जाहिरात

Lakshmi Puja 2025 Shubh Muhurat: लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त, तिथी, पूजा विधी-सामग्रीची सविस्तर माहिती जाणून घ्या

Lakshmi Puja 2025 Shubh Muhurat | Diwali 2025: दिवाळी सणातील लक्ष्मी पूजन कधी आहे? लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त कधी आहे? सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Lakshmi Puja 2025 Shubh Muhurat: लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त, तिथी, पूजा विधी-सामग्रीची सविस्तर माहिती जाणून घ्या
"Lakshmi Puja 2025 Shubh Muhurat : 20 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मी पूजन कधी करावे?"
Canva

Diwali 2025 Lakshmi Puja Date And Shubh Muhurat: महालक्ष्मी माता आणि श्री गणेश देवतेची कृपा मिळवण्यासाठी दिवाळी सणाचे दिवस अतिशय महत्त्वाचे मानले जाते. मान्यतेनुसार दीपोत्सवातील लक्ष्मी पूजन केल्यास जीवनामध्ये सुख-शांती येते तसेच समृद्धीचाही आशीर्वाद मिळतो. यंदा लक्ष्मी पूजेच्या तारखेसंदर्भात लोकांमध्ये गोंधळ आहे. आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीस लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. यंदा आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 03:44 वाजता सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 05:54 वाजता तिथी समाप्त होणार आहे. त्यामुळे काही तज्ज्ञ 20 ऑक्टोबर तर काही ज्योतिषी 21 ऑक्टोबर तर काहींनी दोन्ही दिवशीही लक्ष्मी पूजन करण्याचा सल्ला दिलाय. 

तुमच्या ज्योतिषी गुरुजींनी किंवा तुम्ही जे पंचांग फॉलो करता त्यांनी जर 20 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करण्याचा सल्ला दिला असेल तर तशी पूजा करू शकता. 

Diwali 2025 Lakshmi Puja 2025 On 20th October | Lakshmi Puja 2025 Shubh Muhurat 

दीपावली अमावस्या तिथी कालावधी (Diwali Amavasya Tithi Begins/ Diwali Amavasya Tithi Ends)

आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 03:44 वाजता सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 05:54 वाजता तिथी समाप्त होणार आहे.

When is Diwali in 2025: October 20 or 21? Know Date

दिवाळी लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त  (Diwali 2025 Lakshmi Puja Muhurat)

लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त 20 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 7.41 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेपर्यंत आहे. 
प्रदोष काळ संध्याकाळी 6.12 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेपर्यंत आहे. 
वृषभ काळ संध्याकाळी 7.41 वाजेपासून ते रात्री 9.41 वाजेपर्यंत आहे. 

निशिता काळ मुहूर्त (Nishita Kaal Muhurat Lakshmi Puja Muhurat)

20 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:58 वाजेपासून ते उत्तररात्री 12:48 (AM, 21 ऑक्टोबर) वाजेपर्यंत आहे.
कालावधी : 49 मिनिटे 

लक्ष्मी पूजनासाठी लागणारी सामग्री (Diwali 2025 Lakshmi Puja Samagri) 

पूजेसाठी चौरंग किंवा पाट, चौरंगावर अंथरण्यासाठी नवे वस्त्र, केरसुणी, लक्ष्मीनारायणाची मूर्ती किंवा फोटो, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, फराळाचा नैवेद्य, सुक्या खोबरेच्या दोन वाट्या, खडीसाखर, बत्ताशे, साळीच्या लाह्या, पुरणाचा नैवेद्य, नारळ, गूळ, धणे, फळे, लक्ष्मीमातेची मूर्ती, श्री गणेशाची मूर्ती, सुटी नाणी, शंख, घंटा, आंब्याच्या डहाळ्या, कलश, पंचामृत इत्यादी.

When is Lakshmi Puja 2025 October 20 or 21? Shubh Muhurat 

लक्ष्मी पूजनाची मांडणी कशी करावी? (Diwali 2025 Lakshmi Puja Mandani)

  • देव्हाऱ्यासमोर दोन ते तीन मोठे पाट अथवा चौरंग ठेवावे. चौरंगावर पूजेसाठी आणलेले नवे वस्त्र अंथरावे.  
  • चौरंगावर स्वस्तिक काढावे, स्वस्तिकावर बाहेरून पूजा करून आणलेली नवी केरसुणी ठेवावी. 
  • कलशामध्ये स्वच्छ पाणी घेऊन आंब्याचा डहाळ्यांवर श्रीफळ ठेवा. तांदळाच्या पूंजीवर कलश स्थापित करावा.
  • पाटावर डाव्या बाजूला लक्ष्मीनारायणाचा फोटो किंवा मूर्ती ठेवा, त्यासमोर दोन स्वतंत्र विड्याच्या पानावर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र ठेवा.
  • पूजेसमोर नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ, सुक्या खोबऱ्याच्या एका वाटीमध्ये खडीसाखर, दुसऱ्या वाटीमध्ये बत्ताशे, साळीच्या लाह्या, पुरणाचा नैवेद्य, नारळ, गूळ, धणे, फळे इत्यादी गोष्टी मांडा.
  • लक्ष्मी-नारायणच्या फोटो किंवा मूर्तीशेजारी कुलदेवतेचा टाक ठेवावा.
  • त्याच्यासमोरील बाजूस चार हत्तींनी युक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा नाणे ठेवावे, त्यासमोर पैसे, सोने, चांदी, इत्यादी गोष्टी मांडा 
  • पूजेच्या समोर मधोमध आपल्या देवघरातील श्री गणेशांची मूर्ती, स्वतःच्या उजव्या बाजूस शंख तसेच डाव्या बाजूस घंटा ठेवावी.
  • सर्व गोष्टींना हळद-कुंकू अक्षता फुले अर्पण करा, निरांजन ओवाळावे. 
  • पूजा मांडणी करुन झाल्यानं विधीवत पूजा-आरती-प्रार्थना करावी, प्रसादाचे वाटप करावा.  
  • दुसऱ्या दिवशी पूजेचे उद्यापन करावे आणि पूजा साहित्य निर्माल्य प्रवाहित करावे.  

गुरुजी कौस्तुभ जोशींनी लक्ष्मी पूजनाबाबत सांगितली महत्त्वाची माहिती 

Lakshmi Puja 2025 Date And Time: लक्ष्मीपूजनाची खरी तारीख कोणती? 20 की 21 ऑक्टोबर? शुभ मुहूर्तही जाणून घ्या

(नक्की वाचा: Lakshmi Puja 2025 Date And Time: लक्ष्मीपूजनाची खरी तारीख कोणती? 20 की 21 ऑक्टोबर? शुभ मुहूर्तही जाणून घ्या)

लक्ष्मी पूजन सजावट | Lakshmi Puja 2025 Decoration | VIral Video 

लक्ष्मीपूजन पूजा 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com