
Ginger Benefits In Marathi: सर्दी-खोकल्यापासून ते पचनाशी संबंधित समस्यातून सुटका मिळवण्यासाठी तज्ज्ञांकडून आल्याचा छोटा तुकडा खाण्याचा सल्ला दिला जातो. आले केवळ एक मसाला नाहीय तर यामध्ये औषधी गुणधर्माचा साठा आहे. आले आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाहीय. आल्यामध्ये जिंजरोल नावाचे कम्पाउंड आहे, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते. नियमित आल्याचे मर्यादित स्वरुपात सेवन केले तर कोणकोणते लाभ मिळतील, याबाबत डॉक्टर रविंद्र कुलकर्णी (Dr Ravindra L. Kulkarni MD) यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...
आल्याचा छोटा तुकडा खाण्याचे फायदे | Ginger Eating Benefits In Marathi
1. पचनप्रक्रिया सुधारते
आल्यातील पोषणतत्त्व एंझाइम उत्तेजित करण्याचे काम करतात, यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत मिळते.
2. अॅसिडिटीची समस्या कमी होते
आल्यातील पोषणतत्त्वांमुळे अॅसिडिटी आणि पोट फुगण्याची समस्या कमी होते. कारण गॅस्ट्रिक मोटिलिटी सुधारते म्हणजे पोटातील स्नायूंची हालचाल होऊन अन्नाचे विघटन होण्यास मदत मिळते. यामुळे पोटातील गॅस कमी होण्यास मदत मिळते.
3. अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म
आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यातील जिंजरोल नावाच्या कम्पाउंडमुळे सांध्यांवरील सूज कमी होण्यास मदत मिळते.
4. मळमळणे कमी होते
केमो थेरपी घेणाऱ्या आणि प्रवासादरम्यान अनेकांना उलटी किंवा मळमळण्याचा त्रास होता. आल्यामुळे हा त्रास कमी होऊ शकतो.

Photo Credit: Canva
5. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते
आल्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-वायरल कम्पाउंडमुळे शरीराचे संरक्षण होते.
6. बीपी आणि कोलेस्टेरॉलची समस्या
आल्यातील पोषणतत्त्वांमुळे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होण्यास मदत मिळते. ज्यामुळे बीपी आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

Photo Credit: Canva
7. रक्तप्रवाह
शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि हातापायांना ऊब मिळते.
8. सांधेदुखी कमी होते
आल्यातील औषधी गुणधर्मामुळे सांधेदुखीचा त्रासही कमी होतो.
9. कफ आणि घशातील खवखव
आल्यातील अँटी-मायक्रोबियल गुणधर्मामुळे घशातील खवखव कमी होण्यास आणि कफपासून सुटका मिळते.

Photo Credit: Canva
10. अँटी-ऑक्सिडंट्स
आल्यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे फ्री रॅडिकल्सपासून शरीराचे संरक्षण होते आणि पेशींचे झालेले नुकसान भरुन निघण्यास मदत मिळते.
11. मधुमेहाची समस्या
मधुमेहग्रस्तांसाठी आले खाणे फायदेशीर ठरते, कारण साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
आल्याचे सेवन कसे करावे?डॉक्टर रविंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार...
- चहामध्ये आले मिक्स करू शकता.
- सकाळी लिंबू आणि आले मिक्स करुन कोमट पाणी प्यावे.
- स्वयंपाकामध्ये आले-लसूण पेस्ट मिक्स करावी.
- आल्याचा छोटासा तुकडा चावून खाऊ शकता.
- सलग सात दिवस आल्याचा छोटा तुकडा चावून खाल्ल्यास तुम्हाला शरीरामध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.
तुमच्या स्वयंपाकघरातलं आलं = Natural Medicine Box!
— Dr Ravindra L. Kulkarni MD (@KulkarniRL) September 27, 2025
1.Digestion सुधारतो : आलं enzymes stimulate करून food breakdown सोपं करतं.
2.Acidity & bloating कमी करतो : gastric motility सुधारतो, त्यामुळे गॅस कमी होतो.
3.Anti-inflammatory action : Gingerols joints व tissues मधली सूज control…

Photo Credit: Canva
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world