Hot Water Side Effects : वजन कमी करण्यासाठी किंवा पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर काही लोक गरम पाणी पितात. गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण दिवसभरात किती प्रमाणात गरम पाणी पिणे योग्य ठरेल हे तुम्हाला माहिती आहे का? आवश्यकतेपेक्षा गरम पाणी पिणे फायद्याऐवजी तोट्याचे ठरू शकते. हा धोका लक्षात घेता मर्यादित स्वरुपातच गरम पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी देतात. जाणून घेऊया जास्त प्रमाणात गरम पाणी पिण्याचे नुकसान आणि दिवसभरात किती ग्लास गरम पाणी प्यावे? याबाबतची सविस्तर माहिती...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
(नक्की वाचा: पटापट वेटलॉससाठी फॉलो करा हे डाएट प्लान, विराट कोहली-दिशा पाटनीचंही आहे तेच सीक्रेट)
दिवसभरात एकूण किती ग्लास कोमट पाणी प्यावे?
सर्दी-खोकला, घसा घवघवणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. पण मर्यादित स्वरुपात गरम पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी देतात. दिवसभरात तीन ग्लासपेक्षा जास्त प्रमाणात गरम पाणी पिऊ नये. तसेच सकाळी रिकाम्या पोटी आणि जेवण केल्यानंतर तासाभरानंतर कोमट पाणी पिणे फायद्याचे ठरू शकते.
(नक्की वाचा: Hair Care Tips : या 5 गोष्टींचे करा सेवन, गळणार नाही तुमचा एकही केस)
जास्त प्रमाणात गरम पाणी पिण्याचे तोटे (Warm Water Side Effects)
- आवश्यकतेपेक्षा जास्त गरम पाणी प्यायल्यास अन्ननलिकेतून छोटे-छोटे दाणे बाहेर येऊ शकतात.
- जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्यास मूळव्याधाचीही समस्या निर्माण होऊ शकते.
- गरम पाण्यामुळे पोट भरलेले राहते. त्यामुळे डिहायड्रेशनचीही समस्या निर्माण होऊ शकते.
- जास्त गरम पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेवरही दुष्परिणाम होऊ शकतात.
( Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world