iphone 17 Cosmic Orange: "मी मुस्लीम आहे तरीही…", आयफोन खरेदीनंतर तरुणाची प्रतिक्रिया चर्चेत

लाँचिंगमधील सर्वात मोठे आकर्षण ठरले ते ‘आयफोन 17 प्रो’ आणि ‘आयफोन 17 प्रो मॅक्स’चे ‘कॉस्मिक ऑरेंज’ एडिशन. अनेकांनी या रंगाला ‘भगवा’ किंवा ‘केशरी’ रंग असे म्हटले आहे. ज्यामुळे या रंगाला केवळ त्याच्या आकर्षकतेमुळेच नाही, तर सांस्कृतिक महत्त्वांमुळेही अधिक पसंती मिळत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

iphone 17 Cosmic Orange: दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू येथील ॲपल स्टोअर्समध्ये शुक्रवार सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. आयफोन 17 (iPhone 17) सीरिजची अधिकृत विक्री सुरू होताच, नवीन फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी तासन्तास रांगा लावल्या होत्या. अनेक ग्राहक हे नवीन ‘ॲपल वॉच' आणि ‘एअरपॉड्स' खरेदी करण्यासाठीही उत्सुक होते.

‘मॉल ऑफ एशिया'मधील नुकत्याच सुरू झालेल्या ‘ॲपल हेबल' (Apple Hebbal) स्टोअरसह प्रमुख ॲपल स्टोअर्समध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. या लाँचिंगमधील सर्वात मोठे आकर्षण ठरले ते ‘आयफोन 17 प्रो' आणि ‘आयफोन 17 प्रो मॅक्स'चे ‘कॉस्मिक ऑरेंज' एडिशन. अनेकांनी या रंगाला ‘भगवा' किंवा ‘केशरी' रंग असे म्हटले आहे. ज्यामुळे या रंगाला केवळ त्याच्या आकर्षकतेमुळेच नाही, तर सांस्कृतिक महत्त्वांमुळेही अधिक पसंती मिळत आहे.

(नक्की वाचा-  Amazon-Flipkart Sale 2025: सर्वात कमी किमतीत वस्तू कशी खरेदी कराल? या 2 ट्रिक समजून घ्या)

(नक्की वाचा- Amazon vs Flipkart Sale 2025: iPhone 50 हजारांपर्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी, चेक करा डिटेल्स)

मी मुस्लीम असलो तरी...

दिल्लीतील एका तरुणाने सांगितले, "मी संगम विहारमधून आलो आहे आणि सकाळपासून रांगेत उभा आहे. मी खूप उत्साहित आहे, हा फोन हातात घेतल्यावर मला काहीतरी जिंकल्यासारखं वाटतंय. कॉस्मिक ऑरेंज रंग खरंच खूप सुंदर आणि प्रभावी दिसतो. मी मुस्लीम असलो तरी मला हा रंग खूप आवडतो." तरुणाच्या या प्रतिक्रियेमुळे या ‘कॉस्मिक ऑरेंज' रंगाचे आकर्षण विविध समुदायातील लोकांना असल्याचे दिसून आले आहे.

मुंबईतील अमन चौहान नावाच्या ग्राहकाने सांगितले की, "मी आयफोन 17 प्रो मॅक्सचे 256GB आणि 1TB मॉडेल खरेदी केले आहेत. मी मध्यरात्रीपासून रांगेत थांबलो होतो आणि आता मला तो मिळाला आहे. यात अनेक नवीन फीचर्स आहेत. ऑरेंज रंग नवीन आहे आणि त्याला मोठी मागणी आहे."

Advertisement

सोशल मीडियावरही आयफोनच्या या ऑरेंज रंगाची जोरदार चर्चा सुरु आहे. एका युजरने म्हटलं की, "एक भगवा आयफोन भारतात गेम-चेंजर ठरू शकतो. याला मोठी मागणी मिळण्याची क्षमता आहे."
 

Topics mentioned in this article