जाहिरात

Aluminium Foil Vs Butter Paper: अ‍ॅल्युमिनियम फॉइल की बटर पेपर, जेवणाच्या डब्यासाठी कशाचा वापर करावा?

Aluminium Foil Vs Butter Paper: जेवणाचा डबा भरताना बटर पेपर आणि अ‍ॅल्युमिनियम फॉइल यापैकी नेमके काय वापरावे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Aluminium Foil Vs Butter Paper: अ‍ॅल्युमिनियम फॉइल की बटर पेपर, जेवणाच्या डब्यासाठी कशाचा वापर करावा?
"Aluminium Foil Vs Butter Paper: जेवणाचा डबा भरताना कोणत्या पेपरचा वापर करता?"

Aluminium Foil Vs Butter Paper: मुलांचा शाळेचा डबा असो किंवा ऑफिसचा डबा, बहुतांश लोक यासाठी अ‍ॅल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपरचा वापर करतात. पण यापैकी कोणता पर्याय तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असेल, हे तुम्हाला माहितीये का? काहीजण फॉइल पेपरमध्येच गरमागरम जेवण भरतात, पण तुमची ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. बटर पेपर की अ‍ॅल्युमिनियम फॉइल, डबा भरताना कोणत्या पेपरचा वापर करावा, जाणून घेऊया माहिती...

Latest and Breaking News on NDTV

अ‍ॅल्युमिनियम फॉइल वापरताना सावधगिरी बाळगा (Aluminium Foil) 

अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये गरमागरम जेवण भरले जात असेल तर या पेपरमधील छोटेछोट कण खाद्यपदार्थांमध्ये मिक्स होऊ शकतात. यामुळे पोट, हाडे आणि मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. दीर्घकाळ अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जात असेल तर पचनप्रक्रियेशी संबंधित समस्या आणि हाडे देखील कमकुवत होऊ शकतात. म्हणून फॉइल पेपरमध्ये गरम खाद्यपदार्थांऐवजी थंड स्वरुपातील जेवण भरावे.

Soaked Raisin Benefits: 1 महिना सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्यास काय होईल?

(नक्की वाचा: Soaked Raisin Benefits: 1 महिना सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्यास काय होईल?)

अ‍ॅल्युमिनियम फॉइल की बटर पेपर, कोणता पर्याय आहे सर्वात बेस्ट? (Butter Paper Benefits)

सेल्युलोजपासून बटर पेपर तयार केला जातो, जे खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित मानला जाते. बटर पेपर खाद्यपदार्थामधील अतिरिक्त तेल शोषून घेते. तसेच खाद्यपदार्थ दीर्घकाळासाठी ताजे राहण्यासही मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे आरोग्यावर दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे अ‍ॅल्युमिनियम फॉइलऐवजी बटर पेपरचा वापर करावा.

Latest and Breaking News on NDTV

तज्ज्ञांचा सल्ला (Foil Or Butter Paper) 

खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी बटर पेपर वापरणंच आरोग्यासाठी योग्य पर्याय आहे. अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा वापर मर्यादित स्वरुपात करावा. 

Side Effects Of Eating Wheat: गव्हाची पोळी रोज खाताय? यातील एक प्रोटीन आरोग्यासाठी ठरू शकते घातक

(नक्की वाचा: Side Effects Of Eating Wheat: गव्हाची पोळी रोज खाताय? यातील एक प्रोटीन आरोग्यासाठी ठरू शकते घातक)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com