
Is Too Much Sleep Harmful: झोप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. चांगली झोप असेल तर मेंदू आणि शरीर दोन्ही गोष्टींना आराम मिळतो. मात्र अतिरिक्त प्रमाणात झोप घेणंही आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायी आहे. नुकत्याच एक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. जर एखादी व्यक्ती दररोज नऊ तासांपेक्षा जास्त झोपत असेल तर त्याचा अचानक किंवा लवकरच मृत्यूचा धोका 34 टक्क्यांनी वाढू शकतो.
रिसर्चमध्ये काय समोर आलं...
हा रिसर्च अमेरिका आणि युरोपमधील हेल्थ रिसर्च डेटावर आधारित होता. ज्यात लाखो लोकांच्या झोपेच्या सवयी आणि हेल्थ हिस्ट्रीचं विश्लेषण करण्यात आलं.दररोज नऊ तासांपेक्षा अधिक झोप घेणाऱ्यांमध्ये हृदयविकार, मधुमेह, स्ट्रोक आणि गंभीर आजारांचा धोका असतो. यांचा मृत्यूदर (mortality risk) सामान्य लोकांच्या तुलनेत जास्त असतो.
झोप योग्य प्रमाणात असावी, पण किती?
आरोग्य तज्ज्ञानुसार, 18 ते 60 वर्षांच्या व्यक्तीने दररोज 7 ते 8 तासांची झोप घेणं पुरेसं आहे. शरीर रिकव्हर करणं, मेंदूचं आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हा काळ महत्त्वाच असतो. मात्र नऊ तासांहून अधिक झोप घेतल्याने आळस आणि अन्य मानसिक आणि शारिरीक त्रास वाढू शकतो.
नक्की वाचा - 2 आठवडे साखर बंद केली तर...? तुमचं व्यक्तिमत्त्वचं बदलून जाईल, ट्राय करून पाहा!
जास्त झोप घेतल्यानं काय त्रास होऊ शकतो?
- मेटाबॉलिजम मंद होतो, ज्यातून स्थूलता वाढू शकते.
- मेंदूचे कार्य कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो.
- नैराश्य आणि चिंता वाढण्याचा धोका वाढतो
- हृदयविकार आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
- शरीरात थकवा आणि उत्साह कमी असतो.
काय कराल?
- दररोज नियमित वेळेत झोपा आणि रात्री उशीरा जागरण करू नये.
- झोपण्यापूर्वी मोबाइल किंवा स्क्रीनचा वापर कमी करा.
- रात्रीच्या जेवणात कॅफीन आणि जास्त कॅलरीयुक्त अन्न घेऊ नये.
- दिवसभर थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
झोप आवश्यक आहे, मात्र योग्य प्रमाणात. कमी झोपणं धोकादायक आहे, तसंच जास्त झोप घेणंही तितकच धोकादायक असू शकतं. म्हणून दररोज सात ते आठ तास गाढ झोप घेणं सर्वात चांगलं. संशोधनानुसार, नऊ तासांहून जास्त झोप घेणाऱ्यांमध्ये अचानक किंवा लवकर मृत्यूचा धोका ३४ टक्क्यांपर्यंत वाढतो. त्यामुळे जास्त झोप घेणं शरीरासाठी धोकादायक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world