जाहिरात

लोणावळा विरुद्ध महाबळेश्वर, काय सर्वात भारी? पुढच्या ट्रिपसाठी बेस्ट ठिकाण कसं निवडाल?

महाराष्ट्रातील जवळच्या ट्रिपची ठिकाणं म्हणजे लोणावळा किंवा महाबळेश्वर. विकेंडला या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

लोणावळा विरुद्ध महाबळेश्वर, काय सर्वात भारी? पुढच्या ट्रिपसाठी बेस्ट ठिकाण कसं निवडाल?

Lonavala vs Mahabaleshwar : महाराष्ट्रातील जवळच्या ट्रिपची ठिकाणं म्हणजे लोणावळा किंवा महाबळेश्वर. विकेंडला या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मुंबई आणि पुण्यापासून लोणावळा तर २ ते अडीच तासांच्या अंतरावर असल्याने येथे मोठी गर्दी होते. दुसरीकडे स्ट्रॉबेरीच्या बागा, थंड हवामान आणि निसर्गरम्य ठिकाणं असल्यामुळे महाबळेश्वर पर्यटकांना खुणावत असतं.  


लोणावळा का इतका लोकप्रिय?

लोणावळा हे पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांचं आवडतं थंड हवेचं ठिकाण. पावसाळ्यात तर सुंदर धबधबे, धुक्याने वेढलेल्या दऱ्यामुळे पर्यटकांचं लक्ष वेधत असतात. याशिवाय मुंबई आणि पुण्याहून येथे सहज पोहोचता येत असल्यामुळे विकेंडला छोट्या सहलींसाठी हे आवडतं ठिकाण बनलं आहे. 

Photo Credit: Unsplash

महाबळेश्वरची खास मज्जा...

महाबळेश्वर थंड हवामानासह विस्तीर्ण स्ट्रॉबेरीच्या मळ्यासाठी ओळखलं जातं. येथे सुंदर आणि प्राचीन अशी मंदिरंही आहेत. याशिवाय धुक्याने वेढलेला रस्ता, खोल दऱ्या, घनदाट जंगल पाहण्याचा अनुभव तुमचा कामाचा क्षीण आणि थकवा कमी करतो हे नक्की. 

Photo Credit: Unsplash

लोणावळा विरुद्ध महाबळेश्वर, नेमका फरक काय? 

लोणावळ्यात मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे पावसाळ्यात येथे फिरण्याची मजा काही औरच असते. तर महाबळेश्वरमध्ये वर्षभर गुलाबी थंडी असते. अगदी उन्हाळ्यातही येथील वातावरण आल्हाददायक वाटतं. 

लोणावळा रस्ते आणि रेल्वे दोन्ही मार्गाने जोडलेला असल्यामुळे प्रवास सोपा आहे. तर महाबळेश्वर हा प्रवास प्रामुख्याने रस्तेमार्गाने जोडलेला आहे. त्यामुळे कदाचित तो थोडा लांब वाटू शकतो. 

प्रमुख आकर्षण...

लोणावळा धबधबे, किल्ला, गुहा आणि साहसी उपक्रमांसाठी ओळखला जातो. तर महाबळेश्वरमध्ये निसर्गरम्य स्थळं, तलाव, स्ट्रॉबेरीच्या बागा आहेत. 

लोणावळ्यात एक किंवा दोन दिवस तर महाबळेश्वर सहलासाठी दोन ते तीन दिवस पुरेसे आहेत. 
 

Photo Credit: Unsplash

कसं पोहोचाल?

लोणावळा - मुंबई आणि पुण्याहून रेल्वेद्वारे लोणावण्याला पोहोचणं सोपं आहे. याशिवाय रस्ते मार्गाने बसद्वारे किंवा खासगी वाहनाद्वारे जाणंही सोपं आहे. 

महाबळेश्वर - येथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन सातारा आणि पुणे आहे. येथून टॅक्सी आणि बस उपलब्ध आहेत. 

कोणकोणत्या ठिकाणांना भेट द्याल?

लोणावळा - 

टायगर पॉइंट 
भुशी धरण
कार्ला लेणी
राजमाची किल्ला


महाबळेश्वर - 

आर्थर्स सीट
वेण्णा तलाव
मॅप्रो गार्डन
एलिफंड्स हेड पॉइंट


सहलीचं नियोजनाची सर्वोत्तम वेळ कोणती?


लोणावळा - जून ते सप्टेंबर 

महाबळेश्वर - ऑक्टोबर ते जून

तुम्हाला शहराच्या जवळच एक छोटीशी सहल करायची असेल आणि पावसाळ्यातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घ्यायचा असेल तर लोणावळा तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन रिलॅक्स व्हायचं असेल तर महाबळेश्वर तुमचा सर्व थकवा दूर करेल.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com