
International Women's Day History and Theme : जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. ही परंपरा गेल्या शतकापासून सुरु आहे. जगभरातील महिलांचे अधिकार, समानता आणि उपलब्धींचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. आंतरराष्ट्रीय महिला दिवसाची सुरुवात कधी आणि कुठं झाली? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचबरोबर 2025 मध्ये थीम काय आहे? हे देखील समजून घेऊया
आंतरराष्ट्रीय महिला दिवसाची सुरुवात 20 व्या शतकामध्ये युरोप आणि अमेरिकेतील वाढत्या महिला आंदोलनानंतर झाली. हा दिवस साजरा करण्याचे श्रेय युरोप आणि अमेरिकेतील आंदोलनजीवी महिलांना दिलं जातं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
8 मार्चलाच का साजरा केला जातो महिला दिवस?
जगभरात महिला दिवस 8 मार्च रोजीच साजरा केला जातो. त्याचं देखील खास कारण आहे. अमेरिकेतील महिलांनी त्यांच्या हक्कासाठी 8 मार्च रोजी आंदोलन सुरु केलं होतं. त्यानंतर सोशलिस्ट पार्टीनं या दिवसाला महिला दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
अमेरिकेनंतर युरोपातील महिलांनी देखील त्यांच्या हक्कासाठी 8 मार्च रोजी मोर्चे काढले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रानं 1975 साली 8 मार्चला हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून मान्यता दिली.
( नक्की वाचा : Chhatrapati Sambhajinagar ‘एका लग्नाची गोष्ट' अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान )
19 मार्च 1911 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आाला. ऑस्ट्रिया, जर्मनी, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर 8 मार्च 1971 रोजी रशियातील महिलांनी संप केला. त्यानंतर ही तारीख बदलून 8 मार्च निश्चित करण्यात आली. तेव्हापासून 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world