भारतीय दुचाकी मार्केटची जून 2026 च्या विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. हिरो मोटोकॉर्पची (Hero MotoCorp) लोकप्रिय कम्युटर बाइक 'हिरो स्प्लेंडर'ने पुन्हा एकदा देशातील नंबर-1 दुचाकी ठरण्याचा मान मिळवला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होंडा कंपनीच्या गाड्यांनी आपले स्थान मजबूत ठेवले आहे. इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये टीव्हीएस आयक्यूबने (TVS iQube) विक्रीचा नवा विक्रम रचला आहे, तर हिरोच्याच एचएफ डिलक्सला (Hero HF Deluxe) मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे.
हिरो स्प्लेंडर पुन्हा ठरली नंबर-1
जून 2026 च्या विक्रीच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये 3,53,024 युनिट्स स्प्लेंडरची विक्री झाली. जून 2025 मध्ये हाच आकडा 3,31,057 युनिट्स होता. स्प्लेंडरच्या विक्रीत वार्षिक आधारावर 6.64 टक्क्यांची वाढ झाली आहे. टॉप-10 दुचाकींच्या एकूण विक्रीत एकट्या स्प्लेंडरचा वाटा 29.08 टक्के इतका प्रचंड आहे. दिल्लीमध्ये या बाइकची एक्स-शोरूम किंमत 77,878 रुपये आहे.
होंडा अॅक्टिव्हा आणि शाईन दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर
होंडा अॅक्टिव्हा: 2,18,932 युनिट्सच्या विक्रीसह अॅक्टिव्हाने दुसरे स्थान पटकावले. गेल्या वर्षीच्या जून महिन्यातील 1,83,265 युनिट्सच्या तुलनेत यात 19.46 टक्क्यांची वाढ झाली आहे.
होंडा शाईन : 1,67,572 युनिट्सच्या विक्रीसह शाईन तिसऱ्या स्थानावर राहिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 17 टक्क्यांची वाढ झाली आहे.
TVS Jupiter ची घौडदौड, बजाज पल्सरची विक्री घटली
टीव्हीएस जुपिटर: 1,36,805 युनिट्सची विक्री करत जुपिटरने चौथे स्थान मिळवले. जुपिटरच्या विक्रीत 26.69 टक्क्यांची मोठी वाढ झाली.
बजाज पल्सर: 77,406 युनिट्सच्या विक्रीसह पल्सर टॉप-5 मध्ये कायम राहिली, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पल्सरच्या विक्रीत 11,046 युनिट्सची घसरण झाली आहे.
TVS iQube चा धमाका; Hero HF Deluxe ला मोठा दणका
TVS iQube: इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये TVS iQube ने बाजी मारली आहे. जून 2026 मध्ये 47,331 युनिट्सची विक्री झाली. तर जून 2025 मध्ये हा आकडा केवळ 14,244 युनिट्स होता. म्हणजेच या ई-स्कूटरच्या विक्रीत 232.29 टक्क्यांची प्रचंड वार्षिक वाढ झाली आहे.
Hero HF Deluxe: जून 2025 मध्ये 1,00,878 युनिट्स विकल्या गेलेल्या एचएफ डिलक्सची विक्री जून 2026 मध्ये घटून 44,292 युनिट्सवर आली. म्हणजेच यात 56,586 युनिट्सची मोठी घसरण झाली आहे.
जून 2026 मधील टॉप-10 सर्वाधिक विकल्या गेलेल्या दुचाकी
- हिरो स्प्लेन्डर – 3,53,024 युनिट्स
- होन्डा अॅक्टिव्हा – 2,18,932 युनिट्स
- होन्डा शाईन – 1,67,572 युनिट्स
- टीव्हीएस ज्युपिटर – 1,36,805 युनिट्स
- बजाज पल्सर – 77,406 युनिट्स
- सुझूकी अॅक्सेस – 63,121 युनिट्स
- टीव्हीस अपाचे – 55,382 युनिट्स
- टीव्हीएस एक्सएल100 – 50,155 युनिट्स
- टीव्हीएस iQube – 47,331 युनिट्स
- हिरो एचएफ डिलक्स – 44,
292 युनिट्स
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world