
Asia Cup 2025 India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा महासंग्राम आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आशिया कप स्पर्धेच्या गट टप्प्यात होणाऱ्या या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास त्यांच्या सराव सत्रातून दिसून येत आहे. खेळाडूंच्या चित्त्यासारख्या चपळाईचे व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या उत्कृष्ट तयारीची झलक मिळाली आहे. (India VS Pakistan Record)
क्षेत्ररक्षणात टीम इंडियाच्या शिलेदारांची कमाल..
भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिल याने सरावात मारलेली उंच उडी आणि त्याचे क्षेत्ररक्षण पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याच्या फिटनेसची पातळी पाहून अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. गिलसोबतच अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि युवा खेळाडू रिंकू सिंग देखील क्षेत्ररक्षणाचा कसून सराव करताना दिसत आहेत. या खेळाडूंनी त्यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
गिल की फुर्ती का ट्रेलर देखो पाकिस्तान, देखिए जरा क्या गजब कैच पकड़ा#INDvsPAK | #AsiaCup2025 | @Vimalsports pic.twitter.com/yw9rVd99p0
— NDTV India (@ndtvindia) September 14, 2025
पाकिस्तान अडचणीत
दुसरीकडे, पाकिस्तान संघाची स्थिती पाहता भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांची फलंदाजी कमकुवत झाली आहे. यामुळेच, पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेटपटू शोएब अख्तर, मिसबाह-उल-हक आणि शोएब मलिक यांनी आधीच भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार म्हटले आहे. भारतीय खेळाडूंचा सध्याचा फॉर्म आणि त्यांची तयारी पाहता पाकिस्तानसाठी हा सामना जिंकणे अत्यंत कठीण असल्याचे त्यांचे मत आहे.
आकडेवारीतही टीम इंडिया अव्वल
केवळ तयारीच नव्हे, तर आकडेवारीतही भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा पुढे आहे. आशिया कपमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण १९ सामने झाले आहेत. यात भारतीय संघाने १० सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने केवळ ६ सामने जिंकले आहेत. टी-२० फॉरमॅटमध्येही भारतीय संघ वरचढ असून, तीन सामन्यांपैकी दोन सामने भारताने जिंकले आहेत. या आकडेवारीवरून टीम इंडियाचे वर्चस्व स्पष्ट दिसते.
या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपले सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडले आहेत. भारतीय संघात सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत, तर पाकिस्तानच्या संघात सलमान आगा (कर्णधार) आणि शाहिन शाह आफ्रिदी यांसारखे खेळाडू आहेत.
भारत: सूर्यकुमार यादव (कप्तान), शुभमन गिल (उप-कप्तान), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, संजू सैमसन, हर्षित राणा और रिंकू सिंह.
पाकिस्तान: सलमान आगा (कप्तान), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, साहिबजादा फरहान, सईम अयूब, सलमान मिर्जा, शाहीन शाह अफरीदी और सुफियान मोकिम.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world