Year Ender 2024: 'न्यू इयर' ची पार्टी प्लान करताय? बंदी घातलेल्या पदार्थांबाबत घ्या माहिती, अन्यथा...

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Year Ender 2024: यंदाचं वर्ष, म्हणजेच 2024 संपायला अवघे काही दिवस उरले आहेत.  डिसेंबर महीना उजाडताच सगळेच नववर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागतात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागताची सर्वजण तयारी करत असतात. या काळात होणाऱ्या न्यू इयर पार्ट्यांमध्ये आपणवेगवेगळे पदार्थ  खातो. पण, त्यामधील काही पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

यावर्षी , केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा विभागाने (FSSAI -  Food Safety and Standards Authority of India) ग्राहकांच्या आरोग्याबाबत दक्षता घेत अनेक खाद्यपदार्थांवर बंदी घातली आहे.  त्यामुळे 2024 संपण्यापूर्वी बंदी घातलेले हे पदार्थ कोणते आहेत ते पाहूया.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यावर्षी बॅन केले गेलेले खाद्यपदार्थ- These Food Product Ban In 2024:

1. कृत्रिम रंग असलेली मिठाई आणि बेकरी उत्पादने

यावर्षी कृत्रिम रंगाचा वापर असलेल्या मिठाई आणि बेकरी उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. सिंथेटिक रंगांच्या वापरामुळे कॅन्सर आणि त्वचेच्या ॲलर्जीसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यावर्षी मिठाई आणि बेकरी प्रोडक्ट्समध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

(नक्की वाचा : कधीही सिगारेट न पिणाऱ्यानांही का होतो कर्करोग? जाणून घ्या कारणे)

2. हाय ट्रान्स फॅट स्नॅक्स- HIGH TRANS FAT SNACKS

ट्रान्स फॅट्सयुक्त म्हणजेच कुकीज,चिप्स या प्रकारचे स्नॅक्स आपण अनेकदा आवडीनं खातो. पण हे पदार्थ देखील धोकादायक आहेत.  या पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. कारण, जास्त प्रमाणात ट्रान्स फॅटमुळे हृदयविकार, लठ्ठपणाचा  स्ट्रोक, आणि मज्जासंस्थामध्ये बिघाड होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हाय ट्रान्स फॅट फूडवर बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement

3. हाय सोडियम जंक फूड- HIGH SODIUM JUNK FOOD

कोणत्याही कालखंडात सेलिब्रेशन करण्यासाठी जंक फूड ही तरुणाईची पहिली पसंती असते. पण जंक फूडमध्ये अनेकदा मीठाचे प्रमाण जास्त असते. जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब आणि किडनीशी संबंधित समस्या वाढू शकतात. त्यामुळे यंदा अनेक इन्स्टंट नूडल्स आणि 'रेडी टू इट' पदार्थांवर बंदी घालण्यात आली.

(नक्की वाचा :वजन कमी करण्याच्या नावाखाली तुम्हीही दिवसभर पिताय गरम पाणी? वेळीच व्हा सावध )

4. सी फूड - SEA FOOD

यंदा एक्सपायर झालेल्या सी फूडवर बंदी घालण्यात आली आहे. अनेकदा कितीतरी शिळे झालेले सी - फूड बाजारात विकले जाते. मात्र, अशा प्रकारच्या फूडमुळे विषबाधा आणि इतर आरोग्य समस्यांमुळे शिळ्या समुद्री उत्पादनांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement

5. बनावट ऑर्गेनिक प्रोडक्ट्स- FAKE ORGANIC PRODUCTS

चुकीचे लेबलिंग आणि कृत्रिम रसायनांचा वापर केल्यामुळे अनेक "ऑरगॅनिक" ब्रँडवर यावर्षी बंदी घालण्यात आली आहे.

6. एनर्जी ड्रिंक- ENERGY DRINK 

यंदा अनेक गोड आणि एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्यात आली आहे. एनर्जी ड्रिंक्समध्ये मोठ्याप्रमाणात कॅफिनचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात कॅफिन आरोग्यासाठी घातक ठरू शकते त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो.  त्यामुळे खबरदारी म्हणून काही एनर्जी ड्रिंकवर बंदी घालण्यात आली आहे.