RRB Group D Recruitment 2025: रेल्वे भरती मंडळाने (RRB) अलीकडेच ग्रुप डीच्या 32,438 पदांसाठी भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदतही वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 22 फेब्रुवारी 2025 होती. आता रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी उमेदवार 1 मार्च 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करू शकता. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रेल्वे ग्रुप डी भरती 2025साठी अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in ला भेट द्यावी आणि ऑनलाइन अर्ज करावा. बोर्डाने अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारीवरून 3 मार्चपर्यंत वाढवलीय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तसेच 4 मार्च ते 13 मार्चदरम्यान अर्जातील दुरुस्ती प्रक्रिया करता येऊ शकता. अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवताना, बोर्डाने म्हटलंय की ज्या उमेदवारांनी पूर्वीच अकाउंटमध्ये तपशील भरले आहेत, तर ते निवडलेल्या रेल्वेमध्ये कोणतेही बदल करू शकणार नाहीत. जर एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा अधिक रेल्वेसाठी अर्ज केले असतील तर त्याचा/तिचा अर्ज नाकारला जाईल.
- ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया : 23 जानेवारी 2025पासून सुरुवात
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत: 1 मार्च 2025
- शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 3 मार्च 2025
- अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची तारीख: 4 मार्चपासून ते 13 मार्च 2025 पर्यंत
- आरआरबी ग्रुप डी परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर करण्यात येईल
RRB Group D Recruitment 2025: झोननिहाय रिक्त पदांची माहिती
मुंबई : डब्ल्यूआर-4647 जागा आणि सीआर- 3244 जागा
जयपूर : 1433 जागा
प्रयागराज : 2020 जागा
हुबळी : 503 जागा
जबलपूर : 1614 जागा
भुवनेश्वर : 964 जागा
बिलासपूर : 1337 जागा
दिल्ली : 4785 जागा
चेन्नई : 2694 जागा
गोरखपूर : 1370 जागा
गुवाहाटी : 2048 जागा
कोलकाता : ईआर-1817 जागा, एसईआर-1044 जागा
हाजीपूर : 1251 पद
सिकंदराबाद : 1642 जागा
(नक्की वाचा: Smart Pension Plan: गुंतवणूक एकदा, आयुष्यभर फायदा! काय आहे LIC 'स्मार्ट' पेन्शन योजना'? पाहा A to Z माहिती)
RRB Group D Recruitment 2025: पात्रता
- उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता दहावी पास असावा.
- उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 36 वर्षे असावे.
- रेल्वे ग्रुप डी भरती 2025साठी निवडलेल्या उमेदवारांना 18,000/- (लेव्हल -1) वेतनश्रेणी मिळेल.
RRB Group D Recruitment 2025: शारीरिक योग्यता
- पुरुष उमेदवारांसाठी दोन मिनिटांत 100 मीटर आणि 4 मिनिटे 15 सेकंदांत 1000 मीटर धावणे, 35 किलोग्रॅम वजन उचलून चालणे.
- महिला उमेदवारांसाठी दोन मिनिटांत 100 मीटर आणि 5 मिनिटे 40 सेकंदांत 1000 मीटर धावणे, 20 किलोग्रॅम वजन उचलून चालणे.
(नक्की वाचा: Adani Group: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 20 शाळा उघडण्यासाठी अदाणी समूह देणार 2000 कोटी, वंचित विद्यार्थ्यांना मिळणार लाभ)
RRB Group D Recruitment 2025: अर्ज शुल्क
- सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल.
- तर एससी, एसटी, दिव्यांग आणि ईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागेल.
- अर्ज शुल्क UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे करावे.