Independence Day 2024: झेंडा अमुचा प्रिय देशाचा,फडकत वरी महान; स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना पाठवा हे खास संदेश

Independence Day Wishes: 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस, दरवर्षी आपण हा दिवस जल्लोषात साजरा करतो. यानिमित्त सर्वांना मराठी भाषेतून शुभेच्छा संदेश पाठवा.

Advertisement
Read Time: 2 mins

Independence Day 2024: 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या दिवसापासून प्रत्येक देशवासीय 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस जल्लोषात साजरा करतो. स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे आणि देशभक्तीचे स्मरण केले जाते. संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात रंगलेला दिसतो. घराघरात, शाळा, महाविद्यालय, सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्येही उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. या महत्त्वपूर्ण क्षणी तुम्ही देखील सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पाठवून हा उत्सव साजरा करा. 

(नक्की वाचा: 78th Independence Day LIVE : आज देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात)

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा | Independence Day 2024 Wishes 

अभिमान असलेल्या या तिरंग्याला सलाम 
तिरंग्याची शान कायम राखा 
जोपर्यंत तुमचा जिवंत आहे तुमचा श्वास  
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Independence Day 2024 

जगभरात सर्वात सुंदर आणि अद्वितीय देश 
जेथे जात-धर्म-भाषेपेक्षा आहे देशभक्तीचा मोठा प्रवाह
पवित्र, प्रेमळ आणि विविधतेने नटलेला आमचा भारत देश 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Independence Day 2024 

(नक्की वाचा: Happy Independence Day 2024: स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्रमैत्रिणी-नातेवाईकांना पाठवा मराठीतून शुभेच्छा संदेश)

जगभरात घुमतोय हिंदुस्थानचा नारा
आसमंतात चमकतोय आमचा तिरंगा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Independence Day 2024 

तिरंगा आहे आमची शान आणि
आम्हा भारतीयांचा आहे प्राण
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Independence Day 2024 

येथे उत्साहाची नाही कमतरता
क्रांतिकारांनी दिलंय बलिदान
स्वातंत्र्यासाठी सांडले कित्येकांचे रक्त
त्यामुळेच मानाने फडकतोय आमचा तिरंगा 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Independence Day 2024 

Advertisement

(नक्की वाचा: Independence Day 2024: तिरंग्यातील 3 रंग कोणत्या गोष्टीचे आहेत प्रतीक?)

शूरवीरांचे बलिदान कायम लक्षात ठेवा
त्यांच्या पावलावर पाऊल ठेवा
सदैव करत राहा भारत मातेची सेवा 
हृदयात देशभक्ती कायम जीवंत ठेवा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Independence Day 2024 

गंगा, यमुना येथे नर्मदा
मंदिर, मशिदीसह चर्चही 
शांती, प्रेम, एकतेची शिकवण देतो
माझा प्रिय भारत देश 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
Happy Independence Day 2024 

Advertisement

पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण, काय म्हणाले अजित पवार?