Curd Eating Benefits: हरियाणातील रहिवासी असलेल्या पूजेला रेस्टॉरंट / हॉटेलमधील खाद्यपदार्थ खायला खूप आवडायचे. एनडीटीव्हीशी (NDTV) बोलताना तिने सांगितले की, दिवसातून किमान एकदा तरी बाहेरचे खाल्ल्याशिवाय तिला समाधान मिळत नव्हते. पण या सवयीमुळे तिला वारंवार पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असे. पूजा पुढे म्हणाली की, एके दिवशी बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर तिला पोटात तीव्र वेदना, जळजळ आणि अपचनाचा त्रास होऊ लागला. या घटनेने तिला विचार करण्यास भाग पाडले. आपल्या आहारात काहीतरी आरोग्यदायी (Healthy) गोष्टीचा समावेश करणे आवश्यक आहे, याची जाणीव तिला झाली. यानंतर तिने सलग 15 दिवसांपर्यंत रोज आपल्या जेवणाच्या ताटात दह्याचा समावेश केला.
दह्याला 'सुपरफूड' का म्हटले जाते?
असंख्य आरोग्यवर्धक फायद्यांमुळे 'दही' हे सुपरफूड मानले जाते. दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषणतत्त्वांचा समावेश आहे. प्रोटीन आणि कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत म्हणजे दही. तसेच दह्यामध्ये बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे गुणधर्म देखील आहेत. यामुळे शरीराचे मेटाबॉलिज्म (चयापचय क्रिया) सुधारण्यास आणि पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले राहते. दही तयार करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस बुल्गारिकस आणि स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस यासारख्या प्रोबायोटिक्सचा वापर केला जातो. यामुळे दुधातील लॅक्टोज लॅक्टिक ॲसिडमध्ये बदलते.
रोज दही खाल्ल्याने पूजेमध्ये काय बदल दिसून आले?
1. पचनप्रक्रियेमध्ये सुधारणा
पूजा म्हणाली की, 'जेव्हा मी रोज दही खाण्यास सुरुवात केली, तेव्हा काहीच दिवसांत माझे पोट स्वच्छ होऊ लागले आणि मला खूप हलके वाटू लागले.' मला जाणवले की माझ्या शरीरात चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होत आहे, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया देखील सुधारली. दही पोटातील हानिकारक बॅक्टेरिया कमी करते आणि आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. मला बद्धकोष्ठताआणि अपचन यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळाला. 'नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन'च्या संशोधनातही असे सांगितले गेले आहे की, नियमितपणे दही खाल्ल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल हेल्थ (पोटाचे आरोग्य) सुधारते.
2. रोगप्रतिकारकशक्ती
पूजाने सांगितले की, जेव्हा तिने रोज दही खाण्यास सुरुवात केली, तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) आधीपेक्षा चांगली होत असल्याचे जाणवले. मी आधी वारंवार छोट्या-मोठ्या आजारांमुळे त्रस्त असायचे, पण हळूहळू माझे शरीर अधिक मजबूत झाल्यासारखे वाटू लागले.' दह्यामध्ये असलेले मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक यासारख्या पोषक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास मदत मिळते.
3. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करते
पूजा पुढे म्हणाली की, जेव्हा घरात तयार केलेले दही (साखर मिक्स न करता) खाण्यास सुरुवात केली तेव्हा शरीराच्या ब्लड शुगर लेव्हलमध्येही फरक जाणवला.
(नक्की वाचा : सावधान! मोबाइलमधील एक गोष्ट तुमच्या मेंदूची रचनाच बदलतेय, विचारही करू शकणार नाही इतका होऊ शकतो गंभीर परिणाम)
4. हाडांसाठी फायदेशीर
दह्यामुळे काही दिवसांतच हाडांमध्येही फरक जाणवू लागला. अशक्तपणा कमी झाल्याचंही पूजाने सांगितले.
(नक्की वाचा : Kitchen Tips: तुमच्या किचनमध्ये लपलाय मृत्यू! 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या तरच संपूर्ण कुटुंब राहील सुरक्षित)
5. कॅन्सरचा धोका कमी करते
दह्यामध्ये अँटी-कार्सिनोजेनिक (कर्करोगविरोधी) गुणधर्म असतात आणि हे शरीरला कोलन, ब्लॅडर आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचवण्यासाठी ओळखले जाते. 'नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन'च्या संशोधनानुसार, रोज दही खाल्ल्याने आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world