत आहेत.शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. कोणत्याही महागड्या गॅजेट्स,टॅबलेट्स किंवा स्मार्ट क्लासशिवायही मुलांना चांगल्या प्रकारे मग्न ठेवता येतं, असाच मेसेज या शिक्षकाने देण्याचा प्रयत्न केला आहे.
धर्म यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर (Days of the Week Song) या कॅप्शनसह शेअर केला होता आणि त्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला. शिक्षकाच्या या व्हिडीओला यूजर्सने वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने म्हटलंय, जर असे शिक्षक प्रत्येक शाळेत असतील,तर मुलांना शाळेत येण्यासाठी कधीच सांगावे लागणार नाही. धर्म यांसारखे शिक्षक सिद्ध करतात की, शिकवण्यासाठी मोठ्या सुविधांपेक्षा प्रेरणादायी गोष्टींची आवश्यकता असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world