
Lakshmi Puja 2025 Wishes In Marathi: लक्ष्मी पूजन हा दीपोत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी घराघरात देवी लक्ष्मीची विधीवत पूजा केली जाते. लक्ष्मीमाता ही संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्याची देवी आहे. व्यापारी वर्गासाठीही हा दिवस विशेष असतो, कारण त्यांच्याकरीता हा नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ मानला जातो. घराच्या प्रवेशद्वारासमोर दिवे प्रज्वलित करून रांगोळ काढून घरामध्ये पूजन करून लक्ष्मीमातेला आमंत्रित केले जाते. लक्ष्मी पूजनानिमित्त मित्रपरिवार, नातेवाईकांसह प्रियजनांना मंगलमय शुभेच्छा नक्की पाठवा.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा | शुभ लक्ष्मी पूजन 2025 | Lakshmi Pujan 2025 Wishes In Marathi | Happy Lakshmi Pujan 2025 Wishes| Happy Diwali 2025
1. लक्ष्मीमातेचं घरामध्ये आगमन होवो
घरात सुख-समृद्धी नांदो
दिव्यांचा लखलखाट साजरा होवो
तुमचे आयुष्य उजळू दे दिव्यांसमान
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
2. दिव्यांची रोषणाई होऊ दे
संपत्तीचे द्वार उघडू दे
लक्ष्मीमातेची कृपा सदैव राहो
तुमचे आयुष्य चैतन्यमय होवो
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
3. रांगोळीच्या रंगात रंग
संपत्तीचा लाभ होवो अनंत
लक्ष्मीपूजनाचा हा पवित्र दिवस
घेऊन येवो यश आणि संतोष
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
4. स्वच्छता, सजावट, दीपांच्या माळा
लक्ष्मीमातेच्या चरणी वाहूया फुलांचा हार
समृद्धीचा होवो आरंभ आज
शुभेच्छा तुम्हाला दीपावलीच्या खास!
Happy Diwali 2025
5. लक्ष्मीमातेचे वाहन, घेऊन येते सौख्य
संपत्ती, आरोग्य, आणि नात्यांचे बळ
दिवाळीचा प्रत्येक क्षण होवो खास
शुभेच्छा तुमच्या संपूर्ण परिवारास!
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
6. दिव्यांचा झगमगाट, फुलांची आरास
लक्ष्मीमातेच्या कृपेचा वर्षाव
घरा-घरात सुख, शांती आणि आनंद
दीपावलीच्या कोटी-कोटी शुभेच्छा!
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
7. लक्ष्मीचा आशीर्वाद असो सदैव
प्रेम, समाधान, मिळो नवे नवे
घरात हसरे चेहरे, हृदयात उमेद
दिव्यांचा सण तुमच्या जीवनात
आनंद घेऊन येवो अपार
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Diwali 2025!
(नक्की वाचा: Happy Diwali 2025: दिव्यांचा सोहळा, लक्ष्मीच्या आगमनाने तुमचे नशीब उजळो; दिवाळीच्या पाठवा खास शुभेच्छा)
8. धन, वैभव, ऐश्वर्याचा साज
लक्ष्मीमातेची असो तुमच्यावर नजर खास
फुलांनी सजलेले तुमच्या घरच्या द्वार
समृद्धी नांदो अपार
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
9. रांगोळी रंगीत स्वप्नांची
लक्ष्मीमातेच्या कृपेची ओळख
समृद्धीचा असो नवा अध्याय
शुभेच्छा तुमच्या प्रत्येक प्रयत्नास!
लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा!
10. दीप उजळती घराघरात
लक्ष्मीमातेच्या स्वागतात
सुख, समृद्धी नांदो घरात
शुभेच्छा असो भरभराटीच्या कायम!
शुभ लक्ष्मीपूजन 2025!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world