सॅमसंगचे स्मार्टफोन किंवा गॅजेट्स खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सॅमसंगच्या 'गॅलेक्सी डेज' सेलचा आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये सॅमसंगचे लेटेस्ट स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप आणि स्मार्टवॉच अत्यंत स्वस्त दरात मिळत आहेत. आज मध्यरात्री हा सेल संपणार आहे, त्यामुळे सवलतीच्या दरात प्रीमियम उत्पादने घरी नेण्याची हीच खरी वेळ आहे. या सेलमध्ये बजेट फोनपासून ते महागड्या फ्लॅगशिप फोनवर सॅमसंगने मोठी सूट दिली आहे.
गॅलेक्सी झेड फोल्डेबल्सवरही मोठा डिस्काऊंट
किमतीचा विचार केला तर सॅमसंगची लोकप्रिय गॅलेक्सी F सीरिज आता केवळ 8,999 रुपयांपासून उपलब्ध आहे. तसेच स्टायलिश लूक असलेली गॅलेक्सी A सिरीज तुम्ही 19,999 रुपयांपासून खरेदी करू शकता. विशेष म्हणजे सॅमसंगचा सर्वात पॉवरफुल मानला जाणारा गॅलेक्सी S सिरीजचा फोन चक्क 42,999 रुपयांना मिळत आहे. ज्यांना फोल्डेबल फोनची क्रेझ आहे, त्यांच्यासाठी गॅलेक्सी झेड फोल्डेबल्स 99,999 रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या सर्व ऑफर्ससोबतच निवडक बँकांच्या कार्डवर 10,000 रुपयांपर्यंतचा जास्तीचा कॅशबॅक देखील दिला जात आहे. स्मार्टफोनच्या जोडीला गॅलेक्सी टॅब्लेट आणि लॅपटॉपवरही विशेष ऑफर्स आहेत.
(नक्की वाचा- Sell Old Clothes: जुने कपड्यांमधून पैसे कमावयचेत? ही ट्रीक 99.9% लोकांना माहिती नाहीये)
'सॅमसंग केअर+' योजना
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सॅमसंगने 'सॅमसंग केअर+' ही योजनाही दिली आहे. यामुळे तुमचा फोन चुकून पडला किंवा पाण्यात भिजून खराब झाला, तरी त्याला विमा संरक्षण मिळते. त्यामुळे नवीन फोन घेताना ग्राहकांना आता टेन्शन घेण्याची गरज नाही. याशिवाय आकर्षक एक्स्चेंज ऑफर्समुळे तुमचा जुना फोन देऊन नवीन सॅमसंग फोन घेणे आता अधिक परवडणारे झाले आहे.
विविध बक्षिसे मिळवण्याचीही संधी
या सेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना मिळणारी बक्षिसे. फ्लिपकार्टवरील गॅलेक्सी डेज पेजला भेट देणाऱ्यांना 'सुपरकॉइन्स' मिळत आहेत. काही भाग्यवान खरेदीदारांना तर 'मिस्ट्री बॉक्स' अनलॉक करून खास डिस्काउंट कूपन जिंकण्याची संधीही आहे. एकंदरीतच सॅमसंगने आपला हा सेल ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर बनवला आहे. दर्जेदार सॅमसंग उत्पादने सवलतीत खरेदी करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे ही संधी गमावू नका.