जाहिरात

International Women's Day 2025: 'ते' आदर्श जग निर्माण करायचंय! 'दादू' गौतम अदाणींची भावुक पोस्ट

International Women's Day 2025:  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

International Women's Day 2025: 'ते' आदर्श जग निर्माण करायचंय! 'दादू' गौतम अदाणींची भावुक पोस्ट

International Women's Day 2025: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केलीय. यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या महिलांबाबतची माहिती लिहिली आहे. आई, पत्नी यांच्याबाबत लिहितानाच 'दादू' अदाणी यांनी त्यांच्या नातींबाबतही मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.  गौतम अदाणी यांना तीन नाती असून त्यांनी म्हटलंय की, माझ्यासाठी 8 मार्च अर्थात महिला दिन हा आपल्याला आणखी किती काम करायचे बाकी आहे, याची आठवण करून देणारा दिवस आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजून खूप काम करणं बाकी आहे - गौतम अदाणी

अदाणी यांनी म्हटलंय की, दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी माझ्या नातीचे बोट पहिल्यांदा धरले होते, तेव्हा मी स्वतःला असे वचन दिले होते की मी तिच्यासाठी असे जग निर्माण करण्यास मदत करेन जेथे ती काहीही साध्य करू शकेल. जेथे पुरुषांइतकाच तिच्या आवाजाचा आदर केला जाईल आणि जेथे तिच्या चारित्र्य आणि योगदानावर तिचे मूल्य आधारित असेल. आता तीन सुंदर नातींसह हे वचन मला अधिक महत्त्वाचे वाटते. आंतरराष्ट्रीय महिला दिन ही केवळ एक तारीख नाहीय तर हा दिवस आपल्या प्रगतीची आणि आवश्यक असलेल्या कामाची आठवण करून देतो. हे मिशन माझ्यासाठी वैयक्तिक आहे.

(नक्की वाचा: Women's Day 2025: आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो? वाचा इतिहास)

अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणींनी म्हटलंय की, माझी आई ही प्रेम, धैर्य आणि चिकाटीचे प्रतीक होती. तिच्यामुळे आमचे कुटुंब एकसंध होते. बनासकांठामध्ये मोठे होत असताना मी माझ्या आईने केलेला संघर्ष पाहिलाय. कालांतराने माझी पत्नी प्रीती अदाणी यांनी अदाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न सुरू केले. प्रीती अदाणी आणि अदाणी फाउंडेशनच्या संघिणी (सहकारी) यांच्यामुळे मला सशक्तीकरणाचा खरा अर्थ उमगला. अदाणी यांनी पुढे म्हटले की पूर्वी महिलांकडे महत्त्वाची जबाबदारी नव्हती. याचा अर्थ असा नव्हता की त्यांच्यात क्षमता नव्हती, याचं कारण होतं की त्यांना ती संधी मिळत नव्हती. मी माझ्यापासून ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र आता ही परिस्थिती बदलताना दिसते आहे. अदाणी समूहाच्या रिन्युएबल एनर्जी प्रकल्पस्थळी महिला अभियंता समस्या सोडवताना दिसत आहे. आमच्या अनेक तंत्रज्ञानाच्या अडचणी महिला सोडवत असून ग्रामीण भागातील महिला उद्योग उभारताना दिसत आहे. आपण प्रगती केली असली तरी माझ्या नातींना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यांना जी ओळख निर्माण करायची आहे त्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच या जागतिक महिला दिनानिमित्त एक उद्योगपती म्हणून नाही तर एक आजोबा म्हणून माझी जबाबदारी आणखी वाढल्यासारखे वाटू लागले आहे. या मुलींना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असे झगडावे लागणार नाही, कारण ती स्वप्नं ही त्यांचीच असतील. 

(नक्की वाचा: International Women's Day 2025 Wishes: नारीशक्तीला सलाम, महिला दिनानिमित्त पाठवा खास मेसेज)

नातींसाठी खास संदेश

गौतम अदाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की, ही पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येक महिलेला हे सांगू इच्छितो की त्यांचा प्रत्येकाचा प्रवास हा महत्त्वाचा आहे. तुमचे नेतृत्व हे गरजेचे आहे. प्रत्येक प्रभावशाली व्यक्तीसाठी लैंगिक समानता गरजेची आहे. महिलांची प्रतिभा आणि नेतृत्व हे असामान्य आहे. आपल्या नातींना उद्देशून अदाणी यांनी म्हटलंय की, " प्रिय नातींनो, तुम्हाला जो वारसा लाभला आहे, तुम्ही त्याचा खुल्या मनाने स्वीकार करा. तुमचे मत हे महत्त्वाचे आहे आणि तुमच्या महत्त्वकांक्षा जोपासल्या गेल्या पाहिजेत. ही परिस्थिती जोपर्यंत वास्ववात येत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत राहीन. तुमचे प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचे स्थान आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: