जाहिरात

Jyeshtha Gauri Pujan 2025 Date: ज्येष्ठा गौरी आगमन, पूजन कधी आहे? उत्सवाची कथा, परंपरा जाणून घ्या

Jyeshtha Gauri Pujan 2025 Date: ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन कधी आहे, जाणून घेऊया सविस्तर माहिती....

Jyeshtha Gauri Pujan 2025 Date: ज्येष्ठा गौरी आगमन, पूजन कधी आहे? उत्सवाची कथा, परंपरा जाणून घ्या
"Jyeshtha Gauri Pujan 2025 Date" गौरी पूजन कधी आहे?"

Jyeshtha Gauri Pujan 2025 Date: गणपती देवतेची प्रतिष्ठापना झाल्यानंतर काही दिवसांनंतर गौरींचे आगमन होते. गौरीला "ज्येष्ठा गौरी" या नावानेही संबोधले जाते. विदर्भामध्ये गौरीला "महालक्ष्मी", मराठवाड्यामध्ये "लक्ष्मी" तर कोकणामध्ये "गौरी" या नावाने संबोधले जाते. गौरी हे पार्वती मातेचे नाव आहे. परंपरेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होते. ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी पूजन आणि  मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची परंपरा आहे. तीन दिवस गौरीचे व्रत केले जाते. महाराष्ट्रामध्ये भाद्रपद महिन्यातील शुद्ध सप्तमीला गौरींचे घराघरात आगमन होते. गौरी ही गणपती देवतेची आई पार्वती. गौरी पूजनाकरिता धातूची, मातीची गौरी तर काही लोक गौरीचे प्रतिमेचीही पूजा करतात. यंदा गौरी आवाहन कधी आहे, गौरी पूजन आणि गौरी विसर्जन कधी आहे? याबाबत माहिती जाणून घेऊया... 

भाद्रपद शुद्ध सप्तमी तिथीला गौरी पूजन केले जाते.

  • रविवार, 31 ऑगस्ट 2025 : ज्येष्ठा गौरी आवाहन
  • सोमवार, 1 सप्टेंबर 2025 : ज्येष्ठा गौरी पूजन
  • मंगळवार, 2 सप्टेंबर 2025 : ज्येष्ठा गौरी विसर्जन

गौरी पूजनाची सामग्री (Gauri Puja Samagri)

भगवान शिवशंकर, दुर्गा माता आणि गणेश मूर्ती
मूर्तीला स्नान घालण्यासाठी ताम्हन, देवतांचे वस्त्र आणि अलंकार  
हळदी, कुंकू, चंदन, गंगाजल, अक्षता, दिवा, तेल, कापूस, धूपबत्ती, अष्टगंध
गुलाब, फुले, सुपारीची पाने आणि आंब्याची पाने
नैवेद्यासाठी फळे, दूध, मिठाई, नारळ, पंचामृत, सुकामेवा, साखर, पान, दक्षिणा आणि इतर.

ज्येष्ठा गौरी व्रताची पौराणिक कथा (Gauri Avahan Katha)

पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व महिला आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी महिला ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात, असे म्हणतात.

गौरी पूजन विधी (Gauri Puja Vidhi)

  • प्रत्येक ठिकाणी गौरी पूजनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.
  • सर्वप्रथम स्वतःच्या कपाळावर कुंकू लावावे.  
  • घरातील देवांना नमस्कार करुन पूजेस शुभारंभ करावा. 
  • परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. 
  • अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचे मातीचे मुखवटे बसवतात. 
  • काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटे बसवतात. 
  • काही ठिकाणी सुगंधित फुलांच्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचे मुखवटे चढवण्याची परंपरा आहे. 
  • रूढीप्रमाणे मूर्तीला चोळी साडी नेसवून अलंकारांनी सजवले जाते. 
  • गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तामध्ये गौरी बसवल्या जातात. 
  • गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. 
  • प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून घरामध्ये आणून आसनावर विराजमान करतात.
  • महापूजनात पाना-फुलांची आरास करतात. 
  • विधीवत गौरीची स्थापना करतात.

ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी गौरीला महानैवेद्य अर्पण करण्याची परंपरा (Gauri Puja Bhog) 

  • माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो.
  • माहेरवाशीण ज्येष्ठा गौरीला पुरणाचा नैवेद्य अर्पण करतात. 
  • नैवेद्याला 16 प्रकारच्या भाज्या, 16 प्रकारच्या कोशिंबिरी, 16 प्रकारच्या चटण्या, 16 प्रकारची पक्वान्ने आणि फराळाचे पदार्थ अर्पण करतात. 
  • संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. 

Jyeshtha Gauri Avahanachya Wishes In Marathi: आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा! ज्येष्ठा गौरी आगमनानिमित्त पाठवा खास शुभेच्छा

(नक्की वाचा: Jyeshtha Gauri Avahanachya Wishes In Marathi: आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा! ज्येष्ठा गौरी आगमनानिमित्त पाठवा खास शुभेच्छा)

गौरी व सोळा अंक यांचा काय संबंध आहे?

गौरी उत्सवामध्ये 16 अंकाचे महत्त्व  आहे. सोळा प्रकारच्या भाज्या या वेळी जाणीवपूर्वक केल्या जातात. चंद्राच्या 16 कला हे त्यामागील कारण आहे, असे म्हणतात. यावरुन गौरी सणाचा संबंध निसर्गक्रमाशी आहे, असे दिसून येते. त्यामुळेच सोळा प्रकारची पक्वान्ने आणि पूजेला 16 प्रकारची पत्री अर्पण केली जातात. 

गौरी विसर्जन  (Gauri Visarjan)

गौरी विसर्जन आणि गणपती विसर्जन एकाच दिवशी आल्यास आधी गौरी विसर्जन करतात. 
संध्याकाळी गौरीची पूजा करुन आरती करतात आणि गाऱ्हाणे घालून गौरीला वाजत-गाजत निरोप दिला जातो. 
विसर्जनापूर्वी  त्या त्या भागातील परंपरेनुसार गौरीला नैवेद्य अर्पण केला जातो. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com