Osteoarthritis Treatment: गुडघ्यातून कटकट आवाज येतो? जिने चढताना त्रास होतो? डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा

Osteoarthritis Treatment: गुडघ्यातून कटकट आवाज येतोय किंवा चालताना तीव्र वेदना होत आहेत? डॉ. रुचा पै यांनी सांगितलेले हे सोपे घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करून गंभीर आजारापासून मिळवा झटपट आराम.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Osteoarthritis Treatment: सावधान! गुडघ्यांमधून कटकट आवाज येतो?"
Canva

Osteoarthritis Treatment: गुडघ्यांमधून येणारा कटकट आवाज, जिना चढताना होणाऱ्या तीव्र वेदना किंवा सकाळी उठल्यावर सांध्यांमध्ये येणारा कडकपणा या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ही साधी पाठदुखी किंवा थकवा नसून ऑस्टियोआर्थरायटिस म्हणजेच संधिवाताची सुरुवात असू शकते. डॉ. रुचा पै यांच्या मते, चुकीचा आहार आणि जीवनशैलीमुळे शरीरात वातदोष वाढतो, ज्याचा थेट परिणाम सांध्यांच्या आरोग्यावर होतो. चला तर मग, सांध्यांमधील वंगण कमी होऊन होणाऱ्या या त्रासाची कारणे आणि त्यावर मात करणारे काही सोपे घरगुती तसेच आयुर्वेदिक उपाय सविस्तर जाणून घेऊया.

डॉ. रुचा पै यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय ते जाणून घेऊया...

गुडघ्यात कटकट आवाज येतोय? चालताना वेदना होते?
जिना चढताना गुडघे दुखतात का?
सकाळी उठल्यावर सांधे कडक होतात का?
बसल्यावर उठताना त्रास होतो का?
ही साधी वेदना नाही... संधिवाताची सुरुवात असू शकते.

Advertisement

संधिवात (Sandhivat /Osteoarthritis)

Normal Joint: सांध्यामध्ये cartilage (मऊ थर) असतो Synovial fluid lubrication देतो, ज्यामुळे शरीराची हालचाल योग्य पद्धतीने आणि वेदनाविरहित होते. 

ऑस्टियोआर्थरायटिस (Osteoarthritis) मध्ये शरीरावर काय परिणाम होतात?

  • कार्टिलेज (cartilage) हळूहळू झिजत
  • जॉइंट स्पेस (joint space) कमी होते
  • हाडं एकमेकांवर घासतात
  • सूज (inflammation) वाढते

यामुळे वेदना वाढतात, कडकपणा जाणवतो आणि शरीराला हालचाली करण्यात अडथळे निर्माण होतात. 

संधिवाताची सम्प्राप्ती (Pathogenesis)
1. वात वाढतो (वय, उपवास, कोरडा आहार, ताण)
2. वात संधींमध्ये जाऊन बसतो 
3. स्नेहन कमी करतो: सायनोव्हियल फ्लुइड (Synovial Fluid) सारखं वंगण (lubrication) कमी
4. धातू क्षय (अस्थि + cartilage) - झीज सुरू होते
5.  रुक्षता वाढते (stiffness + pain)

1. तिळाच्या तेलाने अभ्यंग (Best remedy)/ एरंड तेलाने मालिश

कसं करायचंः तिळाचं तेल थोडं कोमट करा, दुखत असलेल्या सांध्यावर 10-15 मिनिटे मालिश, नंतर गरम शेक द्या.
फायदे कोणते मिळतात: कडकपणा (stiffness) कमी होईल, वंगण (lubrication) वाढतं, वेदना हळूहळू कमी होतील.

2. गरम पाण्याने शेक (Swedan)

पर्यायः गरम पाण्याची पिशवी
पोटली
फायदाः
सूज कमी होते
रक्तप्रवाह सुधारतो
लगेचच आराम मिळतो

(नक्की वाचा : Health News: बाहेरचं खाऊन पोट बिघडलंय? सलग 15 दिवस खा ही घरातली 1 गोष्ट! हाडे, त्वचेलाही मिळतील जबरदस्त फायदे)

3. लसूण + तूप

कसा करावा वापर: 1 लसूण पाकळी तुपात हलकी परतून सकाळी किंवा दुपारच्या जेवणात घ्यावी
फायदाः वात शमन करतं, सूज कमी होते
पण अ‍ॅसिडिटी/ पित्त प्रकृती असल्यास हा उपाय रोज करू नये 
एक दिवसाआड करावा , रिकाम्या पोटी लसूण-तूप घेऊ नये, जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात उष्णता वाढू शकते

Advertisement

4. भिजवलेले काळे तीळ

कसं घ्यायचंः एक चमचा काळे तीळ रात्री भिजवून सकाळी खा
फायदाः सांध्यांना बळ मिळेल (calcium + lubrication support)

5. संधिवातामध्ये आहार कसा असावा?

  1. वातशामक, पचायला सोप्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे
  2. तूप मर्यादित प्रमाणात
  3. उकडलेले / शिजवलेले ताजे अन्न
  4. मूग डाळ, मूग खिचडी
  5. लसूण (मर्यादित)
  6. गरम पाणी
  7. दुधी भोपळा, गाजर, पडवळ, घोसाळे
  8. नाचणी, ज्वारी, बाजरी (प्रकृतीनुसार)

काय खाणे टाळावे?

  1. वात वाढवणारे / जड / गॅस करणारे पदार्थ खाणे टाळावे
  2. थंड पदार्थ
  3. दही (विशेषतः रात्री)
  4. बिस्किट, मैदा, बेकरी प्रोडक्ट्स 
  5. कोरड्या प्रकृतीचे पदार्थ 
  6. वांगे
  7. बटाटा जास्त प्रमाणात
  8. गवार
  9. पावटे / वाल / जड कडधान्ये
  10. बेसनाचे पदार्थ
  11. पुरणपोळी (जड असल्याने मर्यादित /क्वचित)
  12. हलकी इडली / डोसा

काय व्यायाम करावा?

  1. हलका योग (जसे knee rotation, stretching)
  2. चालणे (over strain नको)
  3. आयुर्वेदिक उपचार (Doctor Guided)
  4. बस्ती (Panchakarma)
  5. जानु बस्ती (गुडघ्यासाठी)

संधिवात म्हणजे फक्त वयामुळे होणारा त्रास नाही तर वातदोष वाढल्यामुळेही निर्माण होतो.
योग्य वेळी उपचार घेतले तर वेदना कमी होऊ शकतात, हालचाल सुधारू शकते. पुढील नुकसान टाळता येऊ शकतं

(नक्की वाचा : सावधान! मोबाइलमधील एक गोष्ट तुमच्या मेंदूची रचनाच बदलतेय, विचारही करू शकणार नाही इतका होऊ शकतो गंभीर परिणाम)

Advertisement

डॉक्टर रुचा पै यांनी शेअर केलेली पोस्ट वाचा

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)